आईला घरातील कामात मदत कशी करणार ? – Ways To Help Busy Mother At House

आईला  घरकामात मदत कशी करणार ? – Ways To Help Busy Mother At House

दिवसभर आपली आई घरातील सर्व कामे एकटी आवरत राहते.तिला देखील रोज रोज घरची कामे एकटी आवरून कंटाळा येत असतो तसेच थकवा येत असतो.

अशा परिस्थितीत आपण आपल्या आईला मदत म्हणुन घरातील काही छोटीमोठी कामे जसे की घरात झाडझुड करणे,साफसफाई करणे इत्यादी कामे करण्याची जबाबदारी स्वता स्वीकारायला हवी.

जेणेकरून आईच्या डोक्यावर जो कामाचा भार असेल तो थोडाफार का होईना कमी होईल.आणि आईला आपल्यामुळे कामात थोडीफार का होईना मदत होईल.

Ways To Help Busy Mother At House (2)

घरातील कात आईला मदत करण्यासाठी आपण काय करावे?

घरातील सर्व कामे आपण करू शकत नाही.कारण आपल्यातील खुप जणांना घरातल्या कामाची सवय नसते.

पण सर्व कामे जरी आपण करू शकत नसलो तरी काही अशी काही निवडक कामे आहेत जी करून आपण आईला घरकामात हातभार नक्कीच लावू शकतो.

चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया घरातील कामात आईला मदत करण्यासाठी आपण काय करायला हवे?यासाठी आपण कोणकोणती कामे करू शकतो.जेणे आईला घरकामात आपली थोडीफार का होईना मदत होईल.

1) स्वताची कामे आपण स्वता करायला हवी :

2) आईची काही घरातील छोटी मोठी कामे करण्यात मदत करायला हवी :

3) शक्य असेल तर स्वयंपाक करायला देखील शिकुन घ्यावे:

4) घरातील रोजची पदधत बदलायला हवी.आपला दृष्टीकोन बदलायला हवा

1)स्वताची कामे आपण स्वता करायला हवी :

  • रोज सकाळी उठल्यापासुन आई घरात दिवसभर घरातील कामे करत असते ज्यात आपल्याला अंघोळीसाठी पाणी तापवून देणे.
  • आपल्यासाठी चहा नाश्ता तयार करणे,आपले मळलेले कपडे धुणे,आपला रूम साफ करणे घरातील झाडझुड करणे,आपल्या जेवणाच्या ताटल्या धुणे,नाश्ता झाल्यानंतर पुन्हा दुपारी तसेच संध्याकाळी आपल्यासाठी स्वयंपाक तयार करणे अशी दिवसाच्या सुरूवातीपासुन रात्री झोपेपर्यत आई आपली सर्व कामे आवरत असते.
  • आपल्याला जर आईला घरकामात मदत करायची असेल तर सर्वप्रथम आपण आपली कामे स्वता करायला शिकायला हवे.
  • जसे की सकाळी उठण्यासाठी आईला आपणास हाका मारण्याची वेळ येऊ न देता स्वताच लवकर उठुन जाणे,स्वताचे अंथरून स्वता आवरणे आपला स्वताचा रुम स्वता साफ करणे,
  • स्वताचे अंघोळीचे पाणी स्वता तापवून घेणे.स्वताचे जेवणाचे ताट स्वता धुवून घेणे,स्वताच्या अंगाचे कपडे रोज स्वता धुवून त्याला इस्तरी करून घेणे अशी छोटीमोठी कामे आपण स्वता करून घ्यायला हवी.
  • तसेच आपली इतर कोणतीही वस्तु मग ती वहया पुस्तके असो अस्ताव्यस्त घरात कुठेही ठेवून देऊ नये ती व्यवस्थित एका ठिकाणी नीट रचुन द्यावीत.कारण याने आईला तो सर्व पसारा आवरावा लागत असतो.ज्यात तिची खुप दमछाक देखील होत असते.
  • याचसोबत आई घरात नसताना घरात आलेल्या पाहुण्यांचा इमरजन्सीमध्ये पाहुणचार म्हणजेच चहा पाणी करता यावा यासाठी आपण चहा काँफी बनवायला देखील शिकुन घ्यायला हवे.
See also  MPSC BOOK - एमपीएससी परिक्षेसाठी महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी - MPSC book list in Marathi

2) आईची काही घरातील छोटी मोठी कामे करण्यात मदत करायला हवी :

  • आपण घरातील काही छोटी मोठी कामे करण्यात देखील आईला मदत पण करू शकतो.जसे की सकाळी उठल्यावर घरातील सगळयांचे आंथरून आवरणे,
  • घरातील सगळयांच्या अंघोळीसाठी पाणी तापविणे,घरातील कचरा झाडुन काढणे,
  • रात्रीची तसेच दिवसभराची जमलेली खरकटी भांडी धुवून टाकणे,कपडे धुवून टाकणे
  • ,एक स्वच्छ कपडा घेवून घरातील सर्व फरची स्वच्छपणे पुसुन टाकणे.
  • भींतीला लागलेले जाळ काढुन टाकणे
  • याचसोबत आपण स्वयंपाकासाठी देखील आईला मदत करू शकतो जसे की दुकानातुन तसेच बाजारातुन किराणा भाजीपाला आणुन देणे,
  • भाजी चिरून देणे,कांदे बटाटे टमाटे चिरून देणे अशा किरकोळ कामात आपण सहज आईला मदत करू शकतो.
  • घरातील सर्व व्यक्तींसाठी आठवडयातुन एक दोन दिवस तरी आपण स्वता नाश्ता आणि जेवण तयार करायला हवे.याने आईला थोडाफार आराम मिळेल.

3) शक्य असेल तर स्वयंपाक करायला देखील शिकुन घ्यावे:

  • आपण शक्य असेल तर स्वयंपाक करायला शिकुन घ्यायला हवे याने एखाद्या दिवशी आई खुप दमलेली असेल किंवा आजारी असेल तर आपण तिच्याजागी स्वयंपाक करू शकतो.याने आईला आपला थोडा का होईना आधार वाटेल.
  • आज आपण युटयुब सारख्या माध्यमांचा वापर करून  कुकिंगचे व्हिडिओ बघून देखील स्वयंपाक बनवायला सहज शिकू शकतो.किंवा आँनलाईन कुकिंगचा क्लास देखील लावू शकतो.

4) घरातील रोजची पदधत बदलायला हवी.आपला दृष्टीकोन बदलायला हवा :

  • सगळयात महत्वाची बाब म्हणजे आपण घरातील रोजची रीत,परंपरा,पदधत बदलायला हवी.
  • म्हणजेच घरातील पुरूषांनी फक्त आपल्या नोकरीवरील काम करणे आणि घरातले कोणतेच काम न करणे घरातील कामाला हात न लावणे ही रीत बदलायला हवी
  • आठवडयातुन एकदा तरी घरातील सर्व पुरूषांनी मिळुन घरातील सर्व कामे आवरायला हवी आपण घरात दोन तीन भावंडे असु तर आठवडयातुन एकदा घरातील सर्व कामे आपण आपापसात वाटुन घ्यायला हवी.
  • एकाने घरातील झाड झुड करणे,एकाने भांडे धुवून टाकावी,तर तिसरयाने फरची पुसुन टाकावी अशी सर्व कामे वाटुन घ्यायला हवी.
See also  गुरूपौर्णिमा निबंध अणि भाषण - Guru Purnima essay and speech in Marathi

याने एक दिवस तरी आईला विश्रांती घेता येईल आराम करता येईल.

आईला घरातील कामात मदत करण्यासाठी टिप्स :

 आपण घरातील कोणत्या कामात आईला मदत करू शकतो याची एक यादी तयार करा.मग घरातील जी कामे आपण करू शकतो त्या कामांची जबाबदारी स्वता स्वीकारा.

  • घरातील छोटी मोठी कामे जी आपण सहजपणे करू शकतो अशी सर्व कामे आपण स्वता करायला हवी.
  • उदा,बाजारातुन धान्य,किराणा आणुन देणे
  • तसेच भाजीपाला आणुन देणे इत्यादी.
  • आईला घरातील एखाद्या कामात आपली मदत हवी आहे का हे आईला नेहमी विचारत राहावे आणि आईने सांगितल्या प्रमाणे काम करायला हवे.
  • घरातील एखादे असे काम असेल ज्यात आपण आईला मदत करू शकतो असे आपल्याला वाटते तर आईने आपल्याला सांगण्याच्या आधी आपण न सांगता स्वताच ते काम करून टाकायला हवे.