युपी सरकारचा शिक्षण क्षेत्रातील मोठा निर्णय -UttarPradesh UPBoard CBSEBoard Education news

युपी सरकारचा शिक्षण क्षेत्रातील मोठा निर्णय

अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमात केले काही विशिष्ट बदल

उत्तर प्रदेश सरकारने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

युपी सरकारने उत्तर प्रदेश मधील अकरावी तसेच बारावी इयत्तेमधील अभ्यासक्रमात काही विशिष्ट बदल घडवून आणले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की उत्तर प्रदेश सरकारने २०२३ २०२४ ह्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमामध्ये एक विशेष बदल घडवून आणला आहे.

उत्तर प्रदेश मधील बारावी इयत्तेत शिकवले जाणारे धडे मोगल दरबार,लखनौ,अणि हे तीन धडे वगळण्यात आले आहेत.

याचसोबत अकरावी इयत्तेमध्ये शिकविले जाणारे धडे यांमध्ये देखील इस्लाम धर्माचा उदय,औद्योगिक क्रांती, संस्कृती मध्ये संघर्ष,वेळेची सुरूवात ह्या नावाचे असे अनेक धडे वगळण्यात आले आहे.

याचसोबत नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील शिकविले जाणारे अमेरिकी वर्चस्व,शीतयुद्ध हे दोन धडे देखील अभ्यासक्रमातुन कायमचे वगळण्यात आले आहे.

मोगलांच्या इतिहासासंबंधित अकरावी तसेच बारावी मधील पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेले अनेक धडे काढुन टाकण्याचा निर्णय योगी सरकारकडुन घेण्यात आला आहे.

यामुळे आता युपीमधील अकरावी तसेच बारावी मधील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकातुन मोगलांचा इतिहास अभ्यासायला मिळणार नाहीये.

कारण उत्तर प्रदेश राज्यातील शालेय अभ्यासक्रमातुन युपी अणि सीबीएससी बोर्डामधील अनेक मोगल धडे वगळण्यात आले आहेत.

See also  महाराष्ट्र सरकार देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये - Swadhar Yojana In Marathi

Leave a Comment