Chaitra Purnima 2023 In Marathi
हिंदू धर्मात चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पुराणांनुसार चैत्र पौर्णिमेस विशेष पूजा केल्यास विष्णू देवांची कृपादृष्टी आपल्यावर असते. चैत्र पौर्णिमेबरोबरच हनुमान जयंतीही साजरी केली जाते. चला तर मग पाहूया चैत्र पौर्णिमा व्रत ५ किंवा ६ एप्रिल केव्हा केला जाईल. तसेच, चैत्र पौर्णिमा पूजेची शुभ वेळ, महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत देखील जाणून घ्या.
आज किती वाजता आहे चैत्र पौर्णिमा?
या वर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा ५ एप्रिल म्हणजे आज की उद्या बुधवारी ६ एप्रिलला नक्की कधी साजरी करायची आहे. याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. हिंदू पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी ५ एप्रिलला सकाळी ९.१९ वाजता सुरू होईल आणि ६ एप्रिलला सकाळी १०.०४ पर्यंत असणार आहे.
चैत्र पौर्णिमा पूजा विधी
- चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही नदीमध्ये स्नान करा. जवळपास नदी नसल्यास घरीच पाण्यात गंगा जल टाकून स्नान करा.
- त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
- त्यानंतर घरातील देवी-देवतांची पूजा करा.
- गरीब, गरजू लोकांना दान द्या.
- या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये श्री सत्य नारायणाची पूजा करा. कथेचे वाचन करा.
- तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण मंत्राचा जप करा.
चैत्र पौर्णिमेचे महत्व
चैत्र महिन्यात मार्तंड भैरव अवतार दिन, श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, होम हवन व पालखी सोहळा असतो. हा हनुमानाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात. चैत्र पौर्णिमा या दिवशी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते.
याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खीर दिली होती. असं म्हणतात चैत्र पौर्णिमेस कृष्ण देवांनी रासलीला केली होती आणि सर्व गोपीकांसोबत कृष्ण देवांनी रात्रभर नृत्य केले होते. ब्रज मध्ये केलेल्या या उत्सवास महारास असेही म्हणतात.
पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. हिंदू वर्षानुसार ही या वर्षातली पहिली पौर्णिमा आहे.
Chaitra Purnima 2023 In Marathi