निबंध मराठी – माझा आवडता खेळ – Maza Avadata Khel


भारत देशात खेळले जाणारे सर्वच खेळ उत्तम आहेत पण सगळयात जास्त मला कोणता खेळ आवडतो तर तो म्हणजे क्रिकेट. Maza Avadata Khel

निबंध मराठी – माझा आवडता खेळ

आज आपल्या देशात क्रिकेट,फुटबाँल,हाँकी,कबडडी,बुदधिबळ असे विविध प्रकारचे शारीरीक तसेच बौदधिक कसरतीचे खेळ खेळले जातात.खेळ कोणताही असो त्याने आपले मनोरंजन तर होतेच सोबत आपला शरीराचा आणि बुदधीचा व्यायाम देखील त्यामुळे होत असतो.

ज्यामुळे आपल्या शरीराला आणि बुदधीला चालना मिळत असते.आपली बुदधी प्रखर आणि तेज होत असते तसेच शारीरीक दृष्टया देखील आपण मजबुत होत असतो.म्हणुन खेळाला आपल्या जीवणात फार महत्व असते.

तसे पाहायला गेले तर आपल्या भारत देशात खेळले जाणारे सर्वच खेळ उत्तम आहेत

पण सगळयात जास्त मला कोणता खेळ आवडतो तर तो म्हणजे क्रिकेट. Maza Avadata Khel

क्रिकेट हा एक अत्यंत लोकप्रिय आणि जगप्रसिदध खेळ आहे.ज्याची सुरूवात इंग्रजांनी सर्वप्रथम केली होती.तेव्हापासुन आजपर्यत हा खेळ जगभर ओळखला जातो.आणि खेळला देखील जातो.

लहान मुलांपासुन तर मोठया माणसांपर्यत सगळयांनाच आज क्रिकेट ह्या खेळाची अत्यंत आवड असलेली आपल्याला दिसुन येते.रोज सकाळी पटांगणामध्ये लहान बालकांबरोबर वृदध तसेच प्रौढ व्यक्ती सुदधा मोठया उत्साहाने क्रिकेट खेळताना आपल्याला दिसत असतात.

रोज पटांगणात क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवल्या जातात.ज्यात वेगवेगळया ठिकाणातील,गावातील,शहरातील क्रिकेटच्या टीम भाग घेत असतात.आणि मग एकमेकांविरूदध सामना जिंकुण त्या पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करत असतात.

क्रिकेटचे सामने देखील विविध प्रकारचे असतात ज्यात एकदिवसीय सामना,कसोटी सामना,टी 20 असे अनेक प्रकार असतात.

एकदिवसीय सामन्यासाठी दोघे संघांना प्रत्येकी 50 किंवा 20 ओव्हर दिल्या जातात.ज्यात नाणेफेक जिंकुन पहिले फलंदाजी करत असलेल्या संघाला समोरच्या संघासमोर एक टारगेट ठेवायचे असते.आणि मग पहिले बँटिंग केलेल्या संघाने जेवढा स्कोअर केला त्यापेक्षा एक रण जास्त काढुन दितीय फलंदाजी करत असलेल्या संघाला तो सामना जिंकायचा असतो.आणि त्या संघाने तसे नाही केले तर पहिले फलंदाजी केलेल्या संघास विजयी घोषित केले जात असते.

क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाकडे एकुण अकरा खेळाडु दिले जातात.आणि दोन पंच देखील असतात.जे कोण बाद झाले?किंवा कोण नाबाद आहे हे टाँस करून ठरविण्याचे काम करत असतात.आणि समजा दोघे पंचांना निर्णय नही घेता आला तर मग शेवटी थर्ड हंपायरची मदत घेतली जात असते.ज्यात थर्ड हंपायर सामन्याचे संपुर्ण नीट निरीक्षण करून सांगत असतो की सदर खेळाडु बाद झाला आहे का तो अजुनही नाबाद आहे?

