रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात नुकत्याच एक रामगड नावाचा एक नवीन किल्ला आढळुन आला आहे अशा दावा काही दुर्ग अभ्यासकांनी केलेला आहे.
असे म्हटले जाते आहे की रामगड हा एक लहान किल्ला आहे जो दुर्ग अभ्यासकांना पालगडच्या पुर्व दिशेला समुद्रसपाटीपासून सुमारे ३९० मीटर एवढ्या अंतरावर आढळुन आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की काही दुर्ग अभ्यासकांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली तालुक्याच्या सीमेवर एक किल्ला आढळुन आला आहे.
दुर्ग अभ्यासकांकडुन ह्या किल्ल्याचे नाव रामगढ असे असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की दुर्ग अभ्यासकांना जो नवीन किल्ला आढळुन आला आहे तो पालगड किल्ल्याचा जोडकिल्ला आहे.
महाराष्ट्र राज्यात तसे पाहायला गेले तर एकच एकमेव पालगड किल्ला आहे जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे
अणि आता दुर्ग अभ्यासकांनी हा दुसरा पालगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली तालुक्यात असल्याचे सांगितले आहे.
हा किल्ला कधी बांधण्यात आला होता याविषयी दुर्ग अभ्यासकांना कुठलीही विशेष अणि सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झाली नाहीये.पण दुर्ग अभ्यासकांनी असा अंदाज वर्तवला आहे की पालगड किल्ल्याबरोबरच हा किल्लयाची बांधणी झाली असावी.
कोणाला आढळून आला हा नवीन किल्ला –
दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे अणि पुणे येथील डेक्कन कॉलेज मधील अभ्यासक सचिन जोशी या दोघांनी हा किल्ला आढळुन आल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत या दोघांनी एक विशेष अहवाल सादर केला आहे हा अहवाल विविध ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तु रचनेवर आधारलेला आहे.
दुर्ग अभ्यासकांनी असे सांगितले आहे की त्यांनी ह्या किल्ल्याचे सॅटलाईट फोटो सुदधा काढले आहेत.अणि विशेष बाब म्हणजे ह्या काढलेल्या फोटोत बांधकामांचे अवशेष देखील आढळून आले आहे असे दुर्ग अभ्यासकांनी सांगितले आहे.
ह्या किल्ल्यावर दुर्ग अभ्यासकांना काही भांडयांचे थडगयांचे अवशेष सापडले आहे असे सांगितले जात आहे.हया किल्ल्याचे सर्वेक्षण देखील केले गेले आहे ज्यात किल्ल्याचे संरक्षक बुरूज किल्ल्याचे तुटलेले दवार इत्यादी गोष्टी अभ्यासकांना आढळुन आल्या आहेत.
यामुळे भारताच्या ऐतिहासिक ठेव्यातील वारसा असलेला एक नवीन किल्ला आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभणार आहे.ह्या किल्यामुळे आता एक नवीन इतिहास समोर येणार हे नक्कीच झाले आहे.