नाटु नाटु गाण्याला मिळाला ऑस्कर पुरस्कार भारताने रचला इतिहास – NatuNatu wins best original song Oscars

NatuNatu wins best original song Oscars
NatuNatu wins best original song Oscars

History at Oscars -NatuNatu wins best original song Oscars

नाटु नाटु गाण्याला मिळाला ऑस्कर पुरस्कार भारताने रचला इतिहास oscar award 2023 winner in Marathi

आपल्या भारत देशासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट घडली आहे ट्रीपल आर चित्रपटामधील नाटु नाटु ह्या गाण्याला सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आॅस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.

नाटु नाटु ह्या गाण्याला बेस्ट ओरिजनल साॅग हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

NatuNatu wins best original song Oscars

ट्रीपल आर हा २०२२चा भारतीय तेलुगू -भाषेतील एपिक पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे.

याचसोबत बेस्ट शाॅर्ट फिल्म ह्या श्रेणीमध्ये भारताच्या द एलिफंट व्हिसपर्स ह्या चित्रपटाला आॅस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

अणि आॅल दॅट ब्रीद ह्या चित्रपटाला बेस्ट डाॅक्युमेंटरी ह्या विभागात आॅस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

म्हणजे आपल्या भारत देशाने आतापर्यंत तब्बल तीन श्रेणीमध्ये आॅस्कर पुरस्कार पटकावले आहे.

ज्येष्ठ नागरीकांसाठी एक उत्तम योजना दरमहीन्याला मिळणार 18 हजार 500 रूपये इतकी पेंशन

स्कर पुरस्कार म्हणजे काय?

आॅस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीतील कला क्षेत्रातील एक सर्वोच्च अणि मानाचा पुरस्कार म्हणुन ओळखला जातो.याला आॅस्कर अकादमी पुरस्कार असे देखील म्हटले जाते.

जीवनात किमान एकदा तरी हा पुरस्कार प्राप्त करण्याचा मान आपणास प्राप्त व्हावा अशी सिनेसृष्टीत तसेच कलाक्षेत्रात काम करत असलेल्या प्रत्येक कलावंताची इच्छा असते.

ऑस्कर पुरस्कार विजेता हा संपूर्ण जगभरातुन निवडला जातो म्हणजे कुठल्याही देशातील चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा दिला जात असतो.

२०२३ मध्ये लाॅस एंजलिस मधील डाॅलबी थिएटर मध्ये पार पडणारया ह्या पुरस्काराचे हे यंदाचे ९५ वे वर्ष असणार आहे.

अणि सर्वात आनंदाची बाब ही आहे की आपल्या भारत देशाला ह्या पार पडत असलेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये तब्बल तीन श्रेणीमध्ये आॅस्कर पुरस्कार पटकावण्यात यश प्राप्त झाले आहे.

ऑस्कर पुरस्कार कोणाकडुन दिला जातो?

आॅस्कर पुरस्कार हा अमेरिका ह्या देशातील मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स ह्या अकादमी मार्फत दरवर्षी दिला जातो.

ऑस्कर पुरस्कार का दिला जातो?

चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

ऑस्कर पुरस्कार सर्वप्रथम कधी देण्यात आला होता?

ऑस्करपुरस्कार हा सर्वप्रथम १६ मे १९२९ रोजी देण्यात आला होता.

ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी पात्रता काय लागते?

आॅस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी कुठलाही सिनेमा हा किमान चाळीस मिनिटे इतका कालावधी असलेला असणे आवश्यक आहे.

चित्रपट हा १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालेला असणे आवश्यक आहे अणि याधी तो इतर कोणत्याही ओटीटी फ्लॅट फाॅर्मवर देखील प्रदशिर्त करण्यात आलेला नसावा.

सदर चित्रपट लाॅस एंजलिस मधील कोणत्याही एका सिनेमा गृहात कमीत कमी सात दिवस इतक्या कालावधी करीता दाखवला गेला असणे आवश्यक आहे.