जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व काय आहे? जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो? -World Book and Copyright Day Quotes 2023

जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व काय आहे? जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो? -World Book and Copyright Day Quotes 2023

दरवर्षी आपण २३ एप्रिल ह्या तारखेला जागतिक पातळीवर पुस्तक दिन काॅपी राईट दिवस साजरा करत असतो.हयाच तारखेला अनेक प्रसिद्ध साहित्यिक जसे की शेक्सपिअर वगैरे इत्यादी यांचा जन्म अणि मृत्यु देखील झाला होता.

World Book and Copyright Day Quotes 2023
World Book and Copyright Day Quotes 2023

म्हणुन दरवर्षी हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.२३ एप्रिल ह्याच तारखेला विल्यम शेक्सपियर,मेनयुअल मेजिया वलिजो यांचा जन्म देखील झाला होता.

असे म्हटले जाते की अनेक दिग्दज लेखक साहित्यिक यांचा जन्म मृत्यु २३ एप्रिल रोजी झाला होता त्यामुळेच २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

१९९५ साली हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला प्रथमतः सुरूवात करण्यात आली होती.

सर्व लोकांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचनसंस्कृती जोपासली जपली जावी म्हणून दरवर्षी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

२३ एप्रिल हा वाचनाचे महत्व पटवून देणारा महत्वाचा दिवस आहे.हा दिवस जगाला वाचनाची महती सांगण्याचे काम करतो.

पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्या ज्ञानात वाढ,वृदधी होत असते.आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला समजुन घ्यायला मिळते.वाचनाने आपले व्यक्तिमत्वाचा विकास घडुन येत असतो.

वाचनामुळे आपण जुने राहत नाही नवीन बनत असतो.असे गोपाळ गणेश आगरकर यांनी देखील वाचनाचे महत्व पटवून देताना म्हटले आहे.

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन काॅपी राईट दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा युनेस्कोच्या घेतलेल्या एका सभेमध्ये युनेस्कोच्या वतीने करण्यात आली होती.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रेरणादायी कोटस सुविचार तसेच शुभेच्छा 

जगभरातील जेवढेही लेखक साहित्यिक ह्या दिवशी जन्मले तसेच मृत्यू पावले आहेत त्यांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी त्यांचा जागतिक पातळीवर गौरव करण्यासाठी हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

See also  युकेजी अणि एलकेजी चा फुलफाँर्म - UKG and LKG full form in marathi

ह्या दिवशी जागोजागी विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ वाटप केले जाते.मुलांना वाचनाचे महत्व पटवून दिले जाते.शाळा महाविद्यालयांमध्ये वाचन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असतात.

इंटरनेटच्या युगात जागोजागी आॅनलाईन पद्धतीने सर्व ग्रंथ विद्यार्थ्यांना पीडीएफ फाईल इत्यादी डिजीटल स्वरूपात वाचण्यासाठी उपलब्ध होत असतात, सर्व माहिती आज मुलांना इंटरनेटवर उपलब्ध होऊन जात असल्याने मुलांचे वाचनालयात जाऊन ग्रंथ वाचणे कमी होत चालले आहे.
अशा मुळे मुले पुस्तक वाचणे कमी करत आहेत

पुस्तक वाचनाकडे होत असलेले हे दुर्लक्ष दूर करण्यासाठी मुला़ंना पुस्तक वाचण्याचे महत्व पटवून देण्यासाठी अणि मुलांमध्ये पुस्तक वाचनाची अधिकाधिक गोडी निर्माण करणे ह्या प्रमुख उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

आधीच्या काळात ज्ञान प्राप्त करण्याचे एकमेव साधन हे ग्रंथ असल्याने अणि तेव्हा इंटरनेट वगैरे सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी तासनतास ग्रंथालयात बसुन वाचन करायचे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी तर जवळ वाचनासाठी पुस्तक उपलब्ध नसल्याने अणि नवीन पुस्तक विकत घेण्यासाठी खिशात पैसे नसल्याने विद्या प्राप्त करण्यासाठी अठरा अठरा तास वाचनालयात बसुन फक्त पावाचा तुकडा खाऊन अभ्यास केला होता.

पण आता इंटरनेट आल्यामुळे हेच ग्रंथ वाचनाचे महत्व कमी होऊ लागल्याने वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी वाचना विषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले गेले होते.

1 thought on “जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व काय आहे? जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो? -World Book and Copyright Day Quotes 2023”

Comments are closed.