कोण आहे हा पाण्यावर तरंगणारा बाबा? हिंगोलीत यांच्या विषयी एवढी चर्चा का होत आहे? – Viral Video of Hingoli Baba

कोण आहे हा पाण्यावर तरंगणारा बाबा?हिंगोलीत यांच्या विषयी एवढी चर्चा का होत आहे?

महाराष्ट्र राज्यात सध्या अनेक नवनवीन बाबा दिवसेंदिवस उदयास येत आहे.

ज्यात आपण बागेश्वर बाबा बघितले जे आपल्याकडे दिव्य दृष्टी आहे अणि आपणास लोकांच्या मनात असलेल्या गोष्टी ओळखता येतात असा दावा ते करत होते.आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी ते चर्चेचा विषय ठरत आहे.

यानंतर करोली बाबा जे वैदिक उपचार पदधतीने आपण कुठलाही दुर्धर आजार देखील बरा करू शकतो असा दावा करोली बाबा यांच्या कडून केला गेला होता.स्वताला कालीमतेचे भक्त म्हणुन घेणारे कालीचरण बाबा देखील आपण बघितले.

असे अनेक नवनवीन गोष्टी साध्य करण्याचा दावा करणारे वादग्रस्त वक्तव्य करणारे बाबा आतापर्यंत आपण टिव्हीवर ऐकले अणि पाहीले आहेत.

पण नुकत्याच हाती आलेल्या एका नवीन अपडेट नुसार महाराष्ट्रात अजुन एक नवीन बाबा उदयास आला आहे जो पाण्यावर तरंगण्याचा दावा लोकांसमोर करत आहे.

कोण आहेत पाण्यावर तरंगणारे बाबा?

Viral Video of Hingoli Baba
कोण आहेत पाण्यावर तरंगणारे बाबा?

ह्या बाबाचे नाव भागवताचार्य हरिभाऊ राठोड असे असल्याचे सांगितले जात आहे.

काय दावा केला आहे ह्या बाबाने?

मी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ हात पाय न हलवता सुदधा पाण्यात तरंगु शकतो असा दावा ह्या बाबांकडून केला जात आहे.

याविषयी स्पष्टीकरण देताना माझे पिता देखील पाण्यावर असेच तरंगत होते ईशवराचे नामस्मरण करून उपवास करून जप तप पारायण करून कुठल्याही व्यक्तीला पाण्यावर तरंगता येते किंवा उभे देखील राहता येते असे ह्या बाबाने सांगितले आहे.

मनात कुठलेही पाप ठेवले नाही सर्व माता माऊलींचा आदर केला तर ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात असे ह्या बाबांनी सांगितले आहे.

See also  प्रेस सेंशरशीप कशाला म्हणतात? Press Censorship in Marathi

बाबांविषयी त्यांच्या भक्तजणांनी गावकरींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया –

बाबांच्या अनेक भक्तांनी त्यांच्या आजुबाजुच्या गावकरी यांनी असे सांगितले आहे की पाण्यावर चालणे तरंगणे ही भागवताचार्य हरिभाऊ राठोड यांची वडिलांपासुन चालत असलेली परंपरा आहे बाबांनी त्याग केला आहे म्हणून त्यांना ही सिदधी प्राप्त झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की हिंगोली जिल्ह्यातील एका गावात एक नवीन बाबा अवतरला आहे जो आपण पाण्यावर तरंगतो असा दावा लोकांसमोर करत आहे.

ह्या पाण्यावर तरगंंणारया बाबाचे व्हिडिओ देखील सोशल मिडिया वर व्हायरल होताना आपणास दिसून येत आहे.

यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या एका व्यक्तीने एबीपी माझाशी बोलताना असे म्हटले आहे की जागोजागी असे अनेक बाबा उदयास येत आहे जे काहीतरी कलेचा अणि विज्ञानाचा उपयोग करून चमत्कार दाखवण्याचा आपणास दावा करतात.

अणि मग आपल्या दाखवलेल्या चमत्कार कलेला धर्म अणि आध्यात्म यांच्याशी जोडत असतात.अणि सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत असतात.लोकांची वाहवाह प्राप्त करत असतात.

लवकरच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संबंधित बाबांच्या निवासस्थानी जाऊन याविषयी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

अणि असे कुठलेही चमत्कार अस्तित्वात मुळात नाहीये ही निव्वळ हातचलाखी अंधश्रद्धा आहे जी करून अनेक बाबा लोक गरीब जनतेच्या भावनेशी खेळत आहे.हे सिदध करून दाखवण्याचा दावा केला आहे.

यावर बाबांचे असे म्हटले जाते आहे की ही एक सिदधी आहे जी त्यांना वडिलांपासुन प्राप्त झाली आहे कुठलीही अंधश्रद्धा वगैरे नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्यक्तीने असे देखील सांगितले आहे की जर हा तरंगणारा बाबा चमत्कार करू शकतो असा दावा करत असेल तर जादु टोणा अधिनियम कायदा अंतर्गत त्याच्या वर कठोर कारवाई केली जाईल.

कारण जादु टोणा अधिनियम कायदा अंतर्गत कुठल्याही व्यक्तीला आपण चमत्कार करू शकतो असा दावा करता येत नाही असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ह्या व्यक्तीने सांगितले आहे.

See also  आपल्या जिवलग अणि सर्वोत्तम मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday wishes for best friend in Marathi