सायकोलाॅजी म्हणजे काय?Psychology meaning in Marathi

सायकोलाॅजी म्हणजे काय?Psychology meaning in Marathi

सायकोलाॅजी याचा अर्थ मराठी मध्ये मानसशास्त्र असा होतो.

मानसशास्त्र हा शब्द सायकोलाॅजी ह्या ग्रीक भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे.सायको+लाॅगस.याचा अर्थ मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असा होतो.

एखाद्या व्यक्तीची वागणुक वर्तन असे का असते त्यामागे काय कारण आहे याचा अभ्यास आपण मानसशास्त्र ह्या विषयामध्ये करत असतो.

खर पाहायला गेले तर मानसाचे मन अणि वागणुक ह्या विषयी अनेक प्रश्न पडत असतात.जसे की आपणास स्वप्र का पडत असते.

एखादी व्यक्ती खोटे का बोलत असते?काही व्यक्ती खुप बोलकी असतात तर काही व्यक्ती खुप शांत स्वभावाची का असतात?

काही व्यक्ती अत्यंत निर्दयी तसेच क्रुर स्वभावाची असतात जी इतरांचा विचार करत नाही पण काही व्यक्ती स्वताचा जीव धोक्यात घालून सुद्धा इतरांचे प्राण वाचवतात असे का होते असे विविध प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात.

आपल्या ह्या सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास आपणास मानसशास्त्र ह्या विषयामध्ये करायला मिळतो.

मानसशास्त्राची व्याख्या –

सायकोलाॅजी म्हणजे कायPsychology meaning in Marathi
सायकोलाॅजी म्हणजे कायPsychology meaning in Marathi

मानसशास्त्राची कुठलीही एक ठाराविक व्याख्या नाहीये मानसशास्त्र विषयी मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या अनेक व्याख्या तयार केल्या आहेत.

मानसशास्त्र मध्ये आपण वैज्ञानिक पदधतीने आपल्या मानसिक प्रक्रिया अणि वागणुक यांचा अभ्यास करत असतो.

वागणुक मध्ये सर्व बाहय वर्तन क्रिया जसे की आपले बोलणे,वागणे चेहरयावरील हावभाव शारीरिक हालचाली इत्यादींचा समावेश होतो.

मानसिक प्रक्रिया मध्ये आपल्या अंतर्गत क्रियांचा समावेश होतो.

उदा,विचार करणे,मनातील भाव भावना,स्मरण करणे इत्यादी प्रमुख मानसिक प्रक्रियांचा समावेश अंतर्गत मानसिक प्रक्रिये मध्ये होत असतो.

मानसशास्त्र ह्या विषयामध्ये माणसाच्या मनातील चालत असलेल्या विविध अंतर्गत प्रक्रिया अणि बाहय वर्तन जसे की वागणुक,बोलणे, शारीरिक हालचाली,चेहरयावरील हावभाव इत्यादींचा वैज्ञानिक पदधतीने अभ्यास केला जातो.

See also  मानवी जीवन

मानसशास्त्र ह्या विषयामध्ये माणसांच्या वागणुकीचा अंतर्गत प्रक्रियांचा अभ्यास तर केला जातोच शिवाय प्राण्यांच्या वागणुक अणि अंतर्गत प्रक्रिया त्यांच्या मेंदु मध्ये काय काय घडते यांचा देखील अभ्यास केला जातो.

आज मानसशास्त्रात केल्या जात असलेल्या संशोधनाचा उपयोग संगीत,कला,शिक्षण,कायदा इंजिनिअरिंग, कंप्युटर सायन्स अशा विविध ज्ञान शाखेत केला जात असताना आपणास दिसून येत आहे.

मानसशास्त्रात आज आपणास २० पेक्षा अधिक शाखा पाहायला मिळतात.ज्यात पुढील काही महत्वाच्या शाखांचा समावेश होतो.

1) abnormal psychology -असामान्य मानसशास्त्र

2) cognitive psychology -संज्ञानात्मक मानसशास्त्र

3) educational psychology -शैक्षणिक मानसशास्त्र

4) cross cultural psychology -क्राॅस सांस्कृतिक मानसशास्त्र

5) criminal psychology -गुन्हेगारी मानसशास्त्र

6) forensic psychology -न्याय वैद्यक मानसशास्त्र

7) behavioural psychology-वर्तवणुक मानसशास्त्र

8) sports psychology-क्रिडा मानसशास्त्र

9) experimental psychology-प्रायोगिक मानसशास्त्र

10) health psychology- आरोग्य मानसशास्त्र

11) school psychology- शालेय मानसशास्त्र

12) organisational/industrial psychology -संस्थातक औद्योगिक मानसशास्त्र

13) developmental psychology-विकासात्मक मानसशास्त्र

14) counselling psychology -समुपदेशन मानसशास्त्र

15) clinical psychology -वैदयकीय मानसशास्त्र