एम एस आरटीसी मोफत प्रवास योजना विषयी माहिती – MSRTC free travel scheme in Marathi

एम एस आरटीसी मोफत प्रवास योजना विषयी माहिती – MSRTC free travel scheme in Marathi

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून परवडेल अशा दरात प्रवास करता यावा याकरीता सर्व अंध अपंग तसेच ज्येष्ठ नागरीक यांच्या करीता खास एक स्कीम सुरू करण्यात आली आहे जिचे नाव एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड योजना असे आहे.

एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड म्हणजे काय?

एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड ही एक योजना आहे जी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक तसेच अंध अपंग असलेल्या प्रवाशांना आपल्या खिशाला परवडेल अशा कमी दरात बसने ये जा करता यावी यासाठी सुरू करण्यात आली आहे.

ज्या नागरीकांकडे हे एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड असणार त्यांना मोफत तसेच कमी दरात एसटी बसने प्रवास करण्याचा लाभ घेता येणार आहे.

एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड योजना कधीपासून सुरू करण्यात आली आहे?

एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड योजना २०१९ पासुन सुरु करण्यात आली होती.

एम एस आरटीसी मोफत सवलतीत प्रवास ह्या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

● 75 + वय असलेले ज्येष्ठ नागरीक

● अंध अपंग दिव्यांग व्यक्ती

● महात्मा गांधी समाजसेवक

● आदीवासी समाजसेवक

See also  1million is equal to? के,मिलियन,बिलियन आणि ट्रिलीयन म्हणजे किती? - What is million billion trillion

● आधी स्वीकृती पत्रकार

● बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्काराथी

● अण्णाभाऊ साठे पुरस्काराथी

● विद्यार्थी

तसेच २९ विविध सामाजिक घटक असलेल्या व्यक्तींना एसटी बस भाडयात ३३ टक्के ते शंभर टक्के इतकी सवलत दिली जाते.

स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी आपणास पुढील महत्वाचे डाॅक्युमेंट लागणार आहेत –

● आधार कार्ड

● मतदान कार्ड

● मोबाईल नंबर

● ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग असल्याचा पुरावा तसेच योजनेचा लाभार्थी व्यक्ती असल्याचा पुरावा

● आपल्या वयाचा पुरावा

● महाराष्ट्राचे नागरीक आहे याचा पुरावा

स्मार्ट कार्ड कुठे अणि कसे काढायचे आहे?

स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी सर्व तालुक्यात आगारनिहाय एजंटची करण्यात आलेली आहे.सर्व ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसेच योजनेच्या इतर लाभार्थी व्यक्तींना सर्वप्रथम आपले आधार कार्ड मतदान कार्ड अणि ज्येष्ठ नागरिक तसेच लाभार्थी असल्याचा पुरावा घेऊन बस स्टँडवर स्थानकावर जायचे आहे.

अणि आपला अंगठा तेथील स्कॅनरवर ठेवून स्कॅन करून स्मार्टकार्ड साठी आपले नाव रेजिस्टर करून घ्यायचे आहे.

स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी किती शुल्क भरायचे आहे?

स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी आपणास ५५ रूपये इतके नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

स्मार्ट कार्डसाठी आपले नाव नोंदुन झाल्यावर किमान १५ ते २० दिवसांनी जिथे आपण कार्ड साठी नाव नोंदवले आहे तिथेच आपणास एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड मिळुन जाईल.

स्मार्ट कार्ड बनवण्याचे महत्वाचे फायदे कोणते आहेत?

● ज्या लाभार्थी एस टी बस प्रवाशांनी आपले स्मार्ट कार्ड बनवलेले आहे त्यांना एसटीने प्रवास करताना आपले इतर कुठलेही ओळखपत्र जवळ बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही.

● एस टी ने कुठेही प्रवास करत असताना आपण ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड दाखवले तरी चालणार आहे.

● ह्या स्मार्ट कार्ड मध्ये लवकरच डिजीटल वाॅलेटची सुविधा सुरू करण्यात येणार आहे हया डिजीटल वाॅलेटचा वापर करून आपण आपल्या सोबत एसटीमध्ये प्रवास करत असलेल्या आपल्या इतर सहप्रवासी व्यक्तींचे तिकिट काढु शकणार आहे.

See also  मराठी विचार - Good thoughts in Marathi

जे व्यक्ती वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती आजी आजोबा आहेत त्या सर्वांना लाभदायक अशी ही योजना आहे.

स्मार्ट कार्ड काढण्याची शेवटची तारीख काय आहे?

ज्यांना बसमधील प्रवासात सवलत हवी आहे अशा सर्व प्रवाशांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्या एस टी बस प्रवाशांनी आपले स्मार्ट कार्ड अजुनही बनवलेले नाहीये त्यांना आपले स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ करून देण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२३ पासुन सवलतीच्या दरात बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड बनवावे लागणार आहे अन्यथा त्यांना एस टी बस भाडयात सवलत दिली जाणार नाही.

Leave a Comment