बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये २७ जागांसाठी भरती सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये २७ जागांसाठी भरती सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक इंग्रजी अणि कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक मराठी अशा दोन पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

पदाचे नाव

१)कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक इंग्रजी

या पदासाठी एकुण रिक्त जागा ९ आहेत

 • अनुसूचित जाती -१ जागा
 • अनुसूचित जमाती -१ जागा
 • वि.जा -१ जागा
 • इतर मागासवर्गीय -२ जागा
 • एसबीसी -२ जागा
 • खुला प्रवर्ग -३ जागा

यात सर्वसाधारण ७ जागा आहेत अणि महिलांसाठी २ जागा आहेत म्हणजे ३० टक्के इतके आरक्षण महिलांना देण्यात आले आहे.

रिक्त पदे फक्त ९ आहेत म्हणुन शासन निर्देशानुसार माजी सैनिक,खेळाडु, प्रकल्प ग्रस्त,अनाथ मुलांसाठी इथे कुठल्या प्रकारचे आरक्षण असणार नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक इंग्रजी पदाच्या अधिक सविस्तर माहितीसाठी आपण भरतीचे नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.

 

२) कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक मराठीया पदासाठी एकुण १८ पदे भरली जात आहेत.

 

 • .जा जागा

 

 • . जागा

 

 • वि.जा जागा

 

 • एन टीसी जागा

 

 • एन टी डी जागा
See also  आर्थिक विश्लेषक नोकरीचे वर्णन,भूमिका आणि जबाबदाऱ्या Financial analyst job description roles and responsibilities

 

 • इतर मागासवर्गीय जागा

 

 • एस बी सी जागा

 

 • खुला प्रवर्ग जागा

 

यात सर्वसाधारण गटातुन अकरा जागा भरण्यात येणार आहेत यात महिलांकरीता ३० टक्के प्रमाणे पाच जागा माजी सैनिक यांच्यासाठी १५ टक्के प्रमाणे दोन जागा इतके आरक्षण देण्यात आले आहे.

 

इथे देखील शासन निर्देशानुसार माजी सैनिक,खेळाडु, प्रकल्प ग्रस्त,अनाथ मुलांसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण असणार नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

 

शैक्षणिक पात्रतेच्या अटी

 

)कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक इंग्रजी

 

 • उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा तसेच तत्सम परीक्षा उत्तीर्ण असायला हवे.
 • उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा मध्ये शंभर गुणांसाठी मराठी अणि इंग्रजी हे विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.
 • इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट अणि इंग्रजी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट ह्या वेगाची शासकीय परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याचे सर्टिफिकेट असायला हवे.सदर पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती झालेल्या तारखेपासुन दोन वर्षांच्या आत मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट अणि मराठी लघुलेखनऐंशी शब्द प्रति मिनिट ह्या वेगाची शासकीय परीक्षा पास होणे गरजेचे आहे नाहीतर त्याला पुढील पदोन्नतीचे फायदे प्राप्त होणार नाही.
 • उमेदवाराकडे एम एस सी आयटी पास असल्याचे सर्टिफिकेट असायला हवे अणि समजा उमेदवाराकडे अर्ज करताना हे सर्टिफिकेट नसेल तर पदावर नियुक्ती झाल्याच्या दोन वर्षांच्या आत त्याला हे शासनाने विहित केलेले सर्टिफिकेट प्राप्त करून सादर करावे लागणार नाहीतर कुठलेही कारण देता उमेदवाराची सेवा रदद देखील केली जाऊ शकते.

 

) कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक मराठी

 

 • इथे देखील उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा तसेच तत्सम परीक्षा उत्तीर्ण असायला हवा.
 • उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा मध्ये शंभर गुणांसाठी मराठी अणि इंग्रजी हे विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.
 • उमेदवार मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन ८० शब्द प्रति मिनिट ह्या वेगाची शासकीय परीक्षा उत्तीर्ण असायला हवा.
 • उमेदवाराने निवड झालेल्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट अणि इंग्रजी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट ह्या वेगाची शासकीय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अन्यथा त्याला पदोन्नतीचा कुठलाही लाभ अनुज्ञेय नसेल.
 • उमेदवाराकडे एम एस सी आयटी पास असल्याचे सर्टिफिकेट असायला हवे अणि समजा उमेदवाराकडे अर्ज करताना हे सर्टिफिकेट नसेल तर पदावर नियुक्ती झाल्याच्या दोन वर्षांच्या आत त्याला हे शासनाने विहित केलेले सर्टिफिकेट प्राप्त करून सादर करावे लागणार नाहीतर कुठलेही कारण देता उमेदवाराची सेवा रदद देखील केली जाऊ शकते.
See also  Horticulture Training Course -फलोत्पादन प्रशिक्षण -NIPHT

