झोमॅटोच्या शेअर्सने बनवले नवीन रेकाॅर्ड फक्त दोन महिन्यांत शेअर्समध्ये ५३ टक्के इतकी तेजी
झोमॅटोच्या शेअर्सने शेअर बाजारात एक नवीन रेकाॅर्ड तयार केले आहे.झोमॅटोच्या शेअर्सचा भाव आयपीओ किंमती पेक्षा वर सध्या गेला आहे.
फक्त दोन महिन्यांत ह्या शेअर्स मध्ये ५३ टक्के इतकी वाढ झालेली आपणास पाहावयास मिळते आहे.
झोमॅटोच्या शेअर्समध्ये शुक्रवारी ९ जुन रोजी वाढ झाली अणि हे शेअर्स आता आपल्या एका वर्षातील एका नवीन उच्च स्तरावर देखील पोहोचले आहे.
मागील दोन महिन्यांमध्ये झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये ५३ टक्के इतकी तेजी आल्याचे आढळुन आले आहे.आता हे शेअर्स आपल्या ७६ रूपयांच्या आयपीओ प्राईजच्या वर ट्रेंड करत आहे.
९ जुन २०२३ रोजी शुक्रवारी संपुर्ण दिवसभरात झोमॅटोच्या शेअर्सने 78 रुपयांची पातळी गाठण्यात यश प्राप्त केले.हा २६ एप्रिल २०२२ नंतरचा झोमॅटोच्या शेअर्सने गाठलेला सर्वात उच्च स्तर मानला जातो आहे.
गुंतवणूकदारांकडून बाजारात ह्या शेअर्सच्या सुरू असलेल्या सकारात्मक चर्चेमुळे झोमॅटोच्या शेअर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
झोमॅटोच्या शेअर्सने तेजी घेतल्यामुळे कंपनीच्या कमाईत सुधार होत असल्याची माहिती शेअर बाजार न्यूज वर दिली जात आहे.
क्रिस वुडने झोमॅटोच्या शेअर्सला आपल्या दिर्घकालीन पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट केले असल्याचे सांगितले जात आहे.क्रिस वुडच्या पोर्टफोलिओ मध्ये झोमॅटोच्या शेअर्सचे एकुण वेटेज चार टक्के इतके आहे.
याआधी मार्च तिमाही मध्ये झोमॅटोला आपल्या कंपनीला होत असलेला घाटा कमी करण्यात बरेचसे यश प्राप्त झाले होते.मार्च तिमाही मध्ये झोमॅटो कंपनीला होत असलेला घाटा कमी होऊन १८८ करोड इतका झाला होता.
जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 360 कोटी रुपये होते आणि एक तिमाहीपूर्वी 345 कोटी रुपये होते.ज्याकडे विश्लेषकांनी एक सकारात्मक पद्धतीने बघितले होते.
झोमॅटो कंपनीचा एकत्रित महसुल मार्च तिमाही मध्ये ७० टक्क्याच्या भारी बुम सोबत २,०५६ करोड पर्यंत पोहोचला होता.
असे सांगितले जात आहे की फुड सेक्टर मधील मार्जिन मध्ये होत असलेला विस्तार अणि ब्लिंकिटच्या तोटयात होत असलेल्या कमीमुळे कंपनीच्या नफ्यात अधिक वाढ होऊ शकते.
कंपनीने आपल्या युझर बेझ्ड मध्ये अधिक वाढ घडवून आणण्यासाठी गोल्ड प्रोग्राम देखील लाॅच केला आहे.
एम एस सी आयकडुन झोमॅटोच्या वेटेज मध्ये करण्यात आलेली वाढ तसेच ओएनडीसी दवारे करण्यात आलेल्या डिस्काउंट तसेच इनसेंटिव्ह मधील बदलामुळे देखील झोमॅटोच्या शेअर्सबाबत भावना खूप सुधारल्या आहेत.
एम एस सी आय इंडेक्सवर झोमॅटोच्या वेटेज मध्ये झालेल्या वाढीमुळे यामध्ये जवळपास ५.९ करोड डाॅलर इतकी अतिरिक्त गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.