नवोदय प्रवेश परीक्षेत किती विषय असतात ?परीक्षेचे स्वरूप कसे असते? प्रवेशासाठी किती गुण आवश्यक ? Navodaya class 6 entrance exam information in Marathi

नवोदय प्रवेश परीक्षे-Navodaya class 6 entrance exam information in Marathi

१)नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये एकुण किती विषय असतात?

नवोदय प्रवेश परीक्षा मध्ये आपणास एकुण तीन विषय असतात.पहिला विषय भाषा हा असतो.दुसरा विषय हा गणित असतो.अणि तिसरा विषय मानसिक क्षमता हा असतो.

२)नवोदय प्रवेश परीक्षेत कोणत्या विषयाला एकुण किती गुण असतात?

१) भाषा –

नवोदय प्रवेश परीक्षा मध्ये भाषेचे एकूण २० प्रश्न विचारले जातात ह्या २० प्रश्नांसाठी आपणास २५ गुण दिले जातात.

भाषेमध्ये आपला विषय मराठी असल्यास यात आपणास एकुण चार उतारे मराठी माध्यमाचे सोडविण्यासाठी दिले जातात.किंवा आपला विषय इंग्रजी असल्यास यात आपणास एकुण चार उतारे इंग्रजी माध्यमाचे सोडविण्यासाठी दिले जातात.

हे उतारे बघून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची असतात.प्रत्येक उतारयावर किमान पाच प्रश्न विचारले जातात.

भाषेचा पेपर सोडवण्यासाठी आपणास अर्धा तासाचा म्हणजे ३० मिनिटांचा कालावधी दिला जातो.भाषेचे वेटेज २५ टक्के इतके असते.

Navodaya class 6 entrance exam information in Marath
Navodaya class 6 entrance exam information in Marath

२) अंकगणित –

नवोदय प्रवेश परीक्षेत गणिताचे सुद्धा एकुण २० प्रश्न २५ गुणांसाठी विचारले जातात.हया विषयाचा पेपर सोडवण्यासाठी आपणास अर्धा तासाचा कालावधी दिला जातो.अंकगणिताचे एकुण वेटेज २५ टक्के असते.

यात एकुण ८ प्रश्न सोपे असतात,सहा प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात आणि बाकीचे ६ प्रश्न हे अवघड स्वरूपाचे असतात.जे अवघड सहा प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्यावर आपले मेरीट ठरत असते.

See also  बी एड अणि डीएड मधील फरक _ Difference between BED and DED in Marathi

३) मानसिक क्षमता –

मानसिक क्षमतेमध्ये ४० प्रश्न एकुण ५० गुणांसाठी आपणास विचारले जात असतात.हया विषयाचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ६० मिनिटे म्हणजे एक तासाचा कालावधी दिला जातो.मानसिक क्षमतेचे एकुण वेटेज ५० टक्के असते.पेपरमध्ये चार प्रश्नांचे १० भाग असतात.

मानसिक क्षमता चाचणीत विद्यार्थ्यांना काही आकृत्या दिल्या जातात त्या आकृत्या बघुन त्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात.

यात सारख्या आकृत्या ओळखणे, वेगवेगळ्या आकृत्या ओळखणे,आकृत्यांमधील सहसंबंध ओळखणे,गटात न बसणारया आकृत्या, पाण्यातील किंवा आरशातील आकृती, क्रमाने येत असलेल्या आकृत्या, आकृत्या जोडणे,दोन आकृत्या एकत्र करून पुर्णाकृती करणे,आकृती मधील भाग ओळखणे अशा स्वरूपाचे प्रश्न यात विचारले जातात.

नवोदय प्रवेश परीक्षेत वरील तिन्ही विषय मिळुन एकुण ८० प्रश्न १०० गुणांसाठी विचारले जातात.हे सर्व ८० प्रश्न सोडविण्यासाठी आपणास २ तासाचा कालावधी म्हणजे १२० मिनिटे दिली जातात.एका प्रश्न १.२५ गुणांचा असतो.

परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ निवड प्रकाराचे विचारले जातात.हया परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते.हया परीक्षेत शहरी भागाला २५ टक्के अणि ग्रामीण भागास ७५ टक्के इतके आरक्षण दिले जाते.

मुलींसाठी १/३ जागा राखीव ठेवल्या जातात.दिव्यांगांसाठी तीन टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.

नवोदय प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

विद्यार्थ्यांने पाचवी इयत्ता उत्तीर्ण असावे किंवा तो पाचवीत शिकत असणे आवश्यक आहे

नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र ठरण्यासाठी,निवड होण्यासाठी कोणत्या विषयात किती गुण असणे आवश्यक आहे?

  • नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र होण्यासाठी मेरीट मध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा विषयात २५ पैकी २५ गुण अणि मानसिक क्षमता चाचणीत ५० पैकी ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • भाषा अणि मानसिक क्षमता दोघे मिळून आपले ७५ गुण होतात.
  • तिसरा विषय गणितात जे आठ प्रश्न सोपे अणि सहा प्रश्न मध्यम स्वरूपाचे विचारले जातात ते सर्व आपले अचुक सोडविले जाणे आवश्यक असते.
  • उरलेल्या सहा अवघड प्रश्नांपैकी आपणास तीन ते चार प्रश्न जरी अचुकपणे सोडविता आले तरी देखील आपण नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र ठरतो.
  • ज्या विद्यार्थ्यांनी गणितात २० किंवा १९ प्रश्न बरोबर सोडवली आहेत अणि त्यांना भाषा अणि मानसिक क्षमता मध्ये देखील पैकीच्या पैकी गुण आहे अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित असतो.
  • कारण ग्रामीण भागातील शहरी भागातील विद्यार्थ्यांचे जागेचे डिव्हाईडेशन होत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात फक्त ८० उमेदवारांना निवडले जाते.यात तालुक्या नुसार मेरीट लागत असते.
See also  रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ विषयी माहिती - Reliance Foundation Scholarship

नवोदय मध्ये निवड होण्यासाठी गणितातील अतिशय महत्वाचे घटक कोणते आहेत?

नवोदय मध्ये निवड होण्यासाठी गणितातील पहिला अत्यंत महत्वाचा घटक आहे शेकडेवारी.

यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे सरळ व्याज.तिसरा घटक आहे शाब्दिक उदाहरणे.चौथा घटक आहे काम काळ अणि वेग.

पाचवा महत्वाचा घटक आहे भौमितिक क्षेत्रफळ घनफळ ह्या संबंधित काही शाब्दिक उदाहरणे.

नवोदय प्रवेश परीक्षेसाठी तयारी कशी करायची?

नवोदय प्रवेश परीक्षेत गणितातील ह्या पाचही घटकांवर दरवर्षी नवीन प्रश्न विचारले जातात.यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त सराव करणे आवश्यक आहे.

नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी गणिताच्या ह्या पाचही घटकांवर वेगवेगळ्या प्रकाशनाचे किमान २० ते २५ पेपर सोडवून बघायले हवे.

नवोदय प्रवेश परीक्षेचा एकुण अभ्यासक्रम कसा असणार आहे?

अंकगणित चाचणी –

  1. लसावि मसावि
  2. सरळ व्याज
  3. परिमिती क्षेत्र अणि खंड
  4. नफा अणि तोटा
  5. टक्केवारी अणि त्याचे अनुप्रयोग
  6. संख्या अणि संख्यावरील क्रिया
  7. अपुर्णाक अणि चार मुलभूत क्रिया
  8. संपुर्ण संख्येवर चार मुलभूत क्रिया
  9. दशांश त्यांच्यावरील मुलभूत क्रिया
  10. अपुर्णाक दशांश अणि त्याउलट रूपांतरण
  11. लांबी वस्तुमान क्षमता वेळ पैसे इ मोजमाप
  12. संख्यात्मक अभिव्यक्तीचे सरलीकरण
  13. अभिव्यक्तीचे अंदाजे
  14. अंतर वेळ वेग
  15. मानसिक क्षमता चाचणी –
  16. आरशातील प्रतिमा
  17. जुळणारी आकृती
  18. वेगळा घटक ओळखणे
  19. आकृती मालिका पुर्ण करणे
  20. अवकाश गुणधर्म
  21. समानता
  22. भौमितिक आकृत्या पुर्ण करणे
  23. नमुना पुर्ण करणे

ONLINE application link