 

वयोमर्यादा

 

उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सेवेत नसेल तर त्याचे वय अर्ज सादर करायचा तारखेला १८//२०२३ रोजी जर तो ओपन कॅटॅगरी मधील असेल तर १८ ते ३८ असणे आवश्यक आहे.

अणि मागासवर्गीय असल्यास १८ ते ४३ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

जे उमेदवार आधीपासून बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सेवेत असतील त्यांना कुठलीही वयोमर्यादा लागणार नाही.

 

निवडीचे निकष अणि कार्यपद्धती

 

)कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक इंग्रजी

 

कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक इंग्रजी पदाच्या उमेदवारांची भरतीसाठी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट इतकी व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे.

तसेच इंग्रजी टंकलेखनाची चाळीस शब्द प्रति मिनिट ह्या वेगाची व्यावसायिक चाचणी कंप्युटर वर घेतली जाणार आहे.

मग निवडीसाठी पात्र ठरणार असलेल्या उमेदवारांची गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.सदर यादीनुसार विहित आरक्षणाच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

उपरोक्त अ चे परिगणन केल्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांचे सारखे गुण आढळून येत असतील तर खालील दिलेले निकष विचारात घेतले जातील.

माध्यमिक शालांत परीक्षा मधील टक्केवारी

पण वरील निकष लागुनही दोन्ही उमेदवारांचे गुण समान समान येत असतील तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला अशा परिस्थितीत मुख्य प्राधान्य दिले जाणार आहे.

 

) कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक मराठी

 

कनिष्ठ लघुलेखक नि वृतनिवेदक मराठी पदाच्या उमेदवारांची भरतीसाठी मराठी लघुलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट इतकी व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे.

मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रति मिनिट वेगाची व्यावसायिक चाचणी कंप्युटर वर घेतली जाणार आहे.

मग निवडीसाठी पात्र ठरणार असलेल्या उमेदवारांची गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.सदर यादीनुसार विहित आरक्षणाच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

See also  कोकण लिमिटेड काॅर्पोरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू - Konkan Railway Corporation Limited Recruitment 2023 In Marathi

उपरोक्त अ चे परिगणन केल्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांचे सारखे गुण आढळून येत असतील तर खालील दिलेले निकष विचारात घेतले जातील.

माध्यमिक शालांत परीक्षा मधील टक्केवारी

पण वरील निकष लागुनही दोन्ही उमेदवारांचे गुण समान समान येत असतील तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला अशा परिस्थितीत मुख्य प्राधान्य दिले जाणार आहे.

उमेदवाराला मौखिक चाचणी द्यावी लागणार नाही.

 

अर्ज कुठे अणि कसा सादर करायचा आहे?

 

सर्व उमेदवारांनी आपला अर्ज एका बंद लिफाफयामध्ये टाकायचा आहे त्यावर आपले नाव पत्ता टाकायचा आहे.ज्या पदासाठी अर्ज करीत आहे त्या पदाचे नाव देखील ठळक शब्दांत लिहायचे आहे.अणि ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत महानगरपालिका सचिव कार्यालय खोली क्रमांक १०० पहिला मजला विस्तारीत ईमारत महापालिका मार्ग मुंबई ह्या पत्त्यावर आवश्यक ते कागदपत्र जोडुन टपालाने पाठवायचा आहे.किंवा स्वता कार्यालयात जाऊन जमा करून यायचे आहे.

कोणकोणते कागदपत्र आपणास जोडायचे आहे हे नोटीफिकेशन मध्ये सविस्तर दिले आहे.

सदर भरती विषयीच्या सर्व इतर महत्त्वाच्या अटी नियम परीक्षा बाबदच्या सुचना आरक्षणाविषयी इतर सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी उमेदवारांनी नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती pdf

BMC_MCGM_Recruitment_2023_for_27_Jr-Steno-cum-Reporter_Posts

Leave a Comment