आदीपुरूष चित्रपटाच्या ऍडव्हान्स तिकिट बुकिंग- Adipurush advance ticket booking in Marathi
प्रभास अणि कीर्ती सोनन या दोघांच्या रामायणावर आधारीत असलेल्या आदीपुरूष ह्या चित्रपटासाठी ऍडव्हान्स बुकिंग करणे सुरू झाले आहे.
ऍडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत प्रभास अणि कीर्ती सोनन च्या आदीपुरूष ह्या चित्रपटाने केजीएफ टु ह्या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.
फक्त दोन ते तीन दिवसांत ह्या चित्रपटाची ४० हजारापेक्षा अधिक तिकिट विकली गेली आहेत.सुमारे ५ हजार स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
ह्या चित्रपटासाठी होत असलेल्या ऍडव्हान्स बुकिंग वरूनच प्रेक्षकांनी चाहत्यांनी ह्या चित्रपटाला किती पसंती दिली आहे हे आपणास दिसून येत आहे.

पहिल्या दिवसात ह्या चित्रपटाची ३५ हजार तिकिटे विकली गेली असल्याचे सांगितले जात आहे.तिकिट बुकिंगवरून लोकांकडून ह्या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद प्राप्त होणार असे दिसुन येत आहे.
फक्त दोन दिवसांच्या कालावधीत आदीपुरूष ह्या प्रभास किर्ती सोनन अभिनित रामायणावर आधारीत चित्रपटाची जवळपास ४५ हजार पेक्षा अधिक तिकिट विकली गेली आहेत.
रविवार पासुन ह्या चित्रपटाच्या तिकिटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.
बाॅक्स आॅफिसने दिलेल्या रिपोर्ट नुसार सिने पोलिसमध्ये ह्या चित्रपटाची सुमारे ९ हजार तिकिटे विकली गेली आहेत.पीव्ही आर वर २१ हजार अणि आयनाॅक्स वर १४ हजाराच्या आसपास तिकिटे विकली गेली आहेत.
चाहत्यांकडुन चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद बघुन रिपोर्ट मध्ये असे देखील सांगितले आहे की ह्या चित्रपटासाठी सुमारे चार लाखापर्यंत तिकीट विकली जाऊ शकतात.
१६ जुन रोजी थिएटरवर रिलीज होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदी व्यतिरीक्त तामिळ तेलगू कन्नड मल्याळम इत्यादी भाषेत देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट शंभर कोटीचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.इतर भाषा वगळता फक्त फक्त हिंदी व्हरजन मधून हा चित्रपट दोन कोटीच्या आसपास कमाई करेल असे सांगितले जाते आहे.
आदीपुरूष हा नवीन रिलीज होत असलेला चित्रपट केजी एफ टु,पठान, काश्मीर फाईल्स ट्रीपल आर ब्रह्मास्त्र सारख्या बाॅक्स आॅफिसवर बक्कळ कमाई करणारया सिनेमांचे रेकाॅर्ड तोडण्यात किती यशस्वी ठरेल याचकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.