आकाशाचा रंग निळा का असतो? Why sky is Blue

आकाशाचा रंग निळा का असतो? Why sky is Blue

 

आज लहान मुलांपासुन ते मोठया माणसांपर्यत सगळयांनाच ह्या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेण्याविषयी मनात उत्कंठा तसेच कुतुहल असते की आकाशाचा रंग आपल्याला निळाच का दिसुन येतो इतर कोणत्याही रंगात आपल्याला तो का दिसुन येत नसतो.

वैज्ञानिक दृष्टीकोनातुन पाहावयास गेले तर जेव्हा आपण अंतराळात प्रवेश करत असतो तेव्हा आपल्याला आकाशाचा कुठलाही रंग असलेला आढळुन येत नसते.

 

उलट अंतराळात गेल्यानंतर आपल्याला असे प्रतीत होते की आकाशाचा कोणताही रंगच नसतो.ह्याच कारणाने आपण जेव्हा अंतराळात जाऊन आकाशाचे निरीक्षण करतो तेव्हा ते आपल्याला घनदाट काळे असे दिसुन येत असते.

पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्याच आकाशाकडे आपण जेव्हा जमिनीवरून बघत असतो तेव्हा ते आपल्याला निळसर दिसुन येत असते.

तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की असे होण्यामागचे कारण काय असु शकते?

 

पण हे कारण जाणुन घेण्यासाठी आपण आधी पृथ्वीचे वायुमंडळ कोणत्या पदधतीने कार्य करत असते हे आधी जाणुन घेऊयात.

पृथ्वीच्या वायुमंडळाचा सखोल अभ्यास केल्यावर आपल्याला असे दिसुन येत असते की हे वायुमंडळ कोणत्याही एका गँसपासुन तयार झालेले नसुन विविध गँसेसच्या संमिश्र मिश्रणातुन तयार झालेले आहे.

याचसोबत हे देखील दिसुन येते की हे वायुमंडळ फक्त विविध गँसेसच्या संमिश्रणातुनच निर्माण झालेले नसुन

यात विविध धुलिकण तसेच परागकण देखील समाविष्ट आहेत.

आता आपण जाणुन घेऊया ह्या गँसच्या प्रकृतीविषयी नैसर्गिकतेविषयी

तर आपल्या असे देखील निदर्शनास येते की ह्या गँसची निर्मिती देखील विविध अणुंच्या मिश्रणातुन होत असते.आणि हे अणु देखील इतके सुक्ष्म असतात की ते आपल्या डोळयांना देखील दिसुन येत नसतात.

जेव्हा सुर्याचा तेजोमय प्रकाश पृथ्वीवर पडत असतो तेव्हा सुर्याच्या प्रकाशाचे आणि वातावरणातील ह्या सुक्ष्म अणुंचे आपापसात घर्षन होत असते.

See also  लॉकडाऊन फायदे -5 Benefits of lockdown in Marathi

 

आणि आपल्याला ही एक गोष्ट तर माहीतच आहे की सुर्याचा प्रकाश विविध लाटांच्या एकत्रिकरणातुन तयार होत असतो.पण ह्या लाटांमधील सर्व रंग आपल्या डोळयांना दिसुन येत नसतात फक्त काही मोजकेच असे रंग आहेत जे आपण आपल्या डोळयांनी बघु शकतो.

यात एकुण सात रंगाचा समावेश होतो आणि हे सात रंग पुढीलप्रमाणे आहेत:

जांभळा रंग

निळा रंग

पिवळा रंग

हिरवा रंग

लाल रंग

नारंगी रंग

आकाशी रंग

सुर्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीवर पडत असतो तेव्हा ह्या प्रकाशाचे आणि सुक्ष्म अणुंचे आपापसात घर्षण झाल्यामुळे वातावरणात प्रकाश इकडे तिकडे पसरत असतो.यालाच रँलीचे विकिरण असे देखील म्हटले जाते.

 वातावरणातील हेच सुक्ष्म कण सुर्याच्या प्रकाशाला परावर्तित करीत असतात.आणि आपल्याला ही एक गोष्ट चांगली माहीत आहे की सुर्यप्रकाशाच्या विविध रंगामध्ये निळा रंग हा एक असा रंग आहे.जो वातावरणात खुप वेगाने पसरत असतो.

याचे परिणाम स्वरूप आकाशात असलेल्या रंगामध्ये निळया रंगाचे प्रमाण अधिक जास्त प्रमाणात तयार होत असते.

 

याच कारणामुळे आपल्याला आकाशाचा रंग देखील निळा दिसत असतो.