See also  बालमनी अम्मा के बारे में जानकारी - Balamani Amma Information In Hindi - Balamani Amma Information In Hindi

क्रिकेट खेळण्यासाठी आपल्याला बँट आणि बाँल या दोघांची आवश्यकता असते.मँच सुरू करण्याअगोदर टाँस केला जातो आणि जी टीम टाँस जिंकते ती प्रथम फलंदाजी करत असते.किंवा त्यांना वाटले तर ते प्रथम  गोलंदाजी देखील स्वीकारू शकतात.क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाला एका ओव्हरमध्ये सहा बाँल दिले जात असतात.

त्यातही फलंदाजी आणि गोलंदाजीचे काही नियम असतात ज्याचे पालन सर्व खेळाडुंना करावे लागते.

  • म्हणजेच जर गोलंदाजी करताना गोलंदाजाने एखादा वाईड बाँल टाकला तर त्याचा एक एक्सट्राँ रण फलंदाज टीमला दिला जात असतो.
  • फलंदाजी करत असलेल्या संघाचे दोन खेळाडु हे पिचवर खेळायला येत असतात.आणि गोलंदाजी करत असलेल्या संघाचा एक खेळाडु बाँल टाकत असतो आणि बाकीचे खेळाडु चारही दिशांनी क्षेत्ररक्षणाचे काम करत असतात.
  • मग गोलंदाज फलंदाजाच्या दिशेने वेगाने तसेच स्पीन करून बाँल टाकत असतो आणि मग फलंदाज त्या बाँलवर बँटने जोरदार प्रहार करत चौकार तसेच षटकार लावण्याचे काम करत असतो.क्षेत्ररक्षणाच्या सीमेच्या पार बाँल गेल्यावर चौकार तसेच षटकार समजला जात असतो.
  • म्हणजेच जर फलंदाजाने बाँलवर बँटने प्रहार करत तो सर्व खेळाडुंना भेदत तो हवेतुन क्षेत्ररक्षण सीमेच्या बाहेर पाठवला तर त्याला सहा रण मिळत असतात.आणि तो चेंडु जमिनीवर सरपटत क्षेत्ररक्षण स्थळाच्या सीमेपार गेला तर त्याला चार रण मिळत असतात.
  • आणि जर फलंदाजी करणारा खेळाडु धावत पंच तसेच गोलंदाज असलेल्या ठिकाणी धावत गेला आणि पंच तसेच गोलंदाज उभे असलेल्या भागातील उभा असलेला दुसरा फलंदाज पहिल्या फलंदाजाच्या ठिकाणी एकदा धावत पोहचला तर एक रण आणि दोनदा धावला तर दोन रण टीमला मिळत असतात.

असा असतो हा क्रिकेटचा खेळ जो मला खुपच आवडतो.लहानपणी जेव्हा आई आम्हाला तिघे भावंडांना क्रिकेट खेळण्यास मनाई करायची तरी देखील आम्ही क्रिकेटवरील प्रेमापोटी चोरून लपुन क्रिकेट खेळायचो.

कधी कधी आमच्या क्रिकेटचे खुळ तोडण्यासाठी आई कुठे बाहेर जात असली तर आम्ही तिच्यापासुन लपुन क्रिकेट खेळु नाही म्हणुन आम्हाला तिची शपथ देखील द्यायची.

See also  सतिष कौशिक यांच्याविषयी माहिती | Satish kaushik information in Marathi

पण आम्हाला क्रिकेटचे इतके वेड होते की आम्ही लहानपणी आईची दिलेली शपथ मोडण्यासाठी देवापुढे उभे राहुन एवढा एवढा गणपती त्याच्या गळयात साखळी माझी शपथ मोकळी असे करून पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरू करून द्यायचो.

काय करणार ते वयच असे होते आणि क्रिकेटची सवय अशी लागली होती की तेव्हा क्रिकेट खेळण्यावाचुन अजिबात करमायचेच नाही.तेव्हा क्रिकेट म्हणजे आमचा जीव की प्राण होता.म्हणुन आमच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आम्ही काहीतरी मार्ग शोधुनच काढायचो.

