Adipurush-‘आदिपुरुष प्री रिलीज इव्हेंट – कोट्यवधींचा खर्च रिलीजच्या आधीच चित्रपटाने केला धमाका – Adipurush

‘आदिपुरुष प्री रिलीज इव्हेंट मध्ये मेकर्स करणार आहे कोट्यवधींचा खर्च रिलीजच्या आधीच चित्रपटाने केला धमाका

भारतीय सुपर स्टार प्रभास अणि अभिनेत्री किर्ती सोनन यांचा येणारा आगामी चित्रपट आदीपुरूष थिएटरवर रिलिज होण्याची सर्व प्रेक्षक फार उत्सुक होऊन आतुरतेने वाट पाहत आहे.

 

आदीपुरूष ह्या चित्रपटात सुपरस्टार प्रभास आपणास प्रभु श्रीरामाच्या भुमिकेत दिसुन येतील.अणि किर्ती सोनन माता सीतेच्या भुमिकेत दिसुन येणार आहे.

 

सैफ अली खान ह्या चित्रपटात लंकेश्वर रावणाची भूमिका साकारतील.अणि लक्ष्मणच्या भुमिकेत सनी सिंग दिसुन येतील.हया चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खुप उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे.

 

आदीपुरूषच्या प्री रिलीज इव्हेंट मध्येच निर्मात्यांकडुन कोट्यावधीचा खर्च केला जाणार आहे.

 

इंडियन सुपरस्टार प्रभास अणि कीर्ती सोनन यांची मुख्य भूमिका असलेला ओम राऊत दिग्दर्शित आदीपुरूष चित्रपट सध्या खुपच चर्चेत आहे.

 

ह्या जुन महिन्यात १६ तारखेला हा चित्रपट थिएटरवर रिलिज केला जाईल असे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे.

 

चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यासाठी अवघे अकरा ते बारा दिवस राहीलेले आहेत.हया उरलेल्या अकरा बारा दिवसांत प्रभासच्या ह्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी निर्माते कुठलीही कसर सोडणार नाहीये.

 

असे सांगितले जाते आहे की सदर चित्रपटासाठी निर्मात्यांनी एक विशेष योजना आखली आहे जिच्या अंतर्गत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम निर्माते खर्च करणार आहेत.

 

चित्रपटाच्या प्रमोशन तसेच प्रचार प्रसार करण्यासाठी खर्च केली जाणारी ही रक्कम सुमारे दोन करोडच्या आसपास असु शकते.

 

आदीपुरूष चित्रपटाचा प्री रिलीज इव्हेंट मोठ्या विशाल पातळीवर साजरा केला जाणार आहे ज्यात फक्त फटाके फोडण्यासाठी ५० लाखांपर्यंतची रक्कम खर्च केली जाणार आहे.

 

ह्या चित्रपटाचा थिएटर राईट सुमारे १७० कोटी पर्यंत विकण्यात आला आहे.अणि ही १७० कोटी एवढी रक्कम फक्त तेलगु थिएटर राईटसच्या माध्यमातूनच निर्मात्यांनी प्राप्त केली आहे.

See also  आय एएस ऑफिसरला दिली जाते ही खास पावर अणि सुविधा Power and facilities of IAS officer

 

म्हणजे चित्रपट थिएटरवर रिलीज होण्याआधीच तेलगु भाषा मध्ये चित्रपट निर्मात्यांनी १७० कोटी इतकी कमाई आतापर्यंत केली आहे.

 

हिंदी तसेच इतर भाषेत थिएटर राईटसच्या माध्यमातून ह्या चित्रपटाने किती कमाई झाली आहे हे देखील आपणास लवकरच कळणार आहे.हया भाषेतून चित्रपटाने केलेल्या कमाईचा आकडा अद्याप समोर आलेला नाहीये.

 

आदीपुरूष चित्रपटाच्या दाखवण्यात आलेल्या ट्रेलरला आतापर्यंत रसिक प्रेक्षकांनी खुपच पसंती दिली आहे.

 

आतापर्यत ह्या चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज करण्यात आले आहेत.रघुनंदन प्रभु श्रीराम यांचे सामर्थ्य दर्शवणारा दुसरा ट्रेलर तिरूपती येथील प्री रिलीज प्रोग्राम मध्ये ६ जुन रोजी लाॅच केला जाणार आहे.ह्या ट्रेलरचा कालावधी दोन मिनिटे २७ सेकंद इतका आहे.

 

चित्रपटाच्या ह्या ट्रेलर मुळे प्रेक्षकांच्या उत्सूकता मध्ये वाढ झाली आहे.

 

आता हा चित्रपट १६ जुन रोजी थिएटरवर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांना किती भावतो किती पसंद पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आतापर्यत ह्या चित्रपटाचे दोन गाणे राम सिया राम अणि जय श्री राम रिलीज देखील झाले आहे.ज्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती प्राप्त झाली आहे.

 

सध्या जागोजागी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर ह्याच प्रभु श्रीराम यांच्या कथेवर आधारीत चित्रपटाची चर्चा सुरू आहे.