जीआय टॅग म्हणजे काय? याचे महत्त्व काय आहे?

जीआय टॅग म्हणजे काय? याचे महत्त्व काय आहे?

जीआय टॅगचा फुलफाॅम काय होतो?

जीआयचा फुलफाॅम geographical indicator tag असा होत असतो. यालाच मराठीत भौगोलिक सांकेतिक टॅग तसेच चिन्ह असा होत असतो.

जी आय टॅग/भौगोलिक मानांकन म्हणजे काय?

जेव्हा आपणास राज्यातील एखाद्या विशिष्ट उत्पादनाला विशिष्ट ओळख प्रदान करायची असते तेव्हा आपण त्या उत्पादनाला एक भौगोलिक मानांकन म्हणजे जी आय टॅग देत असतो/प्रदान करत असतो.

जी आय टॅग हे एखादया विशिष्ट क्षेत्रातील घेतल्या जात असलेल्या/निर्माण करण्यात येत असलेल्या उत्पादनाचे एक नाव किंवा सांकेतिक चिन्ह असते.

जीआय टॅग हा कृषी उत्पादन/प्राकृतिक उत्पादन/निर्मित उत्पादने यांना दिला जात असतो.

हक्क दर्शक ॲप विषयी माहिती 

जीआय टॅग म्हणजे काय
जीआय टॅग म्हणजे काय

भौगोलिक मानांकनाचा काय फायदा होतो?

जेव्हा एखादे उत्पादन फक्त एखाद्या मर्यादित विशिष्ट क्षेत्रात तसेच विभागातच घेतले जात असते.म्हणजे त्या उत्पादनाला एक विशिष्ट विभागात घेतले जात असलेले उत्पादन म्हणून ओळख प्राप्त होत असते तेव्हा त्या उत्पादनास भौगोलिक मानांकन दिले जात असते.

भौगोलिक मानांकनाचे अनेक फायदे असतात म्हणजे समजा एखाद्या उत्पादनाला भौगोलिक मानांकन प्रदान करण्यात आल्यावर त्या उत्पादनाची निर्मिती कोठे केली जात आहे त्याचे मुख्य उगमस्थान काय आहे हे समजण्यास मदत होत असते.

आपला नफा अणि मालाची उत्पादनाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी याचा लाभ उत्पादक वर्गाला देखील होत असतो.

वाहनांवर ग्रीन कर काय आहे

भौगोलिक मानांकन महत्वाचे का ठरते?

भौगोलिक मानांकन हे कुठल्याही क्षेत्र प्रदेशाशी अणि उत्पादनाशी संबंधित असते.

दोन वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती मध्ये निर्मिती केली जात असलेल्या एकाच उत्पादनाची गुणवत्ता भिन्न प्रकारची असु शकते.म्हणुन त्या दोन विभिन्न प्रदेशातील क्षेत्रातील उत्पादनाची गुणवत्ता कायम राखायला त्या उत्पादनास भौगोलिक मानांकन दिले जात असते.

भौगोलिक मानांकनाचे फायदे कोणकोणते असतात?

कुठल्याही विशिष्ट क्षेत्रातील उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्रदान केल्याने भेसळ करण्यात येत असलेल्या उत्पादनांची निर्मिती विक्री यावर प्रतिबंध निर्माण होत असतो.

म्हणजे याआधी काही उत्पादक काश्मीरी केशरच्या नावाने जी इतर भेसळयुक्त केसरची निर्मिती करत होते अणि बाजारात विक्री करत होते त्याला आळा बसणार आहे.

उत्पादनातून जी भेसळ केली जात असते त्यास आळा बसत असतो.हा आळा कसा बसतो हे आपण एका उदाहरणावरून समजुन घेण्याचा प्रयत्न करूया.

समजा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील निर्मिती केल्या जात असलेल्या घेतल्या जात असलेल्या उत्पादनाचे नाव दर्जिलिंग चहा असे ठेवण्यात आले आहे.

हेच उत्पादनाला देण्यात आलेले नाव इतर क्षेत्रातील विभागातील कोणीही व्यक्ती कंपनी उत्पादक वापरू शकत नाही.

म्हणजे समजा इतर उत्पादक यांनी ह्या नावाचा वापर केला तर दर्जिलिंग चहाचा उत्पादक त्या दुसरया क्षेत्रातील विभागातील ज्या व्यक्तीने ह्या नावाचा वापर केला आहे त्याच्यावर आपल्या उत्पादनाच्या नावाचा वापर करण्यास प्रतिबंध लादु शकतो.

याला कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील घेतल्या जात असलेल्या विशिष्ट उत्पादनाची गुणवत्ता हे इतर क्षेत्रातील घेतल्या जात असलेल्या उत्पादनापेक्षा भिन्न असते.

म्हणुन इतर क्षेत्रातील विभागातील उत्पादकांना ह्या नावाचा वापर करता येत नाही.कारण हे उत्पादनाचे दिलेले नाव त्या एका विशिष्ट क्षेत्रातील विभागातील एका विशिष्ट उत्पादनाची खास ओळख असते.याला त्या विभागाचे एक भौगोलिक मानांकन प्रदान झालेले असते.

अशी अनेक उदाहरणे आपण घेऊ शकतो जसे की आग्रा येथील पेठा/बनारसी साडी हे नाव हे चिन्हीत करते की पेठा हा आग्रा येथे निर्माण केले जात असलेले एक विशिष्ट उत्पादन आहे.अणि साडी हे उत्पादन बनारस येथे निर्माण केले जात असलेले एक विशिष्ट उत्पादन आहे.

म्हणजे जिआय टॅग हे निर्देशित करते की विशिष्ट उत्पादन हे विशिष्ट क्षेत्रातील निर्मिती केलेले उत्पादन आहे.कारण त्या उत्पादनाच्या पॅकेजवर त्या विशिष्ट ठिकाणातील उत्पादनाची ओळख पटवून देणारे जीआय टॅगचे नाव किंवा सांकेतिक चिन्ह दिलेले असते.