तामिळ अभिनेता तसेच दिग्दर्शक सरन राज यांचे अपघाती निधन – Saran Raj passed away

तामिळ अभिनेता तसेच दिग्दर्शक सरन राज यांचे अपघाती निधन saran Raj passed away in Marathi

सध्या भारतीय चित्रपटसृष्टीला एकामागून एक धक्का बसताना दिसुन येत आहे.

Saran Raj passed away
Saran Raj passed away

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री करीता एक अत्यंत वाईट बातमी समोर आलेली आहे.प्रसिदध तामिळ अभिनेता तसेच दिग्दर्शक सरन राज यांचे एका अपघातात निधन झाले आहे.

सरन राज यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालेले दिसुन येत आहे.सर्व दक्षिणात्य चाहते अभिनेता दिग्दर्शक सरन राज यांच्या मृत्यु विषयी शोक व्यक्त करीत आहेत.

सरन राज हे भारत देशातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक वेत्रिमारन यांचे सहाय्यक दिग्दर्शक अणि सहाय्यक अभिनेता म्हणून ओळखले जातात.

सरन राज हे मधुरावायलच्या धनलक्ष्मी स्ट्रीट येथे वास्तव्यास होते.

८ जून रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान चेन्नई शहरातील केकेनगर भागामध्ये अरकोट रोडवरून आपल्या बाईकने येत असताना सरन राज यांना एका वेगात येत असलेल्या फोर व्हीलरने जोरदार धडक दिली.

ज्यात डोक्यात हेल्मेट घातलेले नसल्याने डोक्याला जबर मार लागल्याने सरन राज यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

ज्याच्या कारने धडक दिल्याने सरन राज यांचा मृत्यू झाला आहे तो व्यक्ती एक सहाय्यक अभिनेता असुन त्याचे पलानीपपणन असल्याचे सांगितले जात आहे.तो कार चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता असे पोलिसांकडुन सांगितले जात आहे.

सदर आरोपीस अटक केली गेली असुन त्याच्या विरुद्ध कारवाईला सुरुवात देखील झाली असल्याचे सांगितले जात आहे.

सरन राज यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून भुमिका पार पाडल्या आहेत.वयाच्या फक्त २९ व्या वर्षी सरन राज यांचे निधन झाले आहे.

See also  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुलीचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने- एकही व्ही आयपी नाही - Nirmala Sitharaman's daughter got married in a simple ceremony