पँरेंट कंट्रोल विषयी माहीती – Parent Control Information In Marathi
एक वेळ अशी होती की आधी आपल्याला एखाद्या विषयावर माहीती हवी असायची तर आपण ग्रंथालयात जाऊन त्याचे पुस्तक वाचायचो संदर्भासाठी वर्तमानपत्रातील लेख वाचायचो.
पण आता तसे राहिलेले नाहीये जग आता पुर्णपणे डिजीटल झाले आहे.
मित्रांनो आजचे युग हे डिजीटल टेक्नाँलाँजीचे युग आहे युग आहे जिथे आपल्याला कोणत्याही विषयावरची माहीती इंटरनेटवर आज सहज एका जागी बसुन आँनलाईन गुगलवर सर्च करून उपलब्ध होते.
एवढेच काय तर आज जाँब शोधणे बिझनेस करणे हे देखील सर्व आँनलाईन पदधतीने घडुन येत आहे.सर्व आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार आँनलाईनच घडुन येत आहे.
साहजिकच आहे डिजीटल क्रांती घडुन येते आहे तर त्याचा आपल्या जीवणावर देखील प्रभाव पडणारच आहे.कारण जग माँर्डन होऊ लागले आहे.
लहान लहान मुले देखील आता अँड्राईड मोबाईलचा वापर करताना स्मार्टफोन हाताळताना दिसुन येतात.
अणि त्यातच एवढया लहान वयात मुलांनी मोबाईल वापरणे योग्य नाही म्हणुन पालकांनी त्यांना मनाई केली तरी मुले मोबाईलचा वापर करणे सोडत नसतात.सतत मोबाईलचा हटट करत असतात.
कारण लहान मुलांना आपल्या आई वडिलांच्या मोबाइलवर अँड्राईड गेम खेळायला अधिक आवडत असते.
पण अशावेळी आईवडिलांच्या मनात ही भीती अणि विचार चाललेले असतात की चुकुन आपल्या मुलाने मोबाइलवर अँडल्ट पाँर्न साईट ओपन केली किंवा तो त्यावर गेला तर काय करायचे?अशा वेळी त्याला आळा कसा घालायचा?
आपला मुलगा मोबाइलवर गेमच खेळतो आहे की इतर अश्लील चित्र व्हिडिओ बघतो आहे हे आपणास कसे कळणार?अणि आपला मुलगा अँडल्ट साईटवर जाऊ नये यासाठी आपण काय उपाय करू शकतो?
आपल्याला देखील हीच समस्या भेडसावते आहे तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.
कारण आजच्या लेखात आपण पालकांसाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त असलेले फिचर पँरेंट कंट्रोल विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
पँरेट कंट्रोल काय आहे?
पँरेट कंट्रोल हे एक फिचर आहे जे अँड्राईड मोबाइल, लँपटाँप तसेच टिव्ही या दोघांमध्ये उपलब्ध असते.
याच्यादवारे पालक हे नियंत्रित करू शकतात तसेच ठरवू शकतात की गुगलवर,युटयुबवर,मोबाईलमधील प्लेस्टोअरवर सर्च केल्यावर कोणती अँप गेम वेबसाइट दिसायला हवी?आपल्या मुलाला काय कंटेट दिसायला हवे?काय दिसायला नको?
जो कंटेट त्यांना लहानपणात दिसायला नको आहे जो बघणे त्यांच्यासाठी योग्य नाहीये ज्याचे त्यांच्यावर घातक अणि वाईट परिणाम होऊ शकतात त्यावर आपण पँरेट कंट्रोल दवारे काही सेटिंग करून बंदी घालू शकतो.
उदा,अश्लील फोटो व्हिडिओ पाँर्न अँडल्ट साईटस इत्यादी.
पँरेट कंट्रोल फिचरची आवश्यकता का आहे
?पँरेट कंट्रोल सेट करणे गरजेचे का झाले आहे?
पँरेट कंट्रोलची आवश्यकता यासाठी आहे की आईवडील दिवसभर आपली महत्वाची कामे सोडुन चोवीस तास त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकत नाही कारण ते आपल्या कामात बिझी असतात.आई घरकामात बिझी असते वडील आँफिसमध्ये असतात.
