जेईई ऍडव्हान्स डचा निकाल जाहीर निकाल बघण्यासाठी ह्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा – JEE advanced २०२३ result declared in Marathi

जेईई ऍडव्हान्स डचा निकाल जाहीर निकाल बघण्यासाठी ह्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा JEE advanced २०२३ result declared in Marathi

आय आयटी indian institute of technology तर्फे जुन आज १८ जुन २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जेईई अॅडव्हान्सडचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

  • जेईई ऍडव्हान्सची परीक्षा ४ जुन रोजी घेण्यात आली होती.
  • निकाल बघण्यासाठी आॅफिशिअल लिंक देखील जाहीर करण्यात आली आहे.आपला निकाल बघण्यासाठी अणि डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थी उमेदवारांना jeeadv.ac.in वर जायचे आहे.
  • यानंतर होमपेजवर गेल्यावर निकाल बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास लाॅग इन करायला आपला रेजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर अणि डेट आॅफ बर्थ इंटर करून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्यासमोर आपला रिझल्ट स्क्रीनवर दिसुन येईल.आपण आपला रिझल्ट डाऊनलोड करून घ्यायचा आहे अणि त्याची एक प्रिंट देखील काढुन घ्यायची आहे.

JEE advanced २०२३ result declared in Marathi
JEE advanced २०२३ result declared in Marathi

कोण आले जेईई ऍडव्हान्स  परीक्षेत प्रथम –

हैदराबाद झोनमधील व्हीसी रेडडी ह्याने ह्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे.व्ही सी रेड्डीला ह्या परीक्षेत ३६० पैकी ३४१ गुण मिळाले आहेत.

याचसोबत जेईई ऍडव्हान्स परीक्षेत ३६० पैकी २९८ गुण मिळवत नायकांता नागा भव्य ही महिला परीक्षेत टाॅपर ठरली आहे.नायकांता नागा भव्य ही देखील हैदराबाद झौन मधील आहे.

जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी सुमारे एक लाख ८० हजार ३५२ विद्यार्थी बसले होते.ज्यात फक्त ४३ हजार ७७३ विद्यार्थी पास झाले असल्याचे सांगितले जात आहे.

यात ३६ हजार २०४ इतके मुले होती अणि ७ हजार ५०९ मुली समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे.यंदा परीक्षेमध्ये हैदराबाद झोनमधील अधिक उमेदवारांचा समावेश होता.

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत गणित,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे एकुण तीन विषय होते.

या तिन्ही पेपरचे आयोजन प्रत्येकी साठ गुणांकरीता दोन शिफटमध्ये करण्यात आले होते.तिन्ही विषयांचा प्रत्येकी १२० गुणांसाठी पेपर घेण्यात आला होता

See also  भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती - भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत - Bharat Ratna Awardee list In Marathi

आय आयटी गुवाहाटीकडुन जेईई अॅडव्हान्सड परीक्षेच्या निकालासोबत परीक्षेची फायनल अॅन्सर की देखील जाहीर करण्यात आली आहे.

निकालाच्या दुसरया दिवशी १९ जुन २०२३ रोजी जाॅईट सीट अलोकेशन आॅथरीटीकडुन काऊन्सिलिंग करण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत रॅक मिळवली आहे असे सर्व विद्यार्थी जाॅईट सीट अलोकेशन प्रोसेस करीता पात्र ठरणार आहे.

ह्या प्रक्रिये अंतर्गत देशभरात असलेल्या आय आयटी एन आय टी मध्ये तसेच सरकारी अनुदाना अंतर्गत चालत असलेल्या टेक्निकल इंस्टीटयुट मध्ये प्रवेश दिला जातो.