मन की बात ह्या कार्यक्रमाचे शंभर एपिसोड पुर्ण Mann ki baat 100 episode complete in Marathi
आज ३० एप्रिल २०२३ रोजी मन की बात ह्या कार्यक्रमाचे शंभर एपिसोड पुर्ण होत आहेत.असे सांगितले जात आहे की ह्या कार्यक्रमाच्या शंभराव्या एपिसोड निमित्त विशेष तयारी व्यवस्था तसेच तजवीज करण्यात आली आहे.
आज ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता ह्या कार्यक्रमाच्या शंभराव्या एपिसोडचे प्रसारण केले जाणार आहे.
ह्या शंभराव्या एपिसोड निमित्त जय्यत तयारी भाजप पक्षाकडून केली गेली आहे.असे सांगितले जात आहे की आजचा शंभराव्या एपिसोडला सुरूवात करण्याआधी एक विशेष व्हिडिओ दाखवला जाणार आहे.
ह्या व्हिडिओ मध्ये याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे की मन की बात ह्या कार्यक्रमाची रेकाॅर्डिग करताना तसेच रेकाॅर्डिग करण्याच्या दरम्यान कोणकोणती तयारी केली जात असते.
ह्याच अनुषंगाने आजच्या लेखात आपण मन की बात ह्या कार्यक्रमा विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मन की बात काय आहे?
मन की बात हा आकाशवाणी वर प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सादर करीत असतात.
मन की बात ह्या कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लाखो करोडो नागरिकांसोबत संवाद साधत असतात.
मन की बात ह्या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड २०१४ मध्ये ३ आॅक्टोंबर ह्या तारखेला सर्वप्रथम प्रसारीत करण्यात आला होता.
मन की बात हा कार्यक्रम दरमहिन्याला अखेरच्या रविवारच्या दिवशी संडे ला सकाळी ठिक अकरा वाजता प्रसारित केला जातो.
मन की बात हया कार्यक्रमाची रेकाॅर्डिग ही नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या ७ लोककल्याण मार्ग ह्या ठिकाणी करण्यात येत असते.
पण आज मन की बात हया कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड असल्याने रोजच्या पेक्षा अधिक तयारी ह्या कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी केली गेली आहे ही तयारी पुढीलप्रमाणे आहे –
१) मन की बात ह्या कार्यक्रमाच्या आजच्या शंभराव्या एपिसोडचे प्रसारण संपूर्ण भारतातील आॅल इंडिया रेडिओ तसेच दुरदर्शन चॅनलवर केले जाणार आहे.
२) जागोजागी ह्या कार्यक्रमाची लाईव्ह स्क्रीनिंग केली गेली आहे.जेणेकरून लाखो करोडो लोकांना हा कार्यक्रम बघता तसेच ऐकता येईल.
३) यूएन मध्ये देखील मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
४) देशातील मोठमोठ्या रेल्वे स्टेशन वर लोकांना हा कार्यक्रम ऐकायला मिळावा म्हणून टिव्ही स्क्रीनिंगची सोय करण्यात आली आहे.
५) भाजप पक्षाचे आमदार खासदार देखील मन की बात ह्या कार्यक्रमाला ऐकताना दिसुन येणार आहे.
६) राजभवनात देखील ह्या कार्यक्रमाला ऐकले जाणार आहे.
७) धर्मशाळां मध्ये देखील हा कार्यक्रम ऐकला जाणार आहे.
८) संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात देखील हा कार्यक्रम ऐकला जाणार आहे.