अशावेळी आपला मुलगा आईच्या तसेच वडिलांच्या किंवा घरातील कुठल्याही मोबाईलवरून रोज घरात बसुन काय पाहतो आहे रोज दिवसभरात काय सर्च करतो आहे हे त्यांना कळणे अशक्य आहे.
याचसाठी आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाइल देण्याअगोदर त्यावर पँरेंट कंट्रोल सेट करणे गरजेचे आहे.याने आपण निश्चिंत असतो की आपला मुलगा मोबाइलवर चुकीचा तसेच त्याच्या बुदधीवर वाईट परिणाम होईल असा कुठलाही कंटेट बघत नाहीये.
उदा,मागे ब्लू व्हेल नावाचा एक गेम आला होता ज्याच्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम झाला अणि कित्येक लहान मुलांचा त्यात बळी गेला.असे आपल्या मुलासोबत देखील घडु नये म्हणुन पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
यासाठी आपला मुलगा मुलगी सोशल मिडियावर कोणाशी चँट करतात?कोणाच्या संपर्कात राहतात?रोज मोबाइल वर कशा वेबसीरीज बघतात हे लक्ष ठेवणे अणि त्यावर वेळ असताच नियंत्रण करणे पालकांसाठी गरजेचे आहे.
गुगल प्ले स्टोअर वर पँरेट कंट्रोल सेट कसा करतात?
K● सगळयात पहिले आपल्या मोबाइल मधील गुगल प्लेस्टोअरवर जायचे अणि त्यात सर्च बारच्या उजव्या बाजुला कोपरयात क्लीक करायचे.
● यानंतर आपल्याला खुप आँप्शन दिसुन येतील त्यात आपण Settings ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
● Setting मध्ये गेल्यावर आपणास Family नावाचे एक आँप्शन दिसुन येईल.
● Family आँप्शन वर ओके केल्यावर आपल्याला Parent Control नावाचे एक फंक्शन दिसुन येईल.
● Parent Control मध्ये जाऊन आपण पाहिजे त्या प्रकारच्या कंटेटवर अँप्स,गेम,मुव्ही वर पिन सेट करून बंदी घालू शकतो.जेणेकरून गुगल फ्लेस्टोअर वर आपला मुलगा गेला तरी त्याला त्या प्रकारचे कंटेट अजिबात दिसुन येणार नाही.जे आपल्या मुलाला दिसु नये असे आपणास वाटते.
युटयुबवर पँरेंट कंट्रोल कसे सेट करावे?
● सगळयात पहिले आपण आपले युटयुब ओपन करून घ्यावे.
● युटयुब ओपन केल्यावर आपणास उजव्या हाताला तीन डाँट दिसुन येतील.त्यावर क्लीक करावे.
● तीन डाँट वर क्लीक केल्यावर आपल्याला Settings नावाचे एक आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लीक करावे.
● Settings मध्ये आपण General Option मध्ये जाऊन Restricted Mode Select करावे.अणि ते आँन करून घ्यावे.याने आपल्या पाल्यास अँडल्ट कंटेट दिसणार नाही.
हीच सुविधा प्रत्येक अँड्राईड मोबाईलच्या सेटिंग मध्ये देखील Digital Well Being And Parents Control या नावाने उपलब्ध आहे यात आपण पाहिजे त्या कंटेटवर Restriction आणु शकतो.
पँरेट कंट्रोल सेट करण्याचे फायदे –
● आपला पाल्याला मोबाइल इंटरनेटवर त्याने त्याच्या वयाच्या मानाने बघणे योग्य नाही असा कुठलाही चुकीचा म्हणजेच अँडल्ट सेक्शुअल कंटेट दिसणार नाही.
● आपण निश्चिंत होऊन कुठलीही चिंता न करता आपल्या मुलाच्या हातात मोबाइल देऊ शकतो.
● आपल्या मुलाने मोबाइलवर काय बघावे?काय नही बघावे? हे सर्व आपण पँरेंट कंट्रोलदवारे नियंत्रित करू शकतो.