टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय? Text Neck syndrome meaning in Marathi

टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय?text neck syndrome meaning in Marathi

आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज आपल्या मोबाईल मध्ये तासनतास मान वाकवून युटयुब वरील व्हिडिओ वगैरे बघत असतो व्हाटस अप वर मित्रांशी चॅटिंग करत असतो.

एवढेच नव्हे तर आपल्या कंप्यूटर तसेच लॅपटॉप मध्ये तासनतास मान वाकवून आपण आॅफिसचे काम करत असतो.ज्यामुळे आपल्या मानेवर कमरेवर अधिक जोर पडत असतो.

ज्यामुळे आपणास ह्या मानेच्या समस्येला सामोरे जावे लागते.यालाच टेक्स्ट नेक सिंड्रोम असे म्हटले जाते.

थोडक्यात मोबाईल लॅपटॉप कंप्यूटर वर वेडेवाकडे पदधतीने बसुन तासनतास मान वाकवून टाईपिंग वगैरेचे काम केल्याने मानेमध्ये निर्माण झालेल्या समस्येला टेक्स्ट नेक सिंड्रोम असे म्हटले जाते.

ही समस्या मोबाईल खेळत असलेल्या लहान मुलांपासून महाविद्यालयीन तरूण तरुणींपासुन मोठया माणसांपर्यंत सर्वांनाच आज जाणवत आहे.

आॅफिस सिंड्रोम कशाला म्हणतात? office syndrome meaning in Marathi

आॅफिस मध्ये बसुन सातत्याने सात आठ तास कंप्यूटरवर मान खाली वाकवून काम केल्याने ज्यामुळे जी मानेची समस्या निर्माण व्हायची त्याला आॅफिस सिंड्रोम असे म्हटले जायचे.

पण कोरोनाच्या काळात सर्व देश डिजीटल पद्धतीने काम करू लागला तेव्हा डिजीटल पदधतीने कामे होऊ लागल्यापासून सर्व कामे घरबसल्या लॅपटॉप कंप्यूटरच्या माध्यमाने आॅनलाईन होऊ लागली.

तेव्हापासुन प्रत्येक व्यक्ती घरबसल्या काम करण्याला अधिक पसंती देत आहे.घरी काम करत असताना आपण कसेही झोपुन वेडेवाकडे बसुन टेबल खुर्ची इत्यादी पैकी कशाचाही वापर न करता रोज सात आठ तास काम करत असतो.

ज्यामुळे आपणास मानेशी तसेच कमरेशी संबंधित विविध त्रास जाणवत असतात.जसे की मानदुखी,खांदेदुखी कमरदुखी,पाठदुखी इत्यादी.

टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय? text neck syndrome meaning in Marathi
टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय? text neck syndrome meaning in Marathi

टेक्स्ट नेक सिंड्रोम वर उपाय –

  • यावर उपाय म्हणून आपण घरबसल्या कंप्यूटर लॅपटॉप वर काम करत असताना एक अलार्म लावायला हवा.हा अलार्म वाजल्यावर कंप्यूटर लॅपटॉप वरून उठुन थोडा स्ट्रेचिंग पायी चालणे इत्यादी वगैरे व्यायाम करायला हवा.
  • घरबसल्या काम करताना नेहमी टेबल तसेच खुर्चीचा उपयोग करायला हवा.
  • कंप्युटर लॅपटाॅप वर बसुन काम करताना आपण बसलेला टेबल तसेच खुर्ची थोडी उंचावर असायला हवी जेणेकरून आपणास जास्त वाकावे लागणार नाही अणि पाठीशी मानेशी संबंधित कुठलाही त्रास होणार नाही.
See also  राष्ट्रीय पंचायती राज दिवस २०२३, उद्देश, इतिहास | National Panchayati Raj Day In Marathi
टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय text neck syndrome meaning in Marathi
टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय text neck syndrome meaning in Marathi