डोळे येणे म्हणजे काय?Conjunctivitis and eye flu inspection meaning in Marathi

डोळे येणे म्हणजे काय?Conjunctivitis and eye flu inspection meaning in Marathi

सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात डोळे येण्याचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे.सध्या पावसाळा सुरु असल्याने हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे ही साथ पसरत आहे.

डोळे येणे हा एक आजार आहे जो आपल्या शरीरातील अत्यंत नाजुक तसेच संवेदनशील अवयव डोळ्याला होत असतो.ज्याला इंग्रजी मध्ये conjunctivitis असे म्हटले जाते.

हा आजार अत्यंत तीव्र गतीने पसरत असतो.हा आजार विषाणुच्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा अॅलर्जी मुळे होतो.

डोळे येणे conjunctivitis हा एक गंभीर स्वरूपाचा आजार नाहीये पण हा एक संसर्गजन्य आजार असल्याने हा लवकर पसरतो.

ज्या व्हायरस मुळे सर्दी होत असते त्याच व्हायरस मुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असते.

समजा एखाद्या व्यक्तीला व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या मुळे डोळे आले असतील तर हा आजार त्या व्यक्तीमार्फत त्याच्या आजुबाजुला वावरत असलेल्या त्याच्या संपर्कात येत असलेल्या इतर लोकांना देखील होतो.

पण समजा एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी मुळे हा संसर्ग झाला असेल तर त्याच्यामार्फत इतर व्यक्तींना हा संसर्गजन्य आजार जडत नाही.

डोळे येण्याची लक्षणे कोणकोणती आहेत?

Conjunctivitis and eye flu inspection meaning in Marathi
Conjunctivitis and eye flu inspection meaning in Marathi

असे म्हटले जाते की डोळे येण्याची लक्षणे सर्वप्रथम एका डोळयात दिसुन येत असतात.हया विषाणुंचा शरीरातील संसर्ग होण्यापासून लक्षणे दिसुन येण्याचा कालावधी तीन ते चार दिवस इतका असु शकतो.

डोळे आल्यावर खालील लक्षणे दिसुन येतात –

  • १)डोळे लाल होणे
  • २) डोळ्यातुन पाणी येणे
  • ३) डोळयांना वारंवार खाज येणे
  • ४) डोळयांना चिकटपणा येणे
  • ५) डोळ्यात आग आग होणे
  • ६) डोळ्यांना सुज येणे
  • ७) डोळ्यांनी धुकट दिसणे
See also  हेमोटोक्रिट टेस्ट विषयी माहिती - Hematocrit test information in Marathi

इत्यादी

काही वेळा डोळे आल्यावर सर्दी खोकला ताप ही लक्षणे देखील आपणास पाहावयास मिळत असतात.

डोळे आल्यावर काय उपचार करायला हवे?

डोळे आल्यानंतर साधारणत एक ते दोन आठवड्यात हा आजार आपोआप बरा देखील होऊन जात असतो.

आपले डोळे आले आहे अशी लक्षणे आपणास निर्दशनास आल्या आल्या आपण योग्य वेळी औषधोपचार करणे आवश्यक आहे.

डोळे येण्याच्या प्रकरणात काही केसेस मध्ये उपचारास उशिर झाल्यामुळे संसर्ग वाढुन तो बुबुळांपर्यत जाण्याची शक्यता असते.ज्यामुळे हा आजार गंभीर होऊन डोळ्यांच्या बुबुळांवर पांढरया रंगाचे ठिपके दिसायला देखील सुरूवात होते.

योग्य वेळी औषधोपचार केल्याने हा संसर्ग नक्कीच बरा होतो पण याला खुप जास्त कालावधी लागण्याची शक्यता असते म्हणून डोळे आल्याची लक्षणे जाणवताच रूग्णांनी विलंब न करता त्वरीत औषधोपचार घ्यायला हवे.

डोळे आल्यावर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ करण्यासाठी डाॅक्टर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अशी गोळ्या औषधे देत असतात.याने आपल्याला ह्या आजाराशी लढा देता येतो.

शिवाय आपल्या डोळयांमध्ये टाकण्यासाठी ड्राॅप लिहुन देत असतात.

डोळयांचा संसर्ग झाला आहे अशा प्रत्येक व्यक्तीने डोळयांना प्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून डोळयांवर चष्मा किंवा गाॅगल वापरायला हवा.

डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये याने त्याचा संसर्ग इतरांना देखील लागु शकतो.

डोळे वाहत असल्यास डोळयातुन घाण निघत असल्यास नियमित हात स्वच्छ धुवावेत याने आपले डोळयांना लावलेले हात घरातील इतर वस्तुंना लागुन त्याद्वारे दुसरे कोणाला आपल्यामुळे संसर्ग होणार नाही.घरात आपण स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे.

डोळे येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी?

डोळे येऊ नये म्हणून आपण पुढील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे –

आपले हात आपण नेहमी स्वच्छ ठेवायला हवे कुठल्याही वस्तुला हात लागल्यावर आपला हात डोळ्यांना लावू नये आधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत मग डोळ्यांना हात लावावा.शक्यतो संसर्गाच्या आपण वारंवार डोळ्यांना हात लावणे टाळायलाच हवे.

See also  जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस माहिती - World brain tumor day information in Marathi

आपल्या आजुबाजुला ही साथ पसरलेली असल्यास आपल्याला हा आजार जडु नये म्हणून आपण चष्मा अणि हात पुसायला रूमाल वापरायला हवा.

डोळे आलेल्या व्यक्तीला गळाभेट करणे त्याच्या हातात हात घेणे शक्यतो टाळावे.इतरांच्या वस्तू वापरणे टाळावे.

डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेला रूमाल टाॅवेल चादर इत्यादी कुठलीही वस्तू वापरू नये.

डोळे येण्याची साथ पसरण्याचे कारण-

पावसाळ्यात हवेमधील आद्रते मध्ये खुप अधिक प्रमाणात वाढ झालेली असते.हे सर्व वातावरण विषाणुंचा प्रसार होण्यासाठी अनुकूल असते.

पावसाळ्यात वातावरणात ओलावा राहत असल्याने हा संसर्ग बराच काळ आपल्या शरीरात राहत असतो.या काळात व्यक्तीला सतत घाम येत असल्याने ती शरीरावरील तसेच चेहरयावरील घाम देखील पुसत असते.

ज्यात आपले हात घाम पुसता पुसता नकळत डोळ्यांना लागल्याने आपले संसर्ग होऊन डोळे येत असतात.

Leave a Comment