फादर्स डे विषयी माहीती – Fathers day information in Marathi

फादर्स डे विषयी माहीती Fathers day information in Marathi

मित्रांनो आपल्या सर्वाच्या जीवणात आपल्या वडिलांचा खुप मोठा हात असतो.आपले वडिलच आपल्याला लहानपणी आपला हात धरून चालायला शिकवितात.

जसजसे आपण मोठे होत जातो आपल्याला जगायला वागायला देखील शिकवितात.स्वताच्या ईच्छा मारून आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करतात.

आपल्याला जीवणात सर्व सुख सुविधा प्राप्त व्हाव्यात आपण उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी माणुस व्हावे म्हणुन पैसा कमविण्यासाठी दिवसरात्र आपल्यासाठी घाम गाळत असतात.

अशा ह्या आपल्या खरया आयुष्यातील हिरोला सन्मानित करण्यासाठी,त्याचे आभार मानण्यासाठी त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक विशेष दिवस दरवर्षी साजरा करण्यात येऊ लागला.तो दिवस म्हणजे फादर्स डे.

आजच्या लेखात आपण ह्याच फादर्स डे विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण फादर्स डे कधी साजरा केला जातो?कसा साजरा केला जातो?का साजरा केला जातो?हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास काय आहे?इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत.

फादर्स डे म्हणजे काय?

फादर्स डे हा आपल्याला लहानाचे मोठे करणारया आपले लालन पालन करणारया आपल्या वडिलांना समर्पित करण्यात आलेला एक विशेष दिवस आहे.

तसे पाहायला गेले तर हा एक पाश्चात्य संस्कृतीचा प्रकार आहे पण ह्यातुन आपल्याला खूप काही चांगले शिकता येते.आणि चांगला बोध देखील मिळतो.

फादर्स डे कधी साजरा केला जातो?

फादर्स डे दरवर्षी जुन महिन्याच्या तिसरया रविवारी साजरा केला जातो.

See also  ४५ मराठी उखाणे -Marathi UKHANE

2022 मध्ये फादर्स डे कधी साजरा केला जाणार आहे?

2022 मध्ये 19जुन रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे .

फादर्स डे का साजरा केला जातो?

आपले वडील हे दिवसरात्र मेहनत करतात कष्ट करतात आणि आपले संगोपण करत असतात.आपल्याला लहानाचे मोठे करतात आपल्याला जे हवे ते आणुन देतात आपले सर्व हटट पुरवितात पण कुठेतरी आपल्याला त्यांच्या ह्याच आपल्यासाठी केलेल्या बलिदानाचा त्यागाचा विसर पडुन जातो.

म्हणुन आपल्या वडिलांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानित करून त्यांनी आपल्यासाठी केलेल्या बलिदानाची दखल घेण्यासाठी आपण दरवर्षी हा दिवस साजरा करत असतो.

फादर्स डे कसा साजरा केला जातो?

फादर्स डे ला सर्व मुले आपल्या वडिलांना शुभेच्छा देत असतात.केक कापुन त्यांना केक खाऊ घालतात.त्यांना एखादे गिफ्ट देतात आणि हाँटेलात वगैरे जेवायला घेऊन जाऊन मुव्ही बघायला घेउन जाऊन हा दिवस आनंदात साजरा करत असतात.

फादर्स डे कधीपासुन साजरा केला जाऊ लागला,ह्या दिवसाचा इतिहास काय आहे?

फादर्स डे कधीपासुन साजरा केला जाऊ लागला तसेच याचा आरंभ कधीपासुन झाला हे सांगताना विविध गोष्टींचा संदर्भ देण्यात येतो.

अमेरिकेमधील एक मुलगी होती जिचे नाव सोनारा स्मार्ट डँड असे होते.ह्या मुलीने आपल्या वडिलांस अपर्ण केलेला दिवस म्हणुन फादर्स डे ओळखला जातो.

सोनारा हिचे वडील एक ग्रहण युदधात समाविष्ट असणारे सैनिक होते.त्यांच्या पत्नीचा सहाव्या अपत्याला जन्म देत असताना मृत्यु झाल्यानंतर आपल्या सहा मुलांचा सांभाळु सोनाराचे वडील म्हणजेच विल्यम स्मार्ट हेच करीत होते.

सोनाराच्या वडिलांचा देहांत झाल्यावर सोनाराची मनापासुन ईच्छा होती की तिच्या वडिलांची आठवण म्हणुन फादर्स डे साजरा केला जावा.

तसे पाहायला गेले तर विल्यम्स स्मार्ट यांचा देहांत जुन महिन्यात पाच तारखेला झाला होता.पण काही कारणामुळे हा फादर्स डे जुन महिन्यातील तिसरया रविवारी म्हणजेच संडेला साजरा करण्यात आला.आणि हीच प्रथा आजही जगभरात पाळली जात आहे आणि जुन महिन्याच्या तिसरया रविवारी फादर्स डे दरवर्षी संपुर्ण जगभरात साजरा केला जातो आहे.

See also  फळे व भाजीपाला निर्यात - फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप ( Farm Registration app ) अपेडा मॅंगो नेट आणि अनारनेट

याचसोबत अमेरिकेतील फेअरमाँण्ट सिटी व्हर्जिना सोसायटी असे नाव असलेल्या ठिकाणी फादर्स डे जुलै महिन्यात पाच तारखेला साजरा करण्यात आला होता.

अमेरिका तसेच तेथील वर्जिनिया येथे प्रथमत 1960 साली जुलै महिन्यात पाच तारखेला असे 361पुरुष ज्यांचा देहांत कोळशाच्या खाणीत काम करत असताना एक भयंकर स्फोट होऊन झाला होता.तेव्हापासुन त्यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला.

फादर्स डे चे महत्व काय आहे?

● फादर्स डे आपल्या वडिलांचा सन्मान करण्याचा त्यांचे आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे यादिवशी आपण आपल्या वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करत असतो.फादर्स डे आज जगभरात कोणकोणत्या देशामध्ये साजरा केला जातो?

फादर्स डे हा आज अमेरिके सोबत भारत देशात,जपानमध्ये,न्युझीलंड,जर्मनी,फ्रान्स,अर्जेटिंना इत्यादी देशांमध्ये देखील मोठया प्रमाणावर साजरा केला जातो आहे.

फादर्स डे साठी कोटस तसेच स्टेटस मुलीकडुन वडीलांना,तसेच मुलाकडून वडीलांना शुभेच्छा देण्याकरीता –

1)जोपर्यत वडिलांची छाया आपल्या जीवणात असते.तोपर्यत संकट अडचणी आपल्या आजुबाजुला देखील फिरकत नसतात.

2) स्वताचे अस्तित्व विसरून जाऊन आपल्या सुख आणि आनंदाकरीता कष्ट करतो तो एकमेव व्यक्ती म्हणजे आपले वडील.

3) वेळप्रसंगी आपले तोंडभरून कौतुक करतात.आणि गरज पडल्यावर रागावून आपल्याला धाकात देखील ठेवता ते म्हणजे आपले बाबा.

4) कसाही असो पण बाप शेवटी बाप असतो ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी डोक्याचा ताप असतो पण आज ज्यांच्या आयुष्यात त्याची छाया नहीये त्यांनाच कळते बाप म्हणजे काय असतो.

5) आपल्याला सर्व सुख सुविधा प्राप्त करून देण्यासाठी दिवसरात्र स्वताचा घाम गाळतो तो व्यक्ती म्हणजे आपला बाप.