व्ही पु काळे यांचे कोट्स मराठीत । V Pu Kale Quotes In Marathi

व्ही पु काळे यांचे कोट्स मराठीत

व. पु. काळे (V. Pu. Kale) म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. यांचा जन्म २५ मार्च १९३२ साली झाला तर २६ जून २००१ रोजी मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. साहित्यीक लेखक, कादंबरीकार, कथाकथन अशी प्रचिती असलेले व. पु. काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते.

जर तुम्ही व पु काळे यांच्या जीवनावर आधारित प्रेरणा देणारे काही कोट्स जर तुम्ही बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. मराठी साहित्य अनेक लेखक होऊन गेले आणि त्यातले एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजेच व पु काळे.

व्ही पु काळे यांचे कोट्स मराठीत
व्ही पु काळे यांचे कोट्स मराठीत

मराठी साहित्यीक विश्वावर अधिराज्य गाजवणारे अनेक पुरस्कारांचे धनी असलेले व. पु. काळे यांच्या लिहण्याला तोड नव्हती, त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. पार्टनर, वपुर्झा, हाय वाट एकतीची आणि ठिकरी तसेच सखी, तप्तपदी, रस्त्यासाठी एक ही त्यांची सुप्रसिद्ध पुस्तके आहेत. ते एक प्रसिद्ध कथाकार होते आणि थिएटरमध्ये त्यांचे १६०० हून अधिक स्टेज-शो होते. ऑडिओ कॅसेटच्या स्वरूपात येणारे ते पहिले लेखक होते.

व्ही पु काळे यांचे कोट्स मराठीत

आयुष्यात एक वेळ अशी येते की,

जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते..!!

मनस्ताप ही अवस्था अटळ आहे. पण आपणच संघर्ष टाळू

शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही

तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता

आलं नाही तर त्यात फुलं ठेवता येतात..!!

मनस्ताप ही अवस्था अटळ आहे.

पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात.

त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फुलं ठेवता येतात.

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात.

मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.

आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही.

See also  प्रज्ञानंदला हरवून बुद्धीबळ विश्वचषक २०२३ जिंकणारा मॅगनस कार्लसन कोण आहे? - Magnus Carlsen

आयुष्य म्हणजे आखून दिलेले

पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या

प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं..!!

प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच.

ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,

कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडचा

प्रॉब्लेम कधी अस्तित्वाच नसतो…!!!

प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,

तर कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी शिवाय प्रॉब्लेम कधी अस्तित्वाच नसतो.

आपलं काहीच चुकलेलं नाही

ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते.

सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार

चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होतं…!!!

आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच आपण सुखी होतो.

आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे,

जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतंं ते साध्य करून दाखवणं..!!!

जेवढं घट्ट नातं तेव्हढे तीव्र मानपान,

परक्या माणासाला आपलं प्रेमही देणं लागत तसंच रागही…

आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच

वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा

आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो…!!!