कोण आहे कमला सोहोनी ज्यांची गुगल डुडल द्वारे साजरा करत आहे ११२ वी जयंती

कोण आहे कमला सोहोनी ज्यांची गुगल डुडल द्वारे साजरा करत आहे ११२ वी जयंती

भारतीय शास्त्रज्ञ म्हणून ख्याती असलेल्या कमला सोहोनी यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना आपल्या डुडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

कमला सोहोनी कोण होत्या?

कमला सोहोनी ह्या एक बायोकेमिस्ट,महिला शास्त्रज्ञ आहेत.कमला सोहोनी यांनी बायोकेमिस्ट क्षेत्रात आपले फार मोलाचे योगदान दिले आहे.

कमला सोहोनी यांना आपण आपल्या भारत देशातील सर्वात प्रथम पीएचडी करणारी स्त्री म्हणून देखील ओळखतो.

कमला सोहोनी भारतातील अशी प्रथम स्त्री होती जिने विज्ञान क्षेत्रात पीएचडी मिळवली होती.ही आजच्या प्रत्येक भारतीय महिलेकरीता अत्यंत अभिमानाची अणि सन्मानाची बाब आहे.

कमला सोहोनी ह्या indian institute of science in Bangalore ह्या भारत देशातील सर्वोत्तम संस्थेमध्ये प्रवेश प्राप्त करणारी पहिली महिला म्हणुन त्यांना ओळखले जाते.

कमला सोहोनी यांना आपल्या नीरा वरील अमुल्य कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

कमला सोहोनी यांना राॅयल इंस्टीटयुट आॅफ सायन्सच्या पहिल्या स्त्री संचालक होण्याचा मान देखील प्राप्त झाला आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये स्त्रियांवर लादल्या जात असलेल्या अटी नियम यांना मोडुन काढत त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांची क्षमता सिद्ध केली.फक्त आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कमला सोहोनी यांनी हे कार्य पार पाडले होते.

यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये महिलांना प्रवेश प्राप्त करण्यासाठी मार्ग मोकळे झाले होते.

कमला सोहोनी यांनी मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र ह्या दोन्ही विषयाचा अभ्यास देखील केला अणि १९३३ मध्ये यात पदवी देखील ग्रहण केली

कमला सोहोनी यांचा जन्म –

कमला सोहोनी यांचा जन्म १९११ मध्ये १८ जुन ह्या तारखेला झाला होता.कमल सोहोनी यांचे जन्म ठिकाण मध्य प्रदेश राज्यातील इंदुर हे आहे.

See also  भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश -Chandrayaan3 makes a soft landing on the Moon.

कमला सोहोनी यांनी लावलेले शोध –

शेंगा मध्ये असलेल्या प्रोटीन्सचा लहान मुलांच्या पोषणात समावेश केल्याने मुलांवर कोणता अणि कशा रीतीने परिणाम होत असतो यावर देखील कमला यांनी संशोधन केले.

कमला सोहोनी यांनी केंब्रिज युनिव्हसिर्टी मधुन रिसर्च स्काॅलरशिप प्राप्त करत सायटो क्रोमसीचा एक शोध देखील लावला होता.हा एक एनगझाईम आहे जो वनस्पतींच्या पेशीत उर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

अशा ह्या महान महिला शास्त्रज्ञ बायोकेमिस्ट क्षेत्रात आपले विशेष योगदान देणाऱ्या महिला कमला सोहोनी यांचा मृत्यू २८ जुन १९९८ रोजी झाला होता.