ख्रिसमसच्या दिवशी हँपी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते? – Why we say ‘Merry’ Christmas and not ‘Happy’ Christmas

ख्रिसमसच्या दिवशी – मेरी ख्रिसमस ची प्रथा Why we say ‘Merry’ Christmas and not ‘Happy’ Christmas

 

 • आपण कोणताही सण असो एकमेकाला शुभेच्छा देत असताना नेहमी हँपी हा शब्द वापरत असतो.
 • दिवाळीच्या दिवशी हँपी दिवाळी,संक्रातीला हँपी संक्रात होळीला हँपी होली अशा पदधतीने प्रत्येक सणाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना आपण हँपी हा शब्द आवर्जुन वापरत असतो.
 • पण अशा ह्या सर्व धर्मातील सणांमध्ये ख्रिसमस हा एक एकमेव असा सण आहे ज्यादिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देताना हँप्पी शब्द न वापरता मेरी हा शब्द वापरत असतो.
 • तेव्हा आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक सणाला आपण हँप्पी शब्दाने एकमेकांना शुभेच्छा देतो.मग ख्रिसमसलाच आपण हँप्पी ख्रिसमस ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हणत असतो.

 

आजच्या लेखात आपण ह्याच विषयी थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

 

ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना आपण हँपी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हणत असतो?

ह्या जगात अनेक धर्म आणि पंथ आहेत.ज्यांच्या आपापल्या संस्कृती तसेच धार्मिक परंपरा आहेत.

पण जगातील प्रत्येक भागात आरंभ होणारे वर्ष आणि त्यांचा काळ अलग असला तरी संपुर्ण जगाने आज इंग्रजी कँलेंडरला मान्यता दिलेली आपणास दिसुन येते.

डिसेंबर महिना हा इंग्रजी कँलेंडरमधील अखेरचा महिना आहे.

याच महिन्यात जगभरात साजरा केला जात असलेला ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण देखील 25 डिसेंबर रोजी येत असतो.जो जगभर ख्रिसमस डे म्हणुन साजरा केला जात असतो.

ख्रिसमस ह्या सणाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात कारण ह्याच दिवशी सांता क्लाँज सगळया लहान मुलांसाठी भेटवस्तु आणत असतो.आणि मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा देऊन सर्व भेटवस्तु वाटत असतो.

See also  एम एस एफ भरती २०२२ मेडिकल टेस्ट तसेच कँरेक्टर सर्टिफिकेट विषयी माहीती MSF bharti 2022 medical test,character certificate in Marathi

 

ह्या दिवशी आपण सर्व जण एकमेकाला मेरी ख्रिसमस असे म्हणत ख्रिसमसच्या शुभेच्छा देत असतो.पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इतर सणांच्या वेळी एकमेकांना शुभेच्छा देताना हँप्पी हा शब्द वापरला जातो.

पण ख्रिसमस हा एक असा एकमेव सण तसेच उत्सव आहे ज्याच्या शुभेच्छा देताना हँप्पी हा शब्द न वापरता मेरी हा शब्द वापरला जातो.

म्हणजेच सर्व जण एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हँप्पी ख्रिसमस न म्हणता मेरी ख्रिसमस म्हणत असतात.

 

 • मेरी ह्या शब्दाचा अर्थ आनंदी तसेच सुखी समृदधी असा होत असतो.मेरी हा शब्द जर्मनिक आणि ओल्ड इंग्लिश या दोघांचा संगम आहे.

 

 • सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर जसा हँप्पीचा अर्थ आनंदी खुश असा होत असतो त्याचप्रमाणे मेरीचा अर्थ देखील आनंदी,सुखी समृदधी असा होत असतो.

 

 • तरी देखील ख्रिसमस ह्या सणाच्या दिवशी हँप्पी ऐवजी मेरी हाच शब्द वापरला जातो.

 

 • यामागे सुदधा एक कारण आहे मेरी ह्या शब्दाची प्रसिदधी साहित्यिक चाल्स डिकीन यांनी केली होती.त्यांनी आपल्या लिहिलेल्या ए ख्रिसमस कँरोल ह्या ग्रंथात मेरी ह्या शब्दाचा अधिक वापर केला होता.

 

 • तेव्हापासुन मेरी हा शब्द खुपच अधिक प्रचलित झाल्यामुळे हँप्पी ऐवजी सर्व जण मेरी शब्दाचा वापर करू लागले.

 

 • पण या आधीचा इतिहास पाहिला तर खुप जण ख्रिसमसच्या दिवशी मेरी ख्रिसमस न म्हणता हँप्पी ख्रिसमस म्हणायचे.

 

 • इंग्लंड सारख्या देशात आजही कित्येक जण ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस न म्हणता हँप्पी ख्रिसमस असे म्हणतात.

 

 • मेरी आणि हँप्पी या दोघे शब्दांचा अर्थ एकच आहे पण हँप्पीपेक्षा मेरी हा शब्द अधिक प्रचलित असल्यामुळे खुप जण अधिक प्रमाणात मेरी ह्याच शब्दाचा वापर अधिक करतात.

 

मेरी ह्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली?

 

 • मेरी ह्या शब्दाची उत्पत्ती सोळाव्या शतकात झाली होती.त्या क्षणी इंग्रजी ही भाषा आपल्या बाल्य अवस्थेमध्ये होती. आणि मग त्यानंतर अठराव्या ते एकोणिसाव्या शतकात इंग्रजी भाषा अधिक प्रचलित झाली.
See also  ज्येष्ठ नागरीकांसाठी एक उत्तम योजना दरमहीन्याला मिळणार 18 हजार 500 रूपये इतकी पेंशन | Pradhan Mantri Vay Vandana Yojana In Marathi

 

 • मग नाताळ ह्या सणाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना हँप्पी पेक्षा मेरी हा शब्द अधिक प्रमाणात वापरण्यात येऊ लागला.

 

 • पण मेरी हा शब्द फक्त ख्रिसमस ह्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठीच विशेषकरून वापरला जातो इतर कुठल्याही सणाला एकमेकांना शुभेच्छा देताना मेरी ह्या शब्दाचा वापर केला जात नाही.

 

 • पण मेरी आणि हँप्पी या दोघांचा अर्थ एकच असल्याने हँप्पी ख्रिसमस किंवा मेरी ख्रिसमस म्हटले तरी यात काहीच चुकीचे ठरत नसते.कारण दोघांचा अर्थ हा सेमच आहे.

 

1 thought on “ख्रिसमसच्या दिवशी हँपी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते? – Why we say ‘Merry’ Christmas and not ‘Happy’ Christmas”

Comments are closed.