इलाॅन मस्कने टविटरचा लोगो का बदलला? Why Elon Musk changed Twitter logo

इलाॅन मस्कने टविटरचा लोगो का बदलला? Why Elon Musk changed Twitter logo

नुकतेच इलाॅन मस्क याने टविटरचा जुना लोगो बदलुन त्याजागी नवीन लोगो सेट केला आहे.

आधी आपल्याला ट्विटरच्या लोगोवर उडणारया निळया रंगाच्या पक्षीचे चित्र दिसुन येत होते पण आता आपणास ट्विटरच्या लोगोवर कुत्र्याचे म्हणजेच एका डाॅगीचे चित्र दिसुन येत आहे.

याच्याशी संबंधित एक टविट देखील इलाॅन मस्क याने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून केले आहे.

इलाॅन मस्क याने एक टविट केले आहे ज्यात एक डॉगी म्हणजे कुत्रा गाडीवर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आपणास दिसून येत आहे आणि हा कुत्रा ट्रॅफिक पोलिसांना आपले लायसन्स दाखवत आहे.

अणि ह्या लायसनवर ट्विटरचा जुना लोगो म्हणजेच निळ्या पक्षीचे चित्र सुदधा दिलेले आहे.

ह्या चित्रात असे दाखवले गेले आहे की हा डाॅगी ट्रॅफिक पोलिसांना असे सांगतो आहे की हा माझा जुना फोटो म्हणजेच जुना लोगो आहे.

पण अजुन ट्विटरच्या अॅपवरील लोगो हा इलाॅनने काढलेला नाहीये.फक्त वेबव्हरजन डेस्क टॉपवर आपणास हा लोगो दिसुन येत आहे.

इलाॅन मस्क यांच्या ह्या नवीन टविटर लोगोमुळे सोशल मिडिया वर चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.अनेक जण ट्विट करून इलाॅन मस्क यांच्या ह्या निर्णयावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना आपणास दिसून येत आहे.

कारण लोगो हा कोणत्याही कंपनीच्या ब्रँडची ओळख ठरत असतो अणि इलाॅनने ओळखच चेंज केल्याने सगळीकडे याबाबत चर्चा सुरू आहे.

अनेक जण असे देखील म्हणत आहे टविटरके लोगो से चिडिया हटाके इलाॅन मस्कने कुत्ता लगा दिया है टविटरका नया सीईओ बडा कमाल है अशा देखील प्रतिक्रिया ट्विटरवर पोस्ट होताना दिसुन येत आहेत.

अशावेळी आपल्या देखील मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की इलाॅन मस्कने टविटरचा लोगो का बदलला निळा पक्षीचा एवढा जुना लोगो बदलुन इलाॅन मस्कने कुत्र्याचे चित्र ट्विटरच्या लोगोवर का सेट केले असावे?

See also  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोण होते?महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणते सामाजिक कार्य केले? -Maharshi Vitthal Ramji Shinde

अणि टविटर अकाऊंट वरून इलाॅन मस्क ह्या डाॅगीला वारंवार प्रमोट का करतो आहे.

आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

इलाॅन मस्कने टविटरचा लोगो बदलल्याची कोणकोणती कारणे सोशल मिडिया वर सांगितली जात आहेत?

इलाॅन मस्क याने ट्विटरचा लोगो का बदलला याबाबत प्रत्येक जण आपापली वेगवेगळी मते मांडताना दिसुन येत आहे.

यातील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत –

डोजे काॅईनला प्रमोट करण्यासाठी –

अनेक जणांनी असे मत व्यक्त केले आहे की इलाॅन मस्कने टविटरचा जो नवीन लोगो सेट केला आहे तो डोजेचा लोगो आहे.डोजे काॅईन हा एक क्रिप्टोकरंसीचा प्रकार आहे असे सांगितले जात आहे.

आपल्या टविटरवरून अनेक ठिकाणी इलाॅन मस्क हा डोजेचे मीम्स देखील शेअर करताना दिसुन आला आहे म्हणून इलाॅन मस्क हा डोजेकाॅईनला मार्केटमध्ये प्रमोट करण्यासाठी असे करत असावा अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

अशी शक्यता वर्तवली जाण्याचे कारण म्हणजे ज्या दिवशी इलाॅन मस्कने आपला डोजेचा नवीन लोगो टविटरवर सेट केला त्याच दिवशी डोजेकाॅईनची किंमत २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे असे सांगितले जात आहे.

असे सांगितले जात आहे ज्या कुत्र्याचा लोगो इलाॅन मस्कने सेट केला आहे त्याचे नाव काबुसु असे आहे.हा कुत्रा एका चर्चित मीम्सचा एकेकाळी भाग होता असे सांगितले जाते.

ह्या लोकप्रिय कुत्र्याशी संबंधित सर्व तयार केलेल्या मीम्सला डोजे मीम्स असे म्हणुन ओळखले जाते.हयाच कुत्र्याच्या नावावर डोजेकाॅईन ह्या नावाची एक क्रिप्टोकरंसी देखील सुरू करण्यात आली होती.