वजन -ऊंची चे प्रमाण  किती असावे ? – Weight to Height Ratio Chart in Marathi

शास्त्रीय दृष्ट्या आपले वजन -ऊंची चे प्रमाण  किती असावे ? – Weight to Height Ratio Chart in Marathi

 

उंची आणि वजन यांचे प्रमाण असणे का गरजेचे असते? Weight to Height Ratio Chart in Marathi

योग्य आहाराचे सेवन आणि उत्तम जीवणशैलीमुळे आपले वजन आपल्याला नेहमी नियंत्रणात ठेवता येत असते.पण सगळयात महत्वाची बाब ही आहे की वजन नियंत्रणाण ठेवणे म्हणजे ते नेमके किती वयोमर्यादा असलेल्या व्यक्तीसाठी किती असणे गरजेचे असते?हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीतच नसते.

आपल्याला असे वाटते की आपण दिसायला बारीक दिसतो म्हणजे आपले वजन नियंत्रणात आहे.पण असे अजिबात नसते आपले वय आणि वजन यांचा एक रेशो असणे फार गरजेचे असते.

आपले वजन आणि उंची यांच्यात ताळमेळ असेल म्हणजेच आपल्या वयोगटासाठी जितके वजन आपले असणे गरजेचे असते तितके वजन जर आपले असेल तर याने आपण सर्व जण नेहमी निरोगी आणि तंदुरस्त राहत असतो.

वयोमर्यादेपेक्षा अधिक जास्त वजन जर आपले असेल तर याचा आपल्या आरोग्यावर तसेच जीवणशैलीवर देखील विपरीत परिणाम होत असतो.

आपली उंची आणि वजन वयानुसार नसेल तर काय होते? importance of Ideal Weight to Height Ratio

आपल्या वयोमर्यादेनुसार उंची आणि वजनाचे प्रमाण जर आपण राखले नाही तर आपल्याला लठठपणा,मधुमेह,उच्च रक्तदाब इत्यादी समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते.

याचशिवाय स्नायु दूखी गुडघेदुखीचा त्रास देखील आपल्याला होत असतो.

तज्ञ याविषयी काय म्हणतात?

  • तज्ञ याविषयी असे म्हणतात की आपल्या उंचीनुसार आपले वजन असायला हवे.कारण उंचीनुसार आपले वजन असेल तर याचा अधिक लाभ आपल्या स्वास्थयासाठी आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला होत असतो.
  • याचसाठी आपण किती उंची असलेल्या लोकांचे किती वजन असायला हवे हे एका चार्टच्या द्वारे आपण जाणुन घेणार आहोत.
  • याने आपल्या वजनात किती वाढ झाली आहे आणि किती घट झाली आहे हे चटकन आपल्या लक्षात येण्यास मदत होईल.आणि आपल्याला त्यावर योग्य ते पाऊल टाकुन बदल घडवून आणता येईल.
  • कारण वैदयकशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की जास्त चरबी असणे हे आपल्या शारीरीक स्वास्थ्यासाठी अपायकारक ठरत असते.याचसोबत दररोजच्या आहारात आपण चरबीचे प्रमाण अजिबात ठेवलेच नाही तर याने देखील नर्व सेल्स आणि हार्मोन्सची निर्मिती थांबत असते.
  • यावरून आपणास कळुन येते की आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आपल्या वयोमर्यादेनुसार उंची आणि वजन यांचे प्रमाण असणे किती महत्वाचे ठरते.
See also  लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक - Difference between Lok Sabha and Rajya Sabha in Marathi

चला तर मग जाणुन घेऊया किती उंची असलेल्या व्यक्तीसाठी वयोमर्यादेनुसार किती वजन असणे गरजेचे आहे.

वजन -ऊंची चे प्रमाण चार्ट - Weight to Height Ratio Chart

वजन -ऊंची चे प्रमाण चार्ट – Weight to Height Ratio Chart

ऊंची – Height –

फीट -इंच – सेंटीमीटर

स्त्री – 

Female -किलोग्रॅम

पुरुष –

 Male -किलोग्रॅम

4′ 6″ -(137 सेंटी )(28.5-34.9 किलो )(28.5-34.9 किलो )
4′ 7″(140 सेंटी )(30.8-37.6 किलो )(30.8-38.1 किलो )
4′ 8″(142 सेंटी )(32.6-39.9 किलो )(33.5-40.8 किलो )
4′ 9″(145 सेंटी )(34.9-42.6 किलो )(35.8-43.9 किलो )
4′ 10″(147 सेंटी )(36.4-44.9 किलो )(38.5-46.7 किलो )
4′ 11″(150 सेंटी )(39-47.6 किलो )(40.8-49.9 किलो )
5′ 0″(152 सेंटी )(40.8-49.9 किलो )(43.1-53 किलो )
5′ 1″(155 सेंटी )(43.1-52.6 किलो )(45.8-55.8 किलो )
5′ 2″(157 सेंटी )(44.9-54.9 किलो )48.1-58.9 किलो )
5′ 3″(160 सेंटी )(47.2-57.6 किलो )(50.8-61.6 किलो )
5′ 4″(163 सेंटी )(49-59.9 किलो )(53-64.8 किलो )
5′ 5″(165 सेंटी )(51.2-62.6 किलो )(55.3-68 किलो )
5′ 6″(168 सेंटी )(53-64.8 किलो )(58-70.7 किलो )
5′ 7″(170 सेंटी )(55.3-67.6 किलो )(60.3-73.9 किलो )
5′ 8″(173 सेंटी )(57.1-69.8 किलो )(63-76.6 किलो )
5′ 9″(175 सेंटी )(59.4-72.6 किलो ) (65.3-79.8 किलो )
5′ 10″ (178 सेंटी )(61.2-74.8 किलो )(67.6-83 किलो )
5′ 11″(180 सेंटी )(63.5-77.5 किलो )(70.3-85.7 किलो )
6′ 0″(183 सेंटी )(65.3-79.8 किलो )(72.6-88.9 किलो )
6′ 1″ (185 सेंटी )(67.6-82.5 किलो )(75.3-91.6 किलो )
6′ 2″ (188 सेंटी )(69.4-84.8 किलो )(77.5-94.8 किलो )
6′ 3″(191 सेंटी )(71.6-87.5 किलो )(79.8-98 किलो )
6′ 4″(193 सेंटी )(73.5-89.8 किलो )(82.5-100.6 किलो )
6′ 5″(195 सेंटी )(75.7-92.5 किलो )(84.8-103.8 किलो )

 

 

BMI calculator-बीएमआय म्हणजे काय? सामान्य ,जास्त, कमी की जाड – तुमचे BMI कसे मोजाल?

1 thought on “वजन -ऊंची चे प्रमाण  किती असावे ? – Weight to Height Ratio Chart in Marathi”

Comments are closed.