आमची क्रिकेटची टीम खुप मोठी नसायची मी माझे दोन भाऊ आणि आमचे अजुन तीन मित्र होते जे आमच्या घराच्या पाठीमागेच राहायचे.आई घरातुन बाहेर कुठे गेल्यावर लगेच आम्ही घराच्या मागच्या दारातुन आमच्या मित्रांना शिटटी मारून बोलवायचो.

मग आमचे तिघे मित्र येताच आम्ही स्टम्प लावायचो आणि टाँस पाडुन क्रिकेटची सुरुवात करायचो.स्टम्प देखील आमचे खुप मोठे नसायचे.आमच्याच घरात एक छोटी गुलाबी रंगाची खुर्ची होती जिचा वापर आम्ही स्टम्प म्हणुन करायचो.

आमच्या मध्ये आम्ही दोन टिम पाडुन घ्यायचो.ज्यात एका संघात मी आणि माझा एक भाऊ आणि अजुन एक मित्र असायचा आणि दुसरी टीममध्ये माझा दुसरा भाऊ आणि अजुन दोन मित्र राहायचे.खुप मज्जा यायची एका ठिकाणी उभे राहुन चारही दिशेला समोरच्या संघाला पळवायला.त्यांची दमछाक करायला.

आणि क्रिकेट खेळण्याबरोबरच क्रिकेट बघण्याचाही आम्हाला खुपच नाद होता.भारत-पाकिस्तान,भारत आँस्ट्रेलिया,भारत-श्रीलंका,भारत-न्युझीलँड,भारत-दक्षिण आफ्रिका इत्यादी अशी कोणतीच मँच नसायची जी आम्ही आवडीने बघायचो नही.

तेव्हा भारतीय संघात माझ्या आवडीचा खेळाडु सौरव गांगुली हा कर्णधार होता.तसेच उपकर्णधार राहुल द्रविड हा होता.आणि सचिन तेंडुलकर तर पुर्ण भारतीय संघाची मुख्य जमेची बाजुच असायचा.जेव्हाही सचिन तेंडुलकर रण न करता शुन्यावर बाद व्हायचा तेव्हा आम्हा सर्वाचे चेहरे उतरलेले असायचे आणि आता मँच हातातुन गेली असे वाटायचे कारण सचिन खेळला तर टीम जिंकणार आणि सचिन लवकर आऊट झाला तर टीम हरणार असाच समज सर्वाचा असायचा.

See also  गूगल डूडल - सुंदर आणि आकर्षक - नवीन वर्षाच्या पुर्व संध्येला गुगलने तयार केले डूडल  - New Year's Eve: Google doodle ready to welcome 2022

भारत पाकिस्तान मँच असल्यावर तर देशभक्तीच सर्वामध्ये जागी होत असायची.जणु काही ती क्रिकेटची मँच नसुन भारत पाकिस्तान यांच्यात सीमेवर युदधच चालले आहे असे वातावरण सगळीकडे भारत पाकिस्तान मँच चालु असताना पाहायला मिळायचे.

खुपच मजेशीर आणि गंमतीदार क्षण होते जेव्हा आम्ही रोज सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळायचो आणि टिव्हीवर क्रिकेटच्या मँचेस देखील बघायचो.सगळीकडे क्रिकेटमय वातावरण झालेले दिसुन यायचे.असे वाटायचे जणु आयुष्याचे उददिष्टच क्रिकेट खेळणे आणि क्रिकेट बघणे हे आहे.

पण जसजसे मोठे होत गेलो आमची सर्व क्रिकेटची टीम वेगळी होत गेली.आणि काही कालांतराने आमचे क्रिकेट खेळणे देखील कायमचे बंद झाले.पण आज देखील जेव्हाही कोणाही लहान मुलाला क्रिकेट खेळताना बघतो तेव्हा मला माझे जुने क्रिकेटचे दिवस नक्कीच आठवत असतात.

असा होता माझा अत्यंत आवडता खेळ – Maza Avadata Khel क्रिकेट ज्यात माझे पुर्ण बालपण सामावलेले होते.