राष्ट्रपतीं विषयी माहीती -President election information in Marathi

राष्ट्रपती विषयी माहीती -President election information in Marathi

सध्याचे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत.पण आता त्यांचा देखील राष्ट्रपतीपदाचा कालावधी लवकराच संपतो आहे.
म्हणुन आता नवीन राष्ट्रपतीची निवड करायला निवडणुक होते आहे.18 जुलै रोजी नवीन राष्ट्रपतीची निवड करायला मतदान केले जाणार आहे.
अशातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीविषयी विविध प्रश्न निर्माण होत असतात जसे की ही निवडणुक कशी होते त्याची संपुर्ण प्रक्रिया काय असते इत्यादी.
म्हणुन आजच्या लेखात आपण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी आपल्या मनात जेवढेही प्रश्न आहेत त्या सर्वाची थोडक्यात आणि मुददेसुदपणे उत्तरे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राष्ट्रपती कोण असतात?

राष्ट्रपती हे देशातील न्यायपालिकेचे कार्यकारी कायदेमंडळाचे प्रमुख असता.याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रपतीकडेच असतात.
कुठलाही कायदा राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावरच तयार करण्यात येत असतो.राष्ट्रपतींनाच देशाचा पहिला नागरीक असे देखील संबोधिले जाते.

एका व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी किती वेळा निवडणुक लढवता येते?

एका व्यक्तीला किमान दोन वेळा राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवता येत असते.

राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा एकुण किती वर्षासाठी असतो?

राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा एकुण पाच वर्षाचा असतो.पण राष्ट्रपतीला जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा देऊ शकतात.
तसेच राष्ट्रपतींनी घटनेचा भंग जर केला तर त्यांना महाभियोग प्रक्रियेअंतर्गत पदावरून काढले जाऊ शकते.

राष्ट्रपती पदासाठी पात्रतेची अट काय आहे?

राष्ट्रपतीपदासाठी पुढील काही पात्रतेच्या अटी देण्यात आल्या आहेत-
● राष्ट्रपती पदाची निवडणुक लढवणारी व्यक्ती भारत देशाची नागरीक असणे गरजेचे आहे.
● उमेदवाराचचे 35 वय पुर्ण असावे.
● लोकसभेचा सदस्य म्हणुन निवडुन यायला तो पात्र असायला हवा.
● केंद्र आणि राज्य सरकार यांच्या अखत्यारीत त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे.
● राष्ट्रपतीपदाकरीता अर्ज करत असताना किमान पन्नास मतदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.

See also  जागतिक हवामान दिवस महत्व अणि इतिहास - World meteorological day history and importance in Marathi

राष्ट्रपती पदासाठी निवडणुक कशी होत असते?

  1. राष्ट्रपतींची निवड ही इलेक्टोरियल काँलेजमार्फत केली जात असते.ज्यात देशातील निवडुन आलेले सर्व
    लोकसभा,राज्यसभा आणि विधानसभेचे सभासद समाविष्ट असतात.
  2. विधान परिषदेच्या सभासदांचा यात कुठलाही सहभाग नसतो.याचसोबत राज्यसभा आणि लोकसभेत ज्यांना नियुक्त करण्यात आले आहे.असे सदस्य ह्या मतदानाच्या प्रक्रियेचा भाग नसतात.
  3. आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्या मताची किंमत वेगवेगळी असते.लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील खासदारांच्या मताची किंमत ही समान असते.
  4. परंतु वेगवेगळया राज्यामधील विधानसभेतील आमदार यांच्या मुल्यात विभिन्नता असते आणि त्यांचे मुल्य हे त्यांच्या राज्यामध्ये किती जनसंख्या आहे यावरून ठरवले जात असते.
  5. म्हणजेच जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील आमदाराच्या मतास जास्त वेट एज प्राप्त होत असते.आणि कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील आमदार यांच्या मताला कमी वेट एज दिले जात असते.
  6. महाराष्ट्र,पश्चिम बंगाल,उत्तर प्रदेश ह्या राज्यामधील आमदाराच्या मताला जास्त वेट एज आहे कारण येथील लोकसंख्या अधिक आहे.
  7. आणि गोवा,मणिपुर,त्रिपुरा ही जी राज्ये आहेत येथील आमदाराच्या मताला कमी वेट एज दिले जाते याला कारण येथे कमी लोकसंख्या आहे.
  8. उत्तर प्रदेश मधल्या एक आमदाराच्या मताचे वेट एज साधारणत 209 आहे आणि याचठिकाणी आपण देशातील प्रत्येक खासदाराच्या मताचे वेट ऐज बघितले तर ते 708 पर्यत आहे.

भारतातील सर्व राज्यांचे व तसेच केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील सदस्य व संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य हे भारतीय राष्ट्रपतींची निवड करत असतात.

निवडणूक मध्ये सर्वाधिक मतमूल्य ज्या उमेदवाराला मिळेल त्याला केंद्रीय निवडणूक आयोग विजयी म्हणून जाहीर करतो.

या निवडणुकी करता लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्यातील आमदाराचे मूल्यन ठरवलं जाते

जसे की =महाराष्ट्र

आमदार मूल्य १७५ – विधानसभे- २८८ सदस्य आहेत.

राज्याचे एकूण मतमूल्य ५०,४००.

उत्तर प्रदेश आमदार मूल्य – २०८

राज्याचे एकूण मतमूल्य ८३,८२४ आहे.

भारतातील सर्व राज्यांचे = मतमूल्य ५ लाख ४३ हजार २३१ .

तसेच सर्व राज्यांच्या मतमूल्यांच्या आधारे मग संसदेतील सदस्यांचे मतमूल्य ठरवले जाते

लोकसभेत ५४३ सदस्य

राज्यसभेत २३३ सदस्य.

राज्यसभेत ज्या १२ सदस्यांना नियुक्त केलं जातं त्याना मात्र या राष्ट्पती निवडणुकीत

See also  २०२३ मध्ये अक्षय तृतीया कधी आहे? योग्य तिथी,शुभमुहूर्त पुजेची पदधत तसेच महत्व - Akshaya Tritiya 2023 information in Marathi

मतदानात भाग घेता येत नाही.

दोन्ही सभागृहातील प्रत्येक खासदाराचे मतमूल्य = ७०० इतके गणले जाते

म्हणजेचराज्य विधानसभेतील सदस्यांचे मतमूल्य व संसदेतील सदस्यांचे मतमूल्य = एकूण मतमूल्य १० लाख ८६ हजार ४३१

  • राष्ट्पती निवडणुकीसाठी अधिसूचना- १५ जून
  • राष्ट्पती निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस- २९ जून
  • उमेदवारी अर्जाची छाननी होईल ३० जून
  • अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस- २ जुलै
  • राष्ट्पती निवडणुकीसाठी मतदान-१८ जुलै
  • निवडणूक मतमोजणी- २१ जुलै

४०३३- आमदार -७६६ – खासदार =असे एकूण ४८०९ मतदार या वेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतील

राष्ट्रपतीना किती वेतन दिले जाते?तसेच कोणकोणत्या सुखसविधा प्राप्त होत असतात?

● राष्ट्रपतीना दर महिन्याला 1,50,000 एवढे वेतन दिले जाते.तसेच राष्ट्रपतीच्या पदाला साजेल अशा सर्व सुख सुविधा राष्ट्रपतींना पुरवण्यात येतात.ज्यात राष्ट्रपती भवनाचा देखील समावेश असतो.
● कार्यकालीन कामकाजाकरिता देशात तसेच विदेशात मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.
● राष्ट्रपतीना निवृती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार दिला जातो.आणि राष्ट्रपतीचे ठरवण्यात आलेले वेतन कोणीही कमी शकत नसते.पण जर अचानक आर्थिक आणीबाणी लागु झाली तर अशा वेळी राष्ट्रपतीच्या वेतनात सुदधा कपात केली जात असते.

राष्ट्रपतीनां कोणकोणती कार्ये पार पाडावी लागतात?

तसेच राष्ट्रपतीकडे कोणकोणते अधिकार असतात?
भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च नामधारी प्रमुख म्हणुन ओळकले जातात.भारताच्या संविधानाकडुन राष्ट्रपतीस काही विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
● राष्ट्रपतीला पंतप्रधानांची नेमणुक करावी लागत असते.पंतप्रधानांशी सल्ला मसलत इतर मंत्रीची नेमणुक देखील देशाचे राष्ट्रपतीच करत असतात.
● संसदेकडुन तयार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी देखील राष्ट्रपतीच करीत असतात.
● वरिष्ठ शासकीय अधिकारी वर्ग जसे की राज्यपाल,महालेखापाल,सदस्य बँकेचा गवर्नर,इत्यादींची नेमणुक देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्तेच केली जाते.
● राष्ट्रपती हा सैन्याच्या तिन्ही दलांचा अध्यक्ष देखील असतो.ज्यामुळे सैन्यातील प्रमुख अधिकारी वर्गाची नेमणुक राष्ट्रपतींच्याच हस्ते केली जाते.
● देशात जेवढेही सामाजिक तसेच राजकीय सण उत्सव प्रसंग साजरे केले जात असतात.या सर्व ठिकाणी पहिले मानाचे पद राष्ट्रपती यांचे असते.
● वर्षातुन दोनदा संसदेचे अधिवेशन भरवण्याचे काम राष्ट्रपतीचेच असते.
● जर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात काही मतभेद घडुन आले तर ते मिटवायला संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीच भरवत असतात.
● संसदेकडुन पास करण्यात आलेल्या कुठल्याही विधेयकाला आधी राष्ट्रपतीची संमती मिळणे आवश्यक असते मग ते विधेयक जारी केले जाते.
● वर्षाच्या आरंभी संसदेपुढे अभिभाषण करणे आणि सर्व शासकीय ध्येयधोरणांविषयी स्पष्टीकरण देणे हे काम देखील राष्ट्रपतीचेच असते.
● राष्ट्रपतीची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेत मांडले जात नसते.
● राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय शासनास संसदेकडे अनुदान मागता येत नाही.
● देशात जर नवीन कर लादायचा असेल किंवा त्यात घट करायची असेल तर त्याविषयीच्या विधेयकास राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते.
● सर्वोच्च आणि उच्च न्यायालय या दोघांमधील न्यायाधीशाची नेमणुक राष्ट्रपतींच्या हस्तेच केली जाते.
● जर न्यायालयातील एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुनावली असेल तर त्याची शिक्षा वाढवायची की कमी करायची का रदद करून टाकायची हे देखील राष्ट्रपतीच ठरवत असतात.
● युदधकाळात देशाच्या सुरक्षेस धोका असल्यास आणीबाणी घोषित करण्याचे काम देखील राष्ट्रपतीच करत असतात.
● घटक राज्यात जर राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण झाली तर तिथे आणीबाणी घोषित करण्याचे काम देशाचे राष्ट्रपतीच करत असतात.

See also  VITEEE निकाल २०२३ जाहिर । VITEEE Result 2023 Released, Link to Check

भारताचे राष्ट्रपती कसे पदच्युत केले जातात?

राष्ट्रपतीवरील महाभियोग खटला-
● जर राष्ट्रपतीकडुन कायद्याचा भंग केला गेला किंवा राष्ट्रपतीने घटनेच्या विरोधात जाऊन एखादे कृत्य केले तर अशा प्रसंगी संसद त्याला बडतर्फ करू शकते.हा अधिकार संसदेला दिला आहे.
● यासाठी राष्ट्रपतीनी कायद्याचा भंग केला आहे असा ठराव प्रथमत संसेदतील सभागृहात मांडला जातो.ह्या ठरावाला २५ टक्के सदस्यांची संमती असणे आवश्यक असते.
● ठराव मांडण्याअगोदर राष्ट्रपतीला १४ दिवस आधी सुचित केले जात असते.
● आणि समजा राष्ट्रपतीवरील आरोप बहुमताने सिदध झालाच नही तर अशा वेळी तो ठराव तात्काळ तिथेच रदद करण्यात येत असतो.
● एका सभागृहात आरोपपत्र ठेवण्यात आल्यावर दुसरया सभागृहामध्ये त्यावर कसुन चौकशी करण्यात येते.
● ठरावात चर्चा होत असताना राष्ट्रपती स्वता आपली बाजु मांडु शकतात किंवा त्यांचा एखादा प्रतिनिधी त्यांच्यावतीने त्यांची बाजु मांडू शकतो.
● शेवटी दितीय सभागृहाने जर २/३ अशा बहुमतासोबत राष्ट्रपतीवरील आरोप सिदध केला तर राष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा निर्णय घेतला जातो.

राष्ट्रपतीपदा विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न –

1)राष्ट्रपतीची निवड कोणाकडुन केली जात असते?
राष्ट्रपतींची निवड देशाचे नागरीक करत नसतात तर त्यांची निवड जनतेने निवडुन दिलेले लोकप्रतिनिधींमार्फत केली जात असते.
2) राष्ट्रपतीपदासाठी वयाची अट किती आहे?
राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे वय किमान ३५ असणे गरजेचे आहे.
3) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
भारताचे पहिले राष्ट्रपती डाँ राजेंद्रप्रसाद हे होते.
4) भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
भारताचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत.पण लवकरच त्यांचा कार्यकाळ संपुन नवीन राष्ट्रपतीची निवड केली जाणार आहे.

President of India list – भारतीय राष्ट्रपतींची नावांची यादी (1947 ते 2021)