विवेक रामास्वामी कोण आहेत? – Vivek Ramaswamy the youngest Republican presidential candidate

विवेक रामास्वामी कोण आहेत? – Vivek Ramaswamy

सध्या विवेक रामास्वामी ह्या नावाची अमेरिका ह्या देशामध्ये खुपच चर्चा सुरू आहे.

आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की विवेक रामास्वामी ह्या नावाची सध्या अमेरिकेत एवढी चर्चा का आहे?

विवेक रामास्वामी हे अमेरिकेतील २०२४ मधील राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार आहेत.रिपब्लिकन पक्षाकडुन अनेक चेहरे रिंगणात असल्याचे आपणास दिसून येते.यात विवेक रामास्वामी यांचा देखील समावेश आहे.

विवेक रामास्वामी यांचे पुर्ण नाव विवेक गणपती रामास्वामी असे आहे.ते अमेरिकन देशातील नागरिक आहेत.

विवेक रामास्वामी यांच्या आईचे नाव गीता रामास्वामी अणि वडिलांचे नाव विवेक गणपती असे आहे.

विवेक रामास्वामी यांच्या बायकोचे नाव अपुर्वा रामास्वामी असे आहे त्यांना दोन अपत्ये देखील आहेत ज्यांचे नाव कार्तिक अणि अर्जुन असे आहे.

विवेक रामास्वामी यांचा जन्म सिनसिनाटी ओहिया येथे ९ आॅगस्ट १९८५ मध्ये भारतीय स्थलांतरित पालकांमध्ये झाला होता.

Vivek Ramaswamy the youngest Republican presidential candidate
Vivek Ramaswamy the youngest Republican presidential candidate

पुढील वर्षात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी जी निवडणूक होणार आहे ह्या निवडणुकीमध्ये भारतीय अमेरिकन उद्योजक म्हणून ओळखले जाणारे विवेक रामास्वामी देखील निवडणुकीसाठी उभे राहणार आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार असलेल्या विवेक रामास्वामी यांनी असे आश्वासन दिले आहे की जर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली तर ते युक्रेन अणि रशिया ह्या दोघा देशांमधील युद्धाला देखील संपुष्टात आणतील.

एवढेच नव्हे तर विवेक रामास्वामी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून संबोधित केले आहे.

फाॅक्स न्युज मधील प्राईम टाईम नावाच्या एका शो मध्ये घेतलेल्या त्यांच्या एका मुलाखतीत विवेक रामास्वामी यांनी अध्यक्ष पदाकरीता त्यांची उमेदवारी दर्शवली होती.

  1. विवेक रामास्वामी यांचे वय फक्त ३७ ते ३८ वर्ष इतके आहे ते रिपब्लिकन पक्षाकडुन राष्ट्रपती पदाकरीता उमेदवारी करणारे पहिले तरूण व्यक्ती आहेत.
  2. विवेक रामास्वामी यांनी हावर्ड काॅलेज मधून बॅचलर डिग्री प्राप्त केली आहे.याचसोबत त्यांनी येल लाॅ स्कुल मधुन न्यायिक डाॅक्टर ही पदवी देखील प्राप्त केली आहे.
  3. विवेक रामास्वामी यांनी उद्योग क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे.काॅलेज मध्ये असतानाच विवेक रामास्वामी यांनी वेगवेगळ्या स्टार्ट अप बिझनेसची सुरूवात केली होती.
  4. २००७ मध्ये विवेक रामास्वामी यांनी कॅपस वेंचर नेटवर्क ह्या नावाची एक कंपनी देखील सुरू केली होती जिला त्यांनी पुढे एका खाजगी संस्थेला विकुन दिले होते.
  5. २००९ ते २०१४ पर्यंत विवेक रामास्वामी यांनी एका कंपनीत देखील काम केले जिचे नाव क्यु व्हीटी फायनान्शिअल असे होते.
  6. यानंतर पुन्हा २०१४ मध्ये विवेक रामास्वामी यांनी रोविएंट सायन्स नावाची एक कंपनी देखील सुरू केली.अणि अवघ्या काही वर्षांत ह्या कंपनीची किंमत ३ ते ४ अब्ज डॉलर पर्यंत देखील पोहचली.
  7. विवेक रामास्वामी यांची एकुण संपत्ती ही ६५५ कोटी रुपये इतकी आहे.
  8. विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी नामांकन करणार आहे याची घोषणा त्यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी एका मुलाखतीत केली होती.
See also  आधार कार्ड - केंद सरकार च्या नवीन सुचना Aadhar card new advisory and rules in Marathi

सध्या विवेक रामास्वामी आपल्या प्रचारात व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे.याचदरम्यान टेसलाचा मालक इलाॅन मस्कने देखील विवेक रामास्वामी यांचे एक आश्वासक उमेदवार म्हणून कौतुक केले आहे.

इलाॅन मस्कने विवेक रामास्वामी यांची केलेली प्रशंसा नक्कीच विवेक रामास्वामी यांना निवडणुकीत फायदेशीर ठरेल असे म्हटले जाते आहे.