डाँ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे 29प्रेरणादायी विचार कोटस – Apj Abdul Kalam 29 Inspirational Quotes And Thoughts In Marathi

डाँ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे 29प्रेरणादायी विचार कोटस Apj Abdul Kalam 29 Inspirational Quotes And Thoughts In Marathi

1)स्वप्र ते नसते जे आपण झोपल्यावर आपल्याला दिसुन येते.स्वप्र ते असते जे आपणास शांतपणे झोपु देत नाही.

2) छोटे ध्येय बाळगणे हा एक अपराध आहे म्हणुन तरूणांनी नेहमी महान अणि मोठी ध्येये आपल्या डोळयासमोर ठेवायला हवी.

3) जर आपला जन्म पंखासोबत झाला आहे मग आपण का रांगत बसावे त्याच पंखानी उडायला शिकावे.

4) यश प्राप्त करण्यासाठी संयम बाळगणे फार गरजेचे असते.

5) जर आपणास सुर्यासारखे चमकायचे आहे तर आधी सुर्यासारखे जळावे देखील लागेल.

6) सगळयांच्या अंगी सारखीच कला नसते.पण त्या कौशल्याचा लाभ उठविण्याची संधी सर्वाना सारखीच प्राप्त होत असते.

7) कधीही संधीची वाट पाहत बसु नका कारण वाट पाहणारे तेवढेच प्राप्त करतात जेवढे प्रयत्न करणारा त्यांच्यासाठी सोडुन जात असतो.

8) वाईट व्यक्तींच्या सान्निध्यात राहण्यापेक्षा एकटे राहणे अधिक चांगले.

9) असा जगातील कुठलाच धर्म नाही जो स्वताला टिकवण्याकरीता वाढवण्याकरीता दुसरयांचे प्राण घ्यायला सांगतो.

10) एखाद्याला हरविणे खुपच सोपे असते पण त्याला जिंकणे आपलेसे करून घेणे खुप अवघड असते.

11) कुठलेही स्वप्र सत्यात उतरवण्यासाठी आधी ते पाहावे लागते.

12) आपण जर एखादे स्वप्र पाहु शकतो तर ते साकार देखील करू शकतो.

13) आपण आपले भविष्य तर बदलु शकत नाही पण वाईट सवयी लकबी नक्कीच बदलु शकतो.

14) जेव्हा पावसाचा आरंभ होत असतो तेव्हा इतर पक्षी आपापल्या घरटयात आश्रयासाठी जातात.पण गरूड हा ह्याच पावसापासून स्वताला वाचवायला ढगांवरून उंच भरारी घेत असतो.

15) राष्टातील सर्वात हुशार अणि सर्वाधिक बुदधिमत्ता असलेले व्यक्ती नेहमी शाळेत वर्गामधील शेवटच्या बाकावर बसलेले दिसुन येतात.

16) ज्या व्यक्तीची निष्ठा यशाच्या बाबतीत अत्यंत मजबुत असेल तो कधीच निराश होऊन बसत नाही.

See also  भारतातील आय.आय.एम महाविद्यालयांची महिती - IIM Collages Marathi information

17) पहिले यश प्राप्त झाल्यानंतर कधीही बसुन राहु नये नाहीतर लोक म्हणतील पहिले यश आपणास नशिबाने प्राप्त झाले होते.

18) आपण स्वप्र बघावीत त्या दृष्टीने विचार करावेत अणि त्याला अनुसरून योग्य ती कृती देखील करायला हवी.

19) जो अपयशाची कडु गोळी चाखत नाही त्याला यशाचे खरे महत्व अणि मोल,किंमत कळत नाही.

20) तरुणांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा इतरांपेक्षा वेगळा विचार करावा काहीतरी नाविण्यपुर्ण करण्यास प्रयत्नशील असावे अणि अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवायला हव्यात.

21) ह्या जगात भित्र्यांना कोणाताच मान सन्मान प्राप्त होत नसतो.आदर अणि सम्मान सामर्थयवान व्यक्तींचाच केला जात असतो.

22) अपयश नावाच्या व्याधीवर आत्मविश्वास अणि कठिन परिश्रम हे एक गुणकारी औषध ठरते.

23) विज्ञान तंत्रज्ञान मानवास प्राप्त झालेले अनमोल भेटवस्तु आहे आपण त्याला अजिबात खराब करू नये.

24) ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्याची पाऊले सदैव अपयशाच्या तीन पाऊल पुढेच असतात.

25) शिक्षणाने आपल्यात सर्जनशीलतेची निर्मिती होते.आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता येते.आपल्या ज्ञानात वाढ होते अणि आपले व्यक्तीमत्व महान बनु लागते.

26) जीवणात अडीअडचणी पण येणे गरजेचे आहे.कारण यानेच आपणास यशाचा आनंद उपभोगता येत असतो.

27) यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्तीचे पालन करणे फार आवश्यक असते.

28) जीवणात कितीही संकटे आली तरी देखील त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवायला हवी.

29) आपल्या जीवणात येणारया अडीअडचणी वाईट प्रसंग यांनीच आपल्यातील आत्मबळात वाढ होते.