टेलिकाॅलरचे काम काय असते? Job description of tele caller

टेलिकाॅलरचे काम काय असते?Job description of tele caller

टेलिकाॅलर यालाच टेलिमार्केटर असे देखील म्हटले जाते.टेलिकाॅलर हा कुठल्याही कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसला सेल करण्यासाठी कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसची मार्केटिंग करण्यासाठी मदत करत असतो.

याचमुळे टेलिकाॅलरला टेलिमार्केटर असे देखील संबोधले जाते.टेलिकाॅलर हा कंपनीच्या कस्टमर्सला काॅल करून कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत असतो.त्याची फोनवरून सेलिंग तसेच मार्केटिंग करत असतो.

टेलिकाॅलर हा कंपनीच्या वतीने कस्टमरला फोन करत असतो अणि आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसला खरेदी करण्यासाठी कस्टमरला कन्व्हेयन्स करत असतो.कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची मार्केटिंग करीत असतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर टेलिकाॅलर हा एक सेल्स जाॅब असतो ज्यात कुठल्याही कंपनीत कामाला लागलेल्या टेलिकाॅलरला त्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची काॅलिंग दवारे सेलिंग मार्केटिंग करावी लागते.कस्टमरला त्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करावे लागते.

टेलिकाॅलरचा जाॅब हा थोडा अवघड मानला जातो.कारण यात आपल्याला कंपनीच्या मोबाईल नंबर्सवरून कंपनीच्या वतीने लोकांना फोन करावा लागतो अणि आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी त्यांना राजी करावे लागते.

यात कधी कधी कस्टमर रागाच्या भरात आपल्यावर ओरडण्याची चिडण्याची देखील शक्यता असते.काही कस्टमर आपण एखादी वस्तु प्रोडक्ट विकण्यासाठी फोन केला आहे हे कळताच फोन देखील ठेवून देत असतात.ह्या सर्व गोष्टींना टेलिकाॅलरला सामोरे जावे लागते.

Job description of tele caller
Job description of tele caller

टेलिकाॅलरला कंपनीत कोणकोणते काम करावे लागतात?

  • कुठल्याही कंपनीत टेलिकाॅलरचे काम टार्गेट वर आधारित असते.यात टेलिकाॅलरला कंपनीकडून जेवढे टार्गेट देण्यात आले आहे तेवढ्या सेल्स मिटिंग कन्फर्म कराव्या लागतात,
  • किंवा २०० ते ३०० फोन नंबर कंपनीकडुन दिले जात असतात त्या सर्व नंबरवर फोन करून कंपनीच्या सेमिनार करीता कस्टमर्सला