पीएम किसान योजनेचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर योजनेचा लाभ करण्यासाठी ही तीन कामे आत्ताच करून घ्या अन्यथा १४ व्या हप्त्याचा लाभ प्राप्त होणार नाही PM kisan samman nidhi yojana 14th installment in Marathi

पीएम किसान योजनेचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर योजनेचा लाभ करण्यासाठी ही तीन कामे आत्ताच करून घ्या अन्यथा १४ व्या हप्त्याचा लाभ प्राप्त होणार नाही pm kisan samman nidhi yojana 14th installment in Marathi

पीएम किसान योजना ही शासनाची अशी एक महत्वाची योजना आहे जिच्या अंतर्गत गरजु शेतकरी बांधवांना आर्थिक मदत प्रदान केली जात आहे.

पीएम किसान योजना अंतर्गत गरजु शेतकरी बांधवांच्या खात्यात प्रत्येक वेळी चार महिन्यांच्या कालावधीत तीन हप्तांमध्ये दोन हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे.

आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या १३ हप्त्यांचे पैसे आपल्या खात्यावर प्राप्त झाले आहेत.

अणि आता लवकरच ह्या जुन महिन्याच्या अखेरपर्यंत पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम देखील शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावर प्राप्त होणार आहे.

सर्व लाभार्थी १४ वा हप्ता खात्यात जमा होण्याची आतुरतेने वाट देखील पाहत आहे.

पण पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता आपल्या खात्यात प्राप्त करण्यासाठी,योजनेच्या १४ व्या हप्त्यापासुन वंचित न राहण्यासाठी शेतकरी बांधवांना तीन कामे करणे आवश्यक आहे.ही तीन कामे न केल्यास शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम खात्यात पाठवली जाणार नाहीये.

ही तीन कामे कोणती आहेत जी पीएम किसान योजनेचा १४ व्या हप्त्याचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना करणे बंधनकारक करण्यात आले आहे हेच आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

१) आधार कार्ड अणि बॅक खाते लिंक करणे –

ज्या शेतकऱ्यांनी अजुनही आपले आधार कार्ड आपल्या अॅक्टिव्ह बँक खात्यासोबत लिंक केले नाहीये अशा शेतकऱ्यांनी आजच आपले आधार कार्ड बॅक खात्यासोबत लिंक करून घ्यायचे आहे.

))ई केवायसी प्रमाणीकरण करणे –

पीएम किसान योजनेचा लाभ फक्त देशातील गरीब शेतकऱ्यांना प्राप्त व्हावा म्हणून शासनाने ईकेवायसी करणे आता सर्वांसाठी बंधनकारक केले आहे.

See also  ९५ व्या ऑस्कर पुरस्कार २०२३ चे विजेते - 95 th Oscar award 2023 winner in Marathi

सदर योजनेचा लाभ करण्यासाठी सरकारची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने ई केवायसी करणे आता बंधनकारक केले आहे.

म्हणुन सर्व लाभार्थी शेतकऱी जे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे नोंदणीकृत पात्र लाभार्थी आहेत त्यांनी ह्या योजनेचा लाभ आपणास अखंडीत पणे प्राप्त व्हावा यासाठी ईकेवायसी करणे आवश्यक असणार आहे.

३) जमिनीचा तपशील योग्य करणे –

इथे आपणास जमिनीचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

सरकारने लॅण्ड सिडिंग नावाचे एक अपडेट दिले होते ज्यात असे दिले होते की ज्या शेतकऱ्यांचे लॅड सिडिंग नो असेल त्यांना लाभाची रक्कम दिली जाणार नाही.

म्हणुन सगळ्यात पहिले आपणास आपले लॅड सिडिंग स्टेटस चेक करावे लागेल त्यात yes दिले असल्यास कुठलीही अडचण नाही पण no दाखवत असल्यास लॅड सिडिंग करीता आपणास काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.जेणेकरून लॅड सिडिंग yes. होईल.

शेतकऱ्यांना तीन पदधतीने ईकेवायसी करता येईल-

१)csc centre –

ईकेवायसी करण्यासाठी आपण एखाद्या सीएससी सेंटरवर जाऊ शकतात.

२)pm kisan goi app –

किंवा ईकेवायसी करण्यासाठी आपण केंद्र सरकारच्या pm kisan goi हे अॅप देखील डाऊनलोड करू शकतात.त्यावरून देखील आपण चेहरा दाखवून ई केवायसी करू शकतो.

3) किंवा पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या फार्मर काॅनर मधील otp based ekyc ह्या सुविधेचा वापर करून देखील आपण ईकेवायसी करू शकतो.

म्हणजे ईकेवायसी करण्यासाठी आपण फिंगरप्रिंट देऊ शकतो ओटीपी दवारे ईकेवायसी करू शकतो किंवा अॅपदवारे चेहरा दाखवून देखील ईकेवायसी करू शकतो.

पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ईकेवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया –

सर्वप्रथम आपणास‌‌ पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

यानंतर होम पेज वरील उजवीकडे दिलेल्या e kyc ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपणास आपला आधार नंबर अणि खाली दिलेला कॅपच्या कोड बाॅक्स मध्ये जसाच्या तसा भरून सर्च वर क्लिक करायचे आहे.

See also  बाबासाहेब आंबेडकर निबंध तसेच भाषण - Essay On Dr. Babasaheb Ambedkar

यानंतर आपणास आपल्या आधार कार्ड सोबत संलग्नित असलेला मोबाईल नंबर इंटर करायचा आहे.अणि खाली दिलेल्या गेट ओटीपी वर क्लिक करायचे आहे.

यानंतर मोबाईल वर आलेला ओटीपी enter otp मध्ये भरायचा आहे.