ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म द एलिफंट व्हिस्परर्सची कहाणी the oscar winning best documentary short film The elephant whisperers story in Marathi
द एलिफंट व्हिसपरर्स ह्या डाॅक्युमेंट्री चित्रपटाला नुकताच बेस्ट डाॅक्युमेंट्री शाॅर्ट फिल्म हा आॅस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.
गुनीत मोगा यांनी ह्या डाॅक्युमेंटरी चित्रपटाची निर्मिती केली आहे अणि कार्तिक गोन्सालवीस यांनी याच्या दिग्दर्शनाचे काम केले आहे.
चला तर मग जाणुन घेऊया हया चित्रपटाची कथा काय आहे.
ही शाॅर्ट फिल्म साउथ इंडिया मधील दोन जोडप्या दवारा शिशु हत्तींच्या केल्या गेलेल्या संगोपन जतन यावर आधारलेली आहे.यात दाखवलेले बमन अणि बेली हे दोन जोडपे हत्तीच्या पिल्लांचे आपल्या मुलासारखे संगोपन करत असतात.
डाॅकयुमेंटरीच्या सुरूवातीला यात आपणास सांगितले जाते की तामिळनाडू अणि कर्नाटक च्या सीमेवर एक मदुमुलाई सेंचुरी आहे.
जिथे एशियाचा सर्वात जुना एलिफंट कॅम्प प्रकाडु एलिफंट कॅम्प हा आहे.याची स्थापणा १४० वर्ष पुर्वी करण्यात आली आहे.अणि ही जागा हत्तींच्या राहण्यासाठी सर्वात मोठे जंगली स्थान आहे.
साऊथ इंडिया मध्ये काही कारटुनायकल समाजाचे लोक राहत असतात.ज्यांना जंगलाचे राजे म्हणुन ओळखले जाते.
यातीलच एक असतो बमन जो पुजारी अणि महावत देखील आहे.
बमन अणि बेली यांचे पुर्वज हे आधीपासूनच जंगली प्राण्यांसोबत राहत आलेले असतात म्हणून यांना प्राण्यांचा खुप लळा असतो.
बमन बेली हे दोघे जोडपे सोबतच राहत असतात.अणि सर्व हत्तींचा दोघे मिळून सांभाळ करत असतात.या दोघांना एकेदिवशी वनविभागाकडुन फोन येतो यात एक हत्तीचे पिल्लू बमन अणि बेली यादोघांकडे देखभाल करण्यासाठी सोपविले जाते.
ह्या हत्तीच्या पिललयाचे नाव रघू असे असते.रघुची अवस्था ही फारच नाजुक असते.कारण रघुच्या शेपटीवर कुत्र्यांनी चावलेले असते.अणि त्याच्या शेपटीवरील जखमेवर किडे लागलेले असतात.
रघुच्या आईचा मृत्यु विजेचा धक्का लागल्याने झालेला असतो.अणि अशातच अचानक अकाल पडल्यामुळे काहीच खायला प्यायला न मिळाल्याने अन्नाच्या शोधात रघु आपल्या हत्तींच्या कळपा पासुन दुर निघुन जातो.
वनविभागाकडुन रघु याला त्याच्या दुर गेलेल्या हत्तीच्या कळपाशी भेटवण्याचा खुप प्रयत्न केला गेला पण यात त्यांना अपयश येते.
95 व्या ऑस्कर पुरस्कार २०२३ चे विजेते – 95 th Oscar award 2023 winner in Marathi
मग शेवटी बमन अणि बेली या दोघे जोडप्याकडे वनविभागाचे लोक रघुला सांभाळ करण्यासाठी ठेवत असतात.
रघुच्या शेपटीवर कुत्र्यांनी चावा घेतल्याने रघु खुप जखमी झालेला असतो त्याचे वाचणे शक्य नसते पण बमन अणि बेली हे दोघे त्याला त्याच्यावर औषधोपचार करून कसेबसे वाचवितात.
मग बमन अणि बेली हेच रघुचा नियमितपणे आईवडिलांच्या प्रमाणे सांभाळ करू लागतात.असे करत करत तीन वर्षे होऊन जातात.
रघू मोठा होतो आता तो बमन अणि बेली यांच्या कुटुंबाचाच एक सदस्य झालेला असतो.
बमन याचे वडील अणि आजोबा हे वर्षोनुवर्षे पासुन हत्तींचे संगोपन जतन करत आलेले असतात.त्यांचाच प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचा त्यांचा सांभाळ करण्याचा वारसा बमन देखील जपत आलेला असतो.
रघु कुठे हरवला तर त्याला शोधता यावे यासाठी बमन रघुच्या गळयात एक घंटी बांधुन ठेवतो.कारण रघु स्वताची काळजी घेऊ शकत नसतो.
रघुचा एक मित्र देखील असतो कृष्णा जो त्याला चारा खायला शिकवत असतो.बमन रोज रघुची अंघोळ घालतो तसेच त्याची नेहमी मुलासारखी काळजी घेतो.
बमनची जोडीदार बेली ही देखील रघूची खुपच चांगल्या पद्धतीने काळजी घेते.रघुला बघितल्यावर बेली हीला तिचे सर्व जुने दुख विसरायला होते.
बेलीच्या पहिल्या नवरयाला वाघाने मारून टाकलेले असते ती एक टोळी मधील स्त्री असते.कुटटुनायकन असल्यामुळे तिला हत्तींच्या देखभालीचे काम सोपविण्यात आलेले असते.
बेली ही हत्तींची देखभाल करणारी भारत देशातील पहिली महिला बनलेली असते.बेली हिला रघुची भेटणे जणु देवाचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटत असते.रघुचा सांभाळ करत करत बेली जणु ही रघुची आईच बनली होती.
काही महिन्यांपूर्वी बेलीच्या मुलीचे निधन होते बेली ही आपल्या मुलीच्या निधनाच्या दुखात असते तेव्हा बोलु न शकणारा रघू त्याच्या सोंडेने बेलीच्या डोळ्यात आलेले अश्रु पुसतो.
बमनचे असे मत असते की हत्तींची देखभाल करणे हे एक खुप जबाबदारीचे काम आहे.हती हा एक अत्यंत बुद्धिमान आणि भावुक प्राणी असतो.पण कधी कधी हा हिंसक देखील ठरू शकतो.
बमनचे कुटुंब जंगलातुनच खाण्यासाठी अन्न मिळवत असते पण तेवढेच अन्न मिळवतो जेवढी त्यांची आवश्यकता आहे अणि जंगलाचे तेथील प्राण्यांचे रक्षण जतन देखील करत असतो.
बमनचे कुटुंब हत्तीला घाबरत नसते उलट ते हत्तींच्या सोबत राहत असते.
रघुला लाडु नारळ गुळ खुप आवडत असते.आता पावसाला सुरूवात झालेली असते पावसामुळे चारा लवकर अणि अधिक उगणार असतो ज्याने हत्तींना पोटभर अन्न प्राप्त होणार असते.
एकेदिवशी विशेष पुजेचा दिवस येतो तेव्हा हतींची पुजा केली जाते त्यांना गळ्यात हार घातला जातो.अणि सर्व हत्तींना गणपतीचा आर्शिवाद प्राप्त करून दिला जातो.
बमनचे असे म्हणने आहे की हत्तींची सेवा करणे हे देवाची सेवा करण्यासारखेच आहे.अणि बमन असे देखील म्हणतो की रघु विना त्यांचे कुठलेही अस्तित्व नाहीये.
आता काही कालावधीनंतर त्रतु बदलला होता जंगली हत्ती उन्हात अन्न मिळविण्यासाठी भटकत असतात.ज्यात काही हत्तींचा उन्हातान्हात भटकुन अन्न मिळविण्यासाठी भटकता भटकता मृत्यू झालेला असतो.
तेव्हा एक हत्तींची मुलगी जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी मार्ग शोधत असते.अशात ही हत्तींची मुलगी वनविभागाच्या हातात लागते.
मग वनविभागाचे लोक ह्या हत्तीच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी बमन अणि बेली यांना सोपवतात.हया हत्तीच्या मुलीचे नाव अममु असते.
आता अममु अणि रघु हे बमन अणि बेली सोबत एकत्र राहतात.अममु अणि रघु हे दोन्ही एकत्र खेळतात.
बमन अणि बेली हे वर्षानुवर्षे पासुन एकत्र राहत असल्याने त्यांच्यामधील जवळीकते मध्ये वाढ झालेली असते ज्यामुळे आता ते एकमेकांसोबत लग्नाच्या तयारीला लागलेले असतात.
बमन अणि बेली यांच्या लग्नासाठी घराची सजावट केली जाते.बमन अणि बेली दोघे नवीन कपडे परिधान करत असतात.रघु अणि अममुला देखील बेली अणि बमन यांच्या लग्नासाठी तयार केले जाते.
बमन बेली दोघे एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि लग्न करतात.बेलीची एक नात असते जिचे नाव संजना असते.
संजना हिचे देखील हत्तींवर खुप प्रेम असते अणि ती देखील हत्तींवर आपल्या आजीप्रमाणे प्रेम करत असते त्यांचा रोज सांभाळ करत असते.
हत्तींना अंघोळ घालणे त्यांच्या खोलीची साफसफाई करणे इत्यादी ही सर्व कामे त्यांच्या देखभालीप्रमाणे असतात.
बमन अणि बेली यांच्या लग्नानंतर त्यांना असे कळते की वनविभागाचे लोक रघु याला कोणी दुसरया व्यक्ती कडे देखभालीसाठी पाठवणार सोपविणार आहे.त्याच्या देखभालीची जबाबदारी कोणा दुसरया व्यक्तीला सोपविणार आहे.कारण रघु आता खुप मोठा झालेला असतो.
बमन अणि बेली दोघे पती पत्नी याबाबद खुपच चिंतित असतात.दोघांची इच्छा असते की रघु त्यांच्या सोबत कायमचा राहावा कारण त्यांनी रघु समवेत अनेक सुखाचे आनंदाचे अनमोल क्षण व्यतीत केलेले असतात.
रघुच्या जाण्यामुळे दोघे दुखी असतात अनेक दिवस रघुच्या जाण्याने अन्न पाणीचे सेवन करत नाही अममु सुदधा रघु जाणार म्हणून दुखी असते ती देखील दुध पिणे पण बंद करते.
तिच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर सतत निराशेत असलेल्या बेलीला रघुनेच जगण्याचे एक कारण दिलेले असते.पण आता त्याच्या जाण्याने ती पुन्हा दुखी झालेली असते.
बमन अणि बेली यांची अशी इच्छा असते की आजच्या युवा पिढीने देखील हत्तींची देखभाल करावी त्यांचे संगोपन करावे.
बमन अणि बेली हे पहिले असे जोडपे असते ज्यांनी दोन अनाथ हत्तींचे आपल्या मुलांप्रमाणे पालनपोषण संगोपन करण्याची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेली असते.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर द एलिफंट व्हिसपरर्स ही डाॅक्युमेंटरी शाॅर्ट फिल्म ही हत्तीं अणि मानव यांच्या मधील लळयाची प्रेमाची भावनिक कथा आहे.