रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ विषयी माहिती – Reliance Foundation Scholarship

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ विषयी माहिती – -Reliance Foundation Scholarship

आपल्या भारत देशातील अशा अनेक खासगी संस्था तसेच कंपन्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती प्रदान करीत आहे.

आज आपण अशाच एका महत्वाच्या स्कॉलरशिप रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

रिलायन्स स्कॉलरशिप २०२३ काय आहे?

रिलायन्स स्कॉलरशिप ही एक शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आहे जी रिलायन्स फाऊंडेशन कडुन फक्त बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करीता सुरू करण्यात आली आहे.

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत अर्ज करायला देखील आरंभ झालेला आहे.

रिलायन्स फाऊंडेशन काय आहे?

रिलायन्स फाऊंडेशन ही एक संस्था तसेच कंपनी आहे जी गरजु अणि हुशार विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती देते.

आपली का्ॅर्पारेट सोशल रिस्पाॅनसबिलिटी पार पाडण्यासाठी रिलायन्स कंपनीने बारावी उत्तीर्ण गरजु विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे.जेणेकरून गुणवंत विद्यार्थ्यांना आपले बारावीनंतरचे पुढचे शिक्षण घेण्यास आर्थिक मदत होईल.

ह्या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत पाच हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिपचा लाभ कोण घेऊ शकते?

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिपचा लाभ सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी घेऊ शकतात.

पदवीपुर्व अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांमध्ये कुठल्याही शाखेतुन प्रवेश घेतलेला विद्यार्थी ह्या स्काॅलरशिप योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्ज करू शकतो.

See also  नाशिक येथे 1500+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । Nashik Rojgar Melava 2023 In Marathi

जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेले आहेत अणि पहिल्या वर्षात त्यांचे अॅडमिशन झाले आहे.असे विद्यार्थी ह्या स्काॅलरशिप योजनेचा लाभ घेऊ शकतात.

विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच दिव्यांग देखील ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना किती रक्कम दिली जाईल?

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना दोन लाखापर्यंतची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप साठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप साठी अर्ज करणारया विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे एकुण वार्षिक उत्पन्न हे १५ लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या विद्यार्थ्यांचे कौटूंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

विद्यार्थ्यांचे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अणि बारावीत त्याला किमान साठ टक्के गुण असणे गरजेचे आहे.

पदवीच्या कुठल्याही एका शाखेच्या प्रथम वर्षात विद्यार्थ्यांने अॅडमिशन घेतलेले असावे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारत देशाचा नागरिक असावा.

रिलायन्स फाऊंडेशन कडुन राबविण्यात आलेल्या ह्या स्काॅलरशिप प्रोग्राम मध्ये ज्या विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट आधारावर निवड केली जाईल त्यांना त्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दोन लाख रूपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२३ अशी आहे.

म्हणून ज्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला आहे त्यांनी ह्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२३ च्या आत रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप च्या आॅफिशिअल वेबसाईट वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप प्राप्त करण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप साठी अर्ज करायला विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप च्या आॅनलाईन पोर्टलवर reliancefoundation.org वर जायचे आहे.

अणि खाली स्क्रोल करून खाली दिलेल्या click here to apply बटणवर क्लीक करायचे आहे.

See also  खुशखबर खुशखबर! आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सरकार देते आहे ३ लाख रुपये - Maharashtra Inter-Caste Marriage Scheme

यानंतर तुम्ही भारताचे नागरीक आहेत अणि बारावी साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत अणि पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे यावर टिक करायचे आहे.

यानंतर 12 th std percentage मध्ये आपली बारावी मधील टक्केवारी टाकायची आहे.

Select degree stream मध्ये आपण ज्या शाखेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे त्याची निवड करायची आहे.

आपण प्रवेश घेत असलेला पदवीचा प्रकार म्हणजे degree type काय आहे हे टाकायचे आहे.

आपण प्रवेश घेतलेल्या पदवीच्या अभ्यासक्रमाचा एकुण कालावधी किती आहे ते select degree duration मध्ये टाकायचे आहे.

यानंतर आपले फस्ट नेम, लास्ट नेम ईमेल आयडी मोबाईल नंबर जिल्हा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकायचे आहे.

फक्त शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याआधी विद्यार्थ्यांनी योजनेचे सर्व अटी नियम अटी व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.

ज्यांचा पदवी अभ्यासक्रम यादीत दिलेला नसेल त्यांनी RF.UG Scholarships@reliancefoundation.org वर ईमेल करायचा आहे आणि जर आपला पदवी अभ्यासक्रम प्रोग्राम पात्र असेल तर फाऊंडेशन कडुन तो सुचित जोडला जाईल.

स्काॅलरशिप विषयी जाणुन घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी-

● विद्यार्थ्यांने भरलेल्या तपशीलातील कुठलीही माहीती खोटी किंवा चुकीची निघाली तर विद्यार्थ्यांने भरलेला अर्ज हा फाऊंडेशनच्या वतीने अपात्र घोषित केला जाईल.

● रिलायन्स फाऊंडेशन स्काॅलरशिप विषयी इतर महत्वाची माहीती सर्व विद्यार्थ्यांना ईमेल वर पाठविली जाईल.