ख्रिसमसच्या दिवशी सँण्टा क्लाँज लहान मुलांसाठी भेटवस्तु का आणत असतो? -why Santa Claus distribute presents on Christmas

ख्रिसमसच्या आणि सँण्टा क्लाँजwhy Santa Claus distribute presents on Christmas

 ख्रिसमस हा एक असा सण आहे ज्यादिवशी लहान मुले सँण्टा क्लाँजची मोठया आतुरतेने वाट बघत असतात.

कारण ह्या दिवशी सँण्टा लहान मुलांसाठी चाँकलेट तसेच गिफ्टस आणत असतो.

आणि रात्री त्यांना काहीही कळु न देता गुपचुप त्यांच्या साँक्समध्ये हे गिफ्टस ठेवून निघुन जात असतो.

यामागचे कारण काय हा प्रश्न आपल्यातील खुप जणांना नेहमी उदभवत असतो.पण याचे योग्य ते उत्तर आपणास प्राप्त होत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण यामागचे कारण काय आहे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

 

ख्रिसमसच्या दिवशी सँण्टा क्लाँज लहान मुलांसाठी गुपचुप भेटवस्तु का आणत असतो?

 • सँण्टा क्लाँजची वाट बघण्याची प्रथा ही चौथ्या शतकापासुन सुरू झाली होती.यामागे सुदधा एक मोठी स्टोरी आहे जी आपण जाणुन घेणार घेणे गरजेचे आहे.
 • अनेक लोकप्रिय कथांमधुन असे सांगण्यात आले आहे की सेंट निकोलस नावाचा एक व्यक्ती होता जो आशिया मायरा इथल्या म्हणजेच तुर्की या प्रदेशात वास्तव्यास होता.
 • सेंट निकोलस हा खुप ऐश्वर्य संपन्न तसेच धनवान होता.पण तो फक्त पैशांनेच धनवान नव्हता तर मनाने देखील तो खुप श्रीमंत आणि दानशुर व्यक्ती होता.
 • त्याला एक चांगली सवय होती की तो नेहमी गोरगरिबांना लपुनछपुन मदत करायचा.त्यांना गुप्तपणे भेटवस्तु द्यायचा आणि आनंदी करायचा.असे करायला त्याला खुप आवडायचे.
 • एकदा निकोलसच्या कानावर कुठुन तरी पडल की एक गरीब व्यक्ती आहे ज्याच्या मागे त्याचे मोठे कुटुंब आहे.ज्यात त्याच्या तीन कन्या आहेत ज्यांचे लग्न त्याला लावायचे आहे पण त्याच्याकडे त्यांचे लावण्यासाठी पुरेसे पैसे नाहीयेत.
 • जेव्हा निकोलसच्या हे लक्षात आले तेव्हा निकोलसने त्या गरीब व्यक्तीला गुपचुप मदत करायची असे ठरवले.
 • मग एकेदिवशी रात्री निकोलस त्या गरीब व्यक्तीच्या घराच्या छताच्या वर गेला आणि त्या छतातुन त्याने सोन्या चांदीने भरलेली एक पिशवी त्या गरीब व्यक्तीच्या घरात टाकली.
 • त्यावेळी त्या गरीब व्यक्तीने त्याचे मोजे चिमणीत वाळण्यासाठी ठेवले होते.आणि निकोलसने आत टाकलेली ती पिशवी त्या मोज्यात जाऊन पडली.
 • आणि मग सकाळी उठल्यानंतर त्या व्यक्तीने जेव्हा मोज्यात सोन्याने भरलेली पिशवी बघितली तर त्याला हा जणु देवाने केलेला चमत्कारच वाटला.
 • तेव्हापासुन मग निकोलस अशाच पदधतीने प्रत्येक व्यक्तीला निकोलस हा नेहमी मदत करू लागला त्यांना गिफ्टस देऊ लागला.
 • काही कालावधीनंतर लोकांच्या हे लक्षात आले की हे सर्व निकोलस करतो आहे.तेव्हापासुन सर्व जण त्याला सेंट निकोलस या नावाने ओळखु लागले.
 • पुढे जाऊन हाच निकोलस सँण्टा क्लाँज या नावाने खुप प्रसिदध झाला.निकोलसची ही स्टोरी सगळीकडे खुपच गाजली.
 • तेव्हापासुन मग ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांना गिफ्ट देण्याची प्रथा सुरू झाली.याच कारणाने इंग्लंड ह्या देशात निकोलसची स्टोरी बघुन त्याला फादर आँफ ख्रिसमस आणि ओल्ड मँन ख्रिसमस अशी उपाधी देण्यात आली.
 • तेव्हापासुन निकोलसला प्रेरणा मानून ख्रिसमसच्या दिवशी साँक्टसमध्ये गिफ्ट देण्याच्या आणि सँण्टा क्लाँज बनण्याच्या प्रथेस आरंभ झाला.आणि ही प्रथा संपुर्ण जगभरात तेव्हापासुन साजरी केली जाऊ लागली.
 • हेच कारण आहे की ख्रिसमसच्या दिवशी मोठी माणसे सँण्टा क्लाँज बनुन सर्व लहान मुलांना चाँकलेट आणि गिफ्टस देत असतात.ज्याने लहान मुलांना खुप आनंद होत असतो.
 •  याचमुळे लहान मुलांना असे देखील वाटते की सँण्टा क्लाँजला स्वर्गातुन देवाने आपल्याला गिफ्ट आणि चाँकलेट देण्यासाठी ख्रिसमसच्या दिवशी पाठवलेले आहे.
 • म्हणुन लहान मुले ख्रिसमसच्या दिवशी सँण्टा क्लाजची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात.
See also  जागतिक संगीत दिवस कोटस - World music day quotes in Marathi