नवीन पेंशन योजनेमध्ये कर्मचारींना ग्रॅज्युएटीचा अणि फॅमिली पेंशनचा लाभ दिला जाणार – New pension scheme latest update in Marathi

नवीन पेंशन योजनेमध्ये कर्मचारींना ग्रॅज्युएटीचा अणि फॅमिली पेंशनचा लाभ दिला जाणार New pension scheme latest update in Marathi

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे शासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे त्यानुसार नवीन पेंशन योजनेमध्ये सर्व राज्य सरकारी कर्मचारी वर्गाला ग्रॅज्युएटीचा लाभ देखील प्रदान करण्यात येणार आहे.

New pension scheme latest update in Marathi
New pension scheme latest update in Marathi

याचसोबत शासनाने अजुन एक घोषणा केली आहे समजा सेवेत असताना एखाद्या कर्मचारी वर्गाचा मृत्यु झाला तर अशा परिस्थितीत त्या मृत कर्मचारीच्या परिवाराला जुन्या पेंशन योजनेचा लाभ प्राप्त करून दिला जाईल.

शासनाच्या ह्या नवीन निर्णयामुळे आता २००५ नंतर निवृत्त झाले आहे अशा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ग्रॅज्युएटीचा लाभ घेता येणार आहे.

शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर जुनी पेन्शन योजना जरी पुर्णपणे लागु केली नाहीये पण तरी देखील पेंशन योजनेच्या सवलतीमध्ये बदल नक्कीच शासनाकडुन आता कर्मचारी वर्गाच्या हिताच्या दृष्टीने केले जात आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या ह्या निर्णयामुळे ग्रॅज्युएटीचा अणि फॅमिली पेंशन या दोन सुविधांचा लाभ प्राप्त होणार आहे.

नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडुन आंदोलन करण्यात आले होते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी शासनाने एक तोडगा काढला होता ज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करण्याकरीता देवेंद्र फडणवीस यांनी तीन सेवानिवृत्त कर्मचारींची सनदी नियुक्त केली होती.

यानंतर सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यायला होकार दर्शवला होता.

सरकारने जरी नवी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना पुर्णत लागू केली नसली तरी कर्मचारींच्या मागण्यांचा विचार करून आवश्यक ते बदल नवीन पेंशन योजनेमध्ये करायला नक्कीच सुरूवात केली असल्याचे आपणास यावरून दिसून येते.

See also  फक्त एकदा गुंतवणूक करून महिलांना बचतीवर मिळणार ७.५ टक्के इतके व्याज । Mahila Sanman Saving Certificate Scheme In Marathi