जागतिक दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस का साजरा केला जातो?हया दिवसाचे महत्त्व काय आहे? National Anti-Terrorism Day 2023

जागतिक दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस – National Anti-Terrorism Day 2023

आज फक्त आपल्या भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दहशतवाद हिंसाचाराचे थैमान माजले आहे.हा प्रश्न कुठल्याही एका देशाचा राहिलेला नसुन संपूर्ण जगाचा प्रश्न बनत चालला आहे.

National Anti-Terrorism Day 2023
National Anti-Terrorism Day 2023

आज जागोजागी वाढत असलेले हिंसेच्या दहशतवादाच्या प्रकारामुळे जागतिक शांततेला धोका पोहोचत आहे.

त्यामुळे दहशतवाद हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आज जागतिक पातळीवर २१ मे रोजी दहशतवाद हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला जातो आहे.

२१ मे ह्याच तारखेला राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.२१ मे १९९१ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करत असताना तामिळनाडू ह्या राज्यामध्ये श्रीपेरंबपुर ह्या ठिकाणी राजीव गांधी सभेला संबोधित करीत होते.

पण सभेत संबोधित असताना तामिळ दहशतवादयांनी राजीव गांधी यांची कट रचुन हत्या घडवून आणली.

हयाच दिवसाचे औचित्य साधत दरवर्षी भारतासमवेत इतर देशात ह्या हत्येच्या निषेधार्थ ह्या दहशतवादी कृत्याला हिंसाचाराला विरोध करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

राजीव गांधी हे आपल्या भारत देशाचे सर्वात तरूण पंतप्रधान होते.त्यांचा कार्यकाल १९८४ ते १९८९ हा होता.

जागतिक दहशतवाद हिंसाचार विरोधी दिनाचा मुख्य हेतु काय आहे?

जागतिक दहशतवाद हिंसाचार विरोधी दिवस हा केंद्रीय मंत्रालयामार्फत साजरा केला जातो.

जागतिक दहशतवाद हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण जगभरात शांतता प्रस्थापित करणे,जगाला अहिंसेचा संदेश देणे.

आपल्या देशातील वीर जवान जे दहशतवादयांना संपवण्यासाठी सीमेवर लढत आहेत अणि लढता लढता आपले प्राण देखील गमावत आहे त्यांच्या ह्याच शौर्याचा बलिदानाचा सन्मान करणे.

देशातील भावी पिढी मध्ये तसेच तरूण वर्गात राष्ट्रसंरक्षणासाठी विकासासाठी सतर्कता जागरूकतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

आज ह्या दहशतवादा हिंसाचारा मुळेच देशातील शांततेला गालबोट लागले आहे.

आतापर्यंत भारतात हाॅटेल ताज, हाॅटेल ओबेरॉय,पवित्र संसद इत्यादी ठिकाणांवर दहशतवादी हल्ले घडुन आले आहेत.

See also  श्री बैठकीची सुरुवात कशी झाली? श्री बैठकीचे स्वरूप कसे असते?

एवढेच नव्हे तर उरी तसेच पूलवामा येथे देखील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशत वादयांकडुन अनेकदा हल्ला केला गेला आहे.जम्मु काश्मीर मध्ये असे हल्ले नेहमी घडुन येता आहे ज्यात अनेक भारतीय सैनिक पोलिस जवानांना आपले प्राण गमवावे लागत आहे.

देशातील दहशतवादाला हिंसाचाराला आळा घालणे देशात शांतता प्रस्थापित करणे हाच ह्या दिवसाचा मुख्य हेतु आहे.