जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? – World Hypertension day 2023 in Marathi

जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? world hypertension day 2023 in Marathi

जागतिक उच्च रक्तदाब दिवस दरवर्षी १७ मे ह्या तारखेला साजरा केला जात असतो.हा दिवस उच्च रक्तदाब विषयी समाजात रूग्णांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

World Hypertension day 2023 in Marathi
World Hypertension day 2023 in Marathi

ह्या दिवशी सर्व हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या रूग्णांना स्त्री पुरुष इत्यादी लोकांना उच्च रक्तदाबाविषयी माहीती प्रदान करून ह्या समस्ये विषयी जाणीव निर्माण करून देण्यात येत असते.

उच्च रक्तदाब हा एक असा आजार तसेच समस्या आहे जी कुठल्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुषाला उदभवू शकते.

उच्च रक्तदाबाचा धोका हा तरूण वर्ग, प्रौढ पुरूष स्त्री वयस्कर व्यक्ती इत्यादी सर्वांनाच असतो.

हा धोका रोजचा शारीरिक मानसिक ताणतणाव,कौटुंबिक कलह वादविवाद,नैराश्य,चिंता काळजी,चुकीचा आहार घेणे आहाराची चुकीची पद्धत,अयोग्य जीवनशैली अवलंबणे ह्या सर्व गोष्टीमुळे निर्माण होत असतो.

यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहाराची जीवनशैलीची विशेष काळजी घ्यायला हवी.ताणतणाव चिंता काळजी यापासून दुर राहायला हवे ताणतणाव दूर करण्यासाठी रोज सकाळी आपण योगा मेडिटेशन एक्सरसाईज करायला हवे.

आजच्या ताणतणावाच्या धकाधकीच्या वाढत्या केसेसमुळे तरूण वयात देखील मुला मुलींना हार्ट अटॅक येत आहेत चीडचीड राग मनस्ताप केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होत आहे.

म्हणून आपण रागराग चीडचीड करणे सोडायला हवे रागाच्या भरात वाईट व्यसने करणे बंद करायला हवे.आपला आहार अणि जीवनशैली योग्य ठेवायला हवी.तणाव दुर करण्यासाठी रोज व्यायाम करायला हवा.

जास्त मिठाचे पदार्थ खाल्ल्याने,दारू विडी सिगारेट अशी वाईट व्यसन केल्याने,उघड्यावरील जंक फूड फास्ट फूड खाल्ल्याने,वजन वाढल्याने चीडचीड केल्याने,टेंशन ताणतणाव घेतल्याने आपणास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

तसेच काहीवेळा शरीरात व्हिटॅमिन के अणि डीची कमतरता निर्माण झाल्याने देखील आपणास उच्च रक्तदाबाची समस्या त्रास उद्भवू शकतो.

यासाठी आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात धान्य फळ भाजीपाला तसेच इतर दुग्धजन्य पदार्थाचा समावेश करायला हवा.

See also  IRCTC टूर पॅकेज माहिती Best IRCTC Tour Packages

जर आपण वेळ असताच उच्च रक्तदाबाच्या समस्येवर उपाययोजना नाही केली तर आपणास हार्ट अटॅकची समस्या देखील उद्भवू शकते.आपल्या किडनी तसेच शरीरातील इतर अवयवांना हानी पोहोचू शकते.

म्हणून आपण ह्या समस्येवर वेळ असताच त्वरीत उपचार करायला हवेत.

उच्च रक्तदाब दिवस साजरा करावयास आरंभ वल्ड हायपर टेंशन लीगने केला होता.ही संस्था आज ८० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

ही संस्था सर्वसामान्य नागरिकांना रूग्णांना हाय ब्लड प्रेशर विषयी माहिती देऊन त्यांच्यात ह्या समस्या विषयी जागरूकता निर्माण करते.

हाय ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी देशात विविध सोसायटी तसेच लीगची स्थापणा करण्यात आली होती.हया सर्वांची पालक संस्था असलेल्या वल्ड हायपर टेंशन लीगने २००५ साली प्रथमतः हा दिवस साजरा केला होता.

त्याच वर्षी १४ मे रोजी हा दिवस साजरा केला गेला पण पुढे जाऊन तारीख बदलण्यात आली अणि हा विशेष दिवस १४ मे ऐवजी १७ मे ला साजरा करण्यात येऊ लागला.

तेव्हापासून हा १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून साजरा केला जातो आहे.

भारतात आज जेवढेही ग्रामीण भागात राहत असलेले प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्या मध्ये २५ टक्के इतके उच्च रक्तदाबाचे प्रमाण दिसुन येते.शहरी भागात राहत असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये हे प्रमाण ३३ टक्के इतके आहे.

तपासातुन असे समोर आले आहे की ग्रामीण भागातील प्रौढ व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरचा त्रास फार अधिक प्रमाणात जडताना दिसुन येत आहे.

यात मोजक्या काही टक्के लोकांनाच ह्या आजारा विषयी माहिती आहे.अणि काही टक्के रूग्णच ह्या समस्येवर मात करण्यासाठी उपचार करीत आहेत.

म्हणून ह्या समस्ये विषयी रूग्णांमध्ये जागरूकता प्रबोधन सतर्कता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.