माखनलाल चतुर्वेदी कोण होते?
आज ४ एप्रिल भारत देशातील हिंदी भाषेतील विख्यात,प्रसिद्ध कवी,लेखक तसेच पत्रकार माखनलाल चतुर्वेदी यांची आज जयंती आहे.
माखनलाल चतुर्वेदी यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
माखनलाल चतुर्वेदी यांना सोप्या भाषेचा ज्वलंत भावनांचा एक अद्वितीय हिंदी निर्माता म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते.
प्रभा तसेच कर्मवीर नावाच्या प्रतिष्ठित वृतपत्राचे ते संपादक होते.हया वृत्तपत्रातुन माखनलाल चतुर्वेदी यांनी ब्रिटीश शासनाविरूदध जोरदार प्रचार प्रसार केला होता.
गुलामगिरीच्या बेडया काढुन नवीन पिढीला बाहेर येण्यासाठी आवाहन माखनलाल चतुर्वेदी यांनी ह्या दोन्ही वृत्तपत्रातुन केले.त्यांच्या ह्या देशभक्ती पर कार्यामुळे त्यांना अनेकदा ब्रिटीशांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले होते.
माखनलाल चतुर्वेदी यांच्या कवितांमध्ये त्यांच्या मनात असलेली देशभक्ती स्पष्टपणे झळकते याचसोबत त्यांच्या कवितांमधून प्रेम अणि निसर्ग याचे चित्रण करण्यात आले आहे.माखनलाल यांच्या हया कार्यामुळे लोक त्यांना युगप्रवर्तक म्हणून देखील ओळखत असत.
पंडित माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्म १८८९ मध्ये मध्य प्रदेश मधील होशंगाबाद जिल्ह्यातील बाबई नावाच्या एका गावामध्ये झाला होता.
अध्ययन अणि साहित्य निर्मिती मध्ये विशेष रूची असलेले पंडित माखनलाल चतुर्वेदी हे खुप कमी वयात म्हणजे फक्त १६ वर्षाचे असताना शिक्षक बनले होते.
पंडित माखनलाल चतुर्वेदी यांनी प्राथमिक शिक्षणानंतर संस्कृत,गुजराती, इंग्रजी, इत्यादी भाषांचे ज्ञान घरबसल्या प्राप्त केले.
माखनलाल चतुर्वेदी यांच्या वडिलांचे नाव नंदलाल चतुर्वेदी असे होते.
माखनलाल चतुर्वेदी यांना मिळालेले पुरस्कार सन्मान –
1943 मध्ये माखनलाल चतुर्वेदी यांना त्याकाळातील हिंदी साहित्यातील सर्वात मोठा ‘देव पुरस्कार हिम किरीटिनी देऊन सन्मानित करण्यात आले होते.
जेव्हा सर्वात प्रथम 1954 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना करण्यात आली तेव्हा हिंदी साहित्यातील पहिला पुरस्कार माखनलाल चतुर्वेदी यांना हिमतरंगिणी’साठी देण्यात आला होता.
1963 मध्ये भारत सरकारकडुन माखनलाल चतुर्वेदी यांना’पद्मभूषण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
पुष्प की अभिलाषा आणि ‘अमर राष्ट्र’ यांसारख्या सशक्त रचनांचे लेखक अशा ह्या महान कवीच्या कार्यासाठी माखनलाल चतुर्वेदी यांना सागर विद्यापीठाकडुन1959 मध्ये डी लीट म्हणजेच doctor of literature ही साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
माखनलाल चतुर्वेदी यांच्याच नावाने भोपाळ राज्यातील माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठ याची स्थापना करण्यात आली आहे.
1955 मध्ये माखनलाल चतुर्वेदी यांना त्यांच्या ‘हिमतरंगिणी’ या काव्यसंग्रहासाठी हिंदी भाषेत ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
माखनलाल चतुर्वेदी यांच्या काही प्रसिद्ध काव्यरचना –
माता,वेणू लो गुंजे धारा,बिजुरी काजल,आंज राही इत्यादी त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना आहेत.याचसोबत हिमकिरिटिनी,हिम तरंगिणी,युग चरण,समर्पण,शमारन ज्वर ह्या प्रसिद्ध काव्यरचना देखील त्यांनी रचल्या आहेत.
तसेच कृष्णार्जुन वॉर,गॉड ऑफ लिटरेचर,टाईम्स फीट,रिच इन्टेन्शन्स पुअर इरादे इत्यादी त्यांच्या काही प्रसिद्ध गद्यकृती आहेत.
माखनलाल चतुर्वेदी यांचा मृत्यू ३० जानेवारी १९६८ रोजी झाला होता.
Pandit Makhanlal Chaturvedi (4 April 1889 – 30 January 1968), was an Indian poet, writer, essayist, playwright and a journalist, He received Sahitya Akademi Award for his work Him Taringini in 1955 and was awarded Padma Bhushan in1963.