मालेगाव येथे मनपामध्ये फायरमन अग्नीशमन विमोचक पदाच्या 50 जागांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू- Malegaon Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi

मालेगाव येथे मनपामध्ये फायरमन अग्नीशमन विमोचक पदाच्या 50 जागांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू- Malegaon Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi

मालेगाव महानगरपालिका अग्नीशमन विभागामार्फत फायरमन अणि अग्नीशमन विमोचक पदासाठी तब्बल 50 जागा़ंवर भरती केली जात आहे.

जे उमेदवार पदयोग्यतेनुसार पात्र ठरतील त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख अणि पत्ता –

जे उमेदवार सदर भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी मुलाखतीच्या दिवशी 22 फेब्रुवारी 2023 ह्या तारखेला अग्नीशमन केंद्र जाखोटिया भवन शिवाजी पुतळा समोर मालेगाव ह्या दिलेल्या पत्यावर उपस्थित राहायचे आहे.

परीक्षा शुल्क अर्ज फी –

सदर पदांसाठी घेतल्या जात असलेल्या परीक्षेत उमेदवारांकडुन कुठल्याही प्रकारची परीक्षा तसेच अर्ज फी देखील घेतली जाणार नाहीये.

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान मुलाखतीदरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना मालेगाव शहरात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

पदाचे नाव – फायरमन/अग्नीशमन विमोचक

एकुण पदसंख्या -50

शैक्षणिक पात्रतेची अट –

सदर पदांसाठी अर्ज करणारया उमेदवाराची दहावी,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण असायला हवी.

वयोमर्यादा अट –

सदर पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

वयातील सुट –

एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी सुट वयामध्ये देण्यात आली आहे.

See also  लिपिक कायमस्वरूपी भरती पदसंख्या -40 - कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये लिपिक पदासाठी कायमस्वरूपी भरती सुरू -Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association clerk Bharti 2023

वेतन –

ज्या उमेदवारांची मुलाखती दरम्यान निवड केली जाईल त्यांना 14 हजार इतके वेतन पे स्केल दिले जाणार आहे.

 Malegaon Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi शारीरिक पात्रता अट किती हवी?

शारीरिक पात्रतेमध्ये जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची उंची किमान 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.अणि छाती 81 सेंटीमीटर इतकी असणे आवश्यक आहे.फुगवून पाच सेंटीमीटर अधिक असावी.

पुरूष उमेदवारांचे वजन किमान 50 किलो असणे गरजेचे आहे.

शारीरिक पात्रतेमध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्यांची उंची किमान 162 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.अणि वजन 50 किलो असणे आवश्यक आहे.

मालेगाव महानगरपालिका आॅफिशिअल वेबसाईट –

malegaoncorporation.org ही मालेगाव महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट आहे.

जे उमेदवार सदर पदांसाठी अर्ज करायला इच्छुक आहेत त्यांनी एका कोरया कागदावर अर्ज लिहून आपण ज्या पदासाठी अर्ज करतो आहे त्या पदाचे नाव टाकायचे आहे.
स्वताचा पत्ता मोबाईल नंबर टाकायचा आहे.

 अर्जाला खालील दिलेली कागदपत्रे जोडायची आहे.

  • 1)एल सी
  • 2) जन्म दाखला
  • 3) एस एससी मधील उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुणांची टक्केवारी पत्रिका
  • 4) शासकीय तसेच निमशासकीय विभागामध्ये काम करण्याचा अनुभव तसेच अनुभव असल्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे.
  • 5) एस एससी गुणपत्रिका
  • 6) एच एस सी गुणपत्रिका

इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो वगैरे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.मुलाखतीच्या वेळी ओरिजनल डाॅक्युमेंट देखील ठेवावे.

सर्वप्रथम मुलाखतीला गेल्यावर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येईल त्यानंतर कागदपत्रांची छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

मुलाखतीसाठी येणारया उमेदवारांना प्रवास खर्च तसेच इतर कुठलाही जाण्यायेण्याचा खर्च दिला जाणार नाही.म्हणुन सर्व उमेदवारांनी स्वखर्चाच्या बळावर मुलाखतीसाठी मालेगाव येथे यायचे आहे.

ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र असतील त्यांची मुलाखत घेतली जाणार नाही.