जागतिक रेडक्राॅस दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? World red cross day in Marathi

जागतिक रेडक्राॅस दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? World red cross day in Marathi

दरवर्षी ८ मे रोजी जागतिक रेडक्राॅस दिवस साजरा केला जात असतो.ह्या वर्षी ८ मे २०२३ रोजी जागतिक रेडक्राॅस दिवस साजरा केला जाणार आहे.

जागतिक रेडक्राॅस दिवस का साजरा केला जातो?हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट महत्व काय आहे?

रेड क्रेसेंट चळवळीचे तत्व अणि ह्या तत्वाचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो.हया दिवसाचा मुख्य हेतु असहाय्य अणि जखमी नागरीकांना सैनिकांना संरक्षण प्रदान करणे हा आहे.

हेन्री डयुनंट यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो हेन्री डयुनंट यांनी मानवतेच्या हितासाठी दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या आठवतीत हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाचा दिवस जागतिक रेडक्राॅस दिवस साजरा केला जात असतो.

रेड क्राॅस काय आहे?

रेड क्राॅस ही एक इंटरनॅशनल संस्था संघटना आहे.ज्याचे मुख्यालय स्वीत्झर्लड देशातील जिनिव्हा ह्या शहरात आहे.
रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समिती कडुन ही संस्था चालवली जाते.तसेच ही संस्था चालवण्यासाठी इतर संस्थांकडून देखील हातभार लावला जातो.

रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.जी महामारी नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी संकटाच्या काळात जनतेला निस्वार्थ भावनेने साहाय्य प्रदान करण्याचे काम करते.

आज ह्या संस्थेच्या कार्यात संपुर्ण जगभरातील लोक जोडले गेले असल्याचे आपणास दिसून येते.

जागतिक रेडक्राॅस दिवसाचा इतिहास –

जेनी हयुनंट हे एक स्वीस उद्योजक उद्योगपती होते.जेनी हयुनंट यांनी इटली मधील झालेले साॅलफेरिनाचे युदध अगदी जवळून बघितले होते.

ह्या भयंकर युदधात अनेक सैनिक मारले गेले तर काही सैनिक गंभीर रीत्या जखमी झाले होते.पण युदधा दरम्यान एखाद्या सैन्यातील व्यक्तीला काही दुखापत जखम वगैरे झाली तर त्यांच्यावर उपचार करायला कुठल्याही सैन्याकडे वैद्यकीय उपचाराची सुविधा करण्यात आली नव्हती तसेच उपलब्ध नव्हती.

See also  वेदोक्त प्रकरण म्हणजे काय? - Vedokt Controversy Nashik Maharashtra

यावर उपाय योजना म्हणून जेनी हयुनंट यांनी स्वयंसेवकांच्या गटाची निर्मिती केली ह्या गटाचे काम युदधात जखमी झालेल्या सैनिका़ंवर औषधोपचार करणे त्यांच्या खाण्या पिण्याची सोय करणे ही होती.

ह्या स्वयंसेवकांच्या गटाची जबाबदारी ही जखमी झालेल्या सैनिकांच्या घरी पत्र पाठवून कळवणे हे देखील असायचे.

आपल्या ह्या कार्याचा अनुभव शब्दात मांडत जेनी हयुनंट यांनी एक पुस्तक लिहुन प्रकाशित केले.हया पुस्तकातुन हयूनंट यांनी एका आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा समाजाची निर्मिती विषयी सुचित करत सांगितले आहे.

ज्या समाजाकडुन युदधात जखमी झालेल्या, कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या लोकांची मदत केली जाते.

हा समाज कुठल्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी त्याची जात धर्म नागरिकत्व बघत नाही सर्व जाती धर्म देशातील नागरीकांना मदत करण्याचे काम हा समाज करतो.

जेनी हयुनंट यांनी ज्या विशिष्ट समाजाच्या निर्मितीसाठी सुचित केले होते पुढे जाऊन असा एक समाजाची स्थापणा करण्यात आली जो लोकांना मानवतेच्या आधारावर साहाय्य प्रदान करू लागला.