निकॉन स्कॉलरशिप विषयी माहिती – Nikon scholarship information in Marathi

निकॉन स्कॉलरशिप विषयी माहिती – Nikon scholarship information in Marathi

निकॉन स्कॉलरशिप काय आहे?

निकॉन स्कॉलरशिप ही एक शिष्यवृत्ती योजना आहे.

निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडुन जे विद्यार्थी फोटोग्राफी क्षेत्रात आपले शिक्षण करीत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्काॅलरशिप सुरू करण्यात आली आहे.

निकॉन इंडिया कंपनीच्या वतीने कोणाला शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे?

निकॉन स्कॉलरशिप च्या माध्यमातून जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहेत अणि आपले पुढचे महाविद्यालयीन शिक्षण ते फोटोग्राफी ह्या क्षेत्रात करु इच्छित आहे.

अशा विद्यार्थ्यांना निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडून एक लाखापर्यंतची स्काॅलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे.

निकॉन स्कॉलरशिप ह्या योजनेचा लाभ कोणास होणार आहे?

आपल्या समाजातील जेवढेही नुकतेच बारावी उत्तीर्ण झालेले तसेच कमी उत्पन्न असलेले वंचित गटातील विद्यार्थी आहेत.

ज्यांचे उत्पन्न एवढे नाहीये की त्यांना आपल्या फोटोग्राफी क्षेत्रातील महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचा खर्च स्वता करता येईल अशा गरजु हुशार अणि कर्तबगार विद्यार्थी करीता निकाॅन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक स्काॅलरशिप प्रोग्राम राबवत आहे.

ह्या प्रोग्रॅम अंतर्गत फक्त असे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त करण्याकरीता अर्ज करू शकतात.

ज्यांना बारावी नंतर फोटोग्राफी क्षेत्रात उच्च शिक्षण प्राप्त करायचे आहे.फोटोग्राफी निगडीत एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करायचा आहे.

पण निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बडी फाॅर स्टडी मधील कर्मचारींची मुले ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

See also  कोल्हापूर महावितरण मध्ये १६५ पदांसाठी भरती सुरू - Mahavitaran Kolhapur Bharti 2023 In Marathi

निकॉन स्कॉलरशिप साठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

● अर्जदार बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

● निकॉन स्कॉलरशिप करीता जो विद्यार्थी अर्ज करीत आहे तो फोटोग्राफी संब़धित अभ्यासक्रमातच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असावा.

● याचसोबत अर्जदार जो फोटोग्राफी कोर्स करत आहे फोटोग्राफीचे डिग्री किंवा शिक्षण करीत आहे त्याचा एकुण कालावधी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळाचा असावा.

● निकॉन स्कॉलरशिप चा लाभ प्राप्त करण्याकरीता अर्ज करणारया अर्जदाराच्या कुटुबांचे एकूण उत्पन्न सहा लाखांपेक्षा अधिक नसावे.

निकॉन स्कॉलरशिप योजनेअंतर्गत किती शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे?

निकाॅन स्काॅलरशिप योजनेअंतर्गत फोटोग्राफी संब़धित अभ्यासक्रमात शिक्षण करीत असलेल्या विद्यार्थ्यांना किमान एक लाखापर्यंत स्काॅलरशिप निकाॅन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडुन प्रदान केली जाणार आहे.

निकॉन स्कॉलरशिप करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

निकॉन स्कॉलरशिप ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच अर्ज करू शकतात.

म्हणजे फक्त जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थी ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतील.म्हणुन इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला स्काॅलरशिप अर्ज भरायचा आहे.

निकॉन स्कॉलरशिप करीता विद्यार्थ्यांनी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

निकाॅन स्काॅलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना buddyforstudy.com ह्या वेबसाईटवर जाऊन आॅनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

निकाॅन स्काॅलरशिप करीता आॅनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपण buddy for study.com.ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्यासाठी apply now वर क्लिक करायचे आहे.तिथे निकाॅन स्काॅलरशिपच्या पेजवर आपल्या ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर द्वारे रेजिस्टर करून लाॉग इन करायचे आहे

यानंतर आपल्यासमोर निकाॅन स्काॅलरशिप अॅप्लीकेशनचे एक पेज ओपन होईल त्यावर start application button वर क्लिक करायचे आहे.

आपली विचारलेली सर्व माहीती अचुकरीत्या फाॅर्ममध्ये भरून घ्यायची आहे.भरलेल्या माहीती सोबत आवश्यक ते डाॅक्युमेंट अपलोड करायचे आहे.

दिलेल्या सर्व term and condition accept करून preview वर क्लिक करायचे आहे.प्रीव्युव्ह मध्ये आपणास आपली फाॅर्ममध्ये भरलेली सर्व माहीती दिसुन येईल.ती अचुक आहे की नाही हे एकदा चेक करून सबमिट बटणावर अखेरीस क्लिक करायचे आहे.अणि आपला फाॅम सबमिट करायचा आहे.

See also  टेट परीक्षेचे स्कोअर कार्ड झाले उपलब्ध डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा - TAIT score card download 2023 in Marathi

निकाॅन स्काॅलरशिपकरीता अर्ज करण्यासाठी महत्वाचे डाॅक्युमेंट लागतील?

● फोटो आयडेंटीटी प्रुफ

● अॅड्रेस प्रुफ

● बारावी उत्तीर्ण असल्याचे मार्कशीट

● अर्जदार फोटोग्राफी स़ंब़ंधित अभ्यासक्रमासाठी अँडमिशन घेत असल्याचे प्रुफ म्हणजे प्रवेश शुल्क पावती.

● चालू शैक्षणिक वर्षांची फी ची पावती

● शिष्यवृत्ती करीता अर्ज करणारया अर्जदाराचा बॅक खाते तपशील तसेच बॅक पासबुकची झेरॉक्स

Leave a Comment