पितृदोष म्हणजे काय? Pitru Dosh Meaning In Marathi

पितृदोष म्हणजे काय? Pitru Dosh Meaning In Marathi

हिंदू धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की आपल्या पुर्वजांनी जी चांगली तसेच सदोष कर्म केलेली असतात त्या कर्मांची फळे आपल्याला म्हणजेच त्यांच्या वंशजांना भोगावी लागत असतात.यालाच आपण पितृदोष असे म्हणत असतो.

कोणाच्या कुंडलीमध्ये पितृदोष तयार होत असतो?

अशा प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत हा दोष निर्माण होऊ शकतो ज्याचे पुर्वज सुखी नाही.

जे व्यक्ती दरवर्षी पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्रादध करीत नसतात, त्यांच्या श्राद्ध विधित सहभागी होत नसतात.आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कुठलीही पुजा अर्चा हवन वगैरे करीत नसतात.अशा व्यक्तींच्या कुंडलीत हा दोष अधिक अधिक प्रबळ होत असतो.

पितृदोष असलेल्या व्यक्तीला जीवनात कोणकोणत्या अडीअडचणी येत असतात?

ज्या व्यक्तीला पितृदोष आहे अशा व्यक्तिंना सतत आजारपणाला विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते,त्यांची कुठल्याही हाती घेतलेल्या कार्यात काम करत असलेल्या क्षेत्रात पाहीजे तेवढी प्रगती होत नसते.

अशा व्यक्तींकडे नेहमी संपत्तीचा अभाव असतो.काही व्यक्तींना तर सर्व सुख सुविधा धन दौलत संपत्ती असुनही शांतता प्राप्त होत नसते, घरात सतत भांडणत़ंटा चिडचिड कटकट होते अशा इत्यादी अडीअडचणी पितृदोष असलेल्या व्यक्तींच्या जीवनात येताना आपणास दिसून येतात.

पितृदोष कोणकोणत्या परिस्थिती मध्ये लागु होत असतो?

आपल्या जीवनात पितृदोष जडण्याची अनेक कारणे असतात त्यातील काही अत्यंत महत्वाची प्राथमिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

● जर आपण आपल्या पितरांचे योग्य पद्धतीने श्रादध अंत्यसंस्कार नही केले तर आपणास पितृदोष जडु शकतो.किंवा पितरांचा अपमान होईल असे काही कृत्य केले त्यांना आपण समजा विसरलो तरी देखील आपणास पितृदोष जडत असतो.

See also  यु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो?- UIDAI full form in Marathi

पितृदोष जडण्याची इतर कारणे –

● विनाकारण सापाची हत्या केली तेव्हा सुद्धा आपणास पितृदोष लागु शकतो.

● याचसोबत समजा आपण एखादे धार्मिक ठिकाण जसे की मंदिर देवस्थान इत्यादी जवळचे पिंपळाचे तसेच वडाचे झाड तोडले तरी देखील आपल्याला पितृदोष लागत असतो.

● ग्रह तसेच कुंडलीमध्ये काही दोष असल्यास देखील पितृदोष निर्माण होत असतो.

पितृदोष दुर करण्यासाठी आपण काय उपाय करायला हवे?

पितृदोष दुर करण्यासाठी आपणास ब्राहमणांकडुन अनेक उपाय सांगितले जात असतात.

ज्यात आपल्या मृत झालेल्या नातेवाईक आप्तेष्टांच्या निर्वाण तिथीच्या दिनी गरीब तसेच गरजु लोकांना अन्न खाऊ घालण्यास सांगितले जाते.तसेच भोजनात मृत झालेल्या व्यक्तीचे आवडते अन्नपदार्थ समाविष्ट करण्यास सांगितले जाते.

मृत झालेल्या व्यक्तीच्या निर्वाण तिथीला रस्त्यावरील गोर गरीबांना कपडे वाटप करायला सांगितले जाते.तसेच २१ सोमवार करायला सांगितले जाते.

काही व्यक्ती पितृदोष निवारण करण्यासाठी पशु पक्षी प्राणीमात्रांना अन्न खाऊ घालत असतात.वेगवेगळया प्रकारच्या पुजा हवन करत असतात.

अशा पद्धतीने पितृदोष दुर करण्यासाठी त्याचे विविध उपाय आपणास ब्राह्मणांकडुन सुचविले जात असतात.

2 thoughts on “पितृदोष म्हणजे काय? Pitru Dosh Meaning In Marathi”

Comments are closed.