सरकारकडून बारसु रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रह का केला जातो आहे?यामागचे कारण काय आहे? – Why Maharashtra govt wants barsu refinery

सरकारकडून बारसु रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रह का केला जातो आहे?यामागचे कारण काय आहे?

बारसु रिफायनरी प्रकल्पा वरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू पेटलेला आपणास दिसून येत आहे बारसू रिफायनरी प्रकल्पाला बारसु सोनगाव येथील स्थानिक नागरीकांकडुन तसेच पर्यावरण वादयांकडुन देखील ह्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो आहे.

पर्यावरणवादी अणि येथील स्थानिक नागरीकांकडुन ह्या प्रकल्पाला विरोध का केला जातो आहे हे आपण मागील एका लेखातुन जाणून घेतलेच आहे.

आता आपण आजच्या लेखात हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पर्यावरण वादी तसेच बारसू येथील स्थानिक नागरीकांकडुन ह्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करून विरोध केला जात असताना सरकार ह्या प्रकल्पावर ठाम का आहे यामागचे शासनाचे उद्दिष्ट काय आहे?

सरकारकडून बारसु रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रह का केला
सरकारकडून बारसु रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रह का केला

बारसु रिफायनरी प्रकल्पाचे महत्व –

बारसु रिफायनरी हा एक मोठा रिफायनरी प्रकल्प आहे ज्याद्वारे तेलशुदधीकरण केले जाणार आहे.

बारसु रिफायनरी हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पासाठी शासनाकडुन ३ लाख कोटी इतका खर्च केला जाणार आहे.

भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम,इंडियन आॅईल अशा भारतातील तीन प्रमुख दिग्दज पेट्रोलियम सरकारी कंपन्यांनी आपले पैसे ह्या प्रकल्पात गुंतवले असल्याचे सांगितले जात आहे.

परदेशातील आखाती देशातील सौदी अरमाओ अॅनडाॅक जाॅईट ह्या दोन कंपन्या देखील ह्या भारतातील प्रकल्पाचा हिस्सा असणार आहे.

बारसु प्रकल्पावर शासन ठाम का आहे?बारसु रिफायनरी प्रकल्पाचे फायदे कोणते आहेत?

आता आपण जाणुन घेऊया की बारसु गावातील स्थानिक नागरीकांकडुन विरोध केला जात असताना शासन ह्या प्रकल्पावर ठाम का आहे.

See also  बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री कोण आहेत? - Bageshwar Maharaj

१)देशाच्या विकासासाठी देशात विकास घडुन यावा ह्या दृष्टीकोनाने शिंदे सरकार ह्या बारसु रिफायनरी प्रकल्पावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

२)ह्या बारसु रिफायनरी प्रकल्पाअंतर्गत सुमारे एक लाखापेक्षा अधिक रोजगाराची निर्मिती शासनाला करायची आहे शासनाच्या ह्या प्रकल्पामुळे अनेक लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.असे शासनाकडुन सांगितले जात आहे.

३) ह्या प्रकल्पातुन भारतातील कोकणी प्रदेशाचा विकास घडवून आणला जाणार आहे.

४) ह्या प्रकल्पामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना प्राप्त होणार आहे.

५) भारताला ह्या प्रकल्पानंतर परकीय तेलावर जास्त अवलंबून राहावे लागणार नाहीये.परदेशातुन तेलाची आयात करावी लागणार नाही.

६)आपला भारत देश स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.

बारसू रिफायनरी वरून कुठला वाद पेटला आहे?

बारसु रिफायनरी प्रकल्पावरून पर्यावरण वादी आणि विकासवादी हे दोघे एकमेकांच्या आमनेसामने आलेले असल्याचे आपणास दिसून येते.

पर्यावरणवादी पर्यावरणाच्या हिताचा विचार करून बारसु रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत आहे पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प किती घातक आहे हे सांगत आहे.

तर विकासवादींकडुन देशाच्या विकासाच्या उद्दिष्टाने हा प्रकल्प किती महत्वाचा हे पटवून देत आहे अणि ह्या प्रकल्पासाठी विकास वादींकडुन आग्रह धरला जात आहे.

अणि येथील स्थानिक नागरिक सुद्धा शेती अणि मासेमारी व्यवसायावर वाईट परिणाम ह्या प्रकल्पामुळे घडुन येईल शेतीचे फळबागांचे नुकसान होईल तसेच पर्यावरणाचा नायनाट होईल जैवविविधतेस धोका पोहोचेल,कोकणाच्या निसर्ग संपन्नतेला बाधा पोहोचेल,समुद्राचे पाणी दृषित होईल, कोकणी संस्कृतीचा वारसा जपणे इत्यादी हिताने

तसेच कारणांमुळे ह्या प्रकल्पाला विरोध करताना दिसुन येत आहे.

दुसरीकडे ह्या प्रकल्पाला विरोधी पक्षाकडुन विरोध केला जाऊन राजकीय स्वरूप देखील प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

बारसु मधील प्रकल्प होणारच पण येथील भुमीपुत्रांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प शासन राबवेल असे एकनाथ शिंदे यांची यावर भुमिका आहे.