आरबी आयचे चीफ शशीकांत दास यांना देण्यात आला गवर्नर ऑफद इअर पुरस्कार – RBI Governor Shashikant Das honoured

आरबी आयचे चीफ शशीकांत दास — RBI Governor Shashikant Das honoured

नुकतेच आरबीआय(indian reserve bank of india) चे गवर्नर शशीकांत दास यांना गवर्नर ऑफद इअर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

गवर्नर ऑफ द इअर हा पुरस्कार आरबी आयचे गवर्नर शशीकांत दास यांना लंडन सेंट्रल बॅकिग कडुन देण्यात आला आहे.

सेंट्रल बॅकिग ही एक अग्रगण्य संस्था आहे.ही संस्था लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी बैठकीत जागतिक पातळीवर वित्तीय नियामक अणि सेंट्रल बँक यांच्याशी निगडीत प्रकरणांना कव्हर करण्याचे अणि त्यावर कसुन चौकशी करण्याचे काम करते.

RBI Governor Shashikant Das honoured
RBI Governor Shashikant Das honoured

शशीकांत दास यांनी आरबीआयच्या गवर्नर पदाची सुत्रे त्यांच्या हाती घेताच अनेक महत्वाचे निर्णय देखील घेतले होते.दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय देखील शशीकांत दास यांनीच घेतला होता.

जेव्हा जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली होती तेव्हा देखील महागाईला तोंड देण्यासाठी शशीकांत दास यांनी प्रशंसनीय,उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

शशीकांत दास यांच्या ह्याच प्रशंसनीय कामगिरीमुळे त्यांना गवर्नर आॅफ द इअर हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सेंट्रल बँकिंग पुरस्कार २०२३ मधील विजेत्यांची नावे २०२३ मध्ये मार्च महिन्यात महिन्याच्या अखेरीस घोषित करण्यात आली होती.

यात युक्रेन ह्या देशाच्या मध्यवर्ती बॅकेला सेंट्रल बँक ऑफ द ईयर हा पुरस्कार देण्यात आला अणि आरबीआयचे गवर्नर शशीकांत दास यांना २०२३ चा गवर्नर आॅफ द इअर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

शशीकांत दास यांचे शिक्षण –

आरबीआयचे गवर्नर शशीकांत दास यांनी इतिहास ह्या विषयात आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे.

शशिकांत दास यांनी सेंट स्टीफन महाविद्यालय दिल्ली येथील विद्यापीठातुन इतिहास हा स्पेशल विषय घेऊन पहिले आपले बीएचे शिक्षण पुर्ण केले मग एम ए पर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण केले.

याचसोबत शशीकांत दास यांनी indian institute of management bangalore मधुन फायनान्शिअल मॅनेजमेंट मध्ये एक डिप्लोमा कोर्स केला आहे अणि मद्रास तसेच म्हैसूर विद्यापीठातुन डाॅक्टरेटची पदवी देखील प्राप्त केली आहे.

See also  आंतरराष्ट्रीय चहा दिवस का साजरा केला जातो? महत्त्व काय ?International tea day 2023 in Marathi

शशीकांत दास यांचे वेतन –

आरबीआयचे गवर्नर शशीकांत दास यांना मिळणारे एकुण मासिक वेतन २५०,००० इतके आहे.

वेतनासोबत शशीकांत दास यांना विविध प्रकारचे भत्ते,मुलांचा शाळेतील शैक्षणिक खर्च,घरातील टेलिफोन बिल तसेच वैयक्तिक तसेच कौटुंबिक सभासदांसाठी लागणारा वैद्यकीय खर्च देखील देण्यात येतो.

RBI Governor Shashikant Das honoured with ‘Governor of the Year 2023’ award at Central Banking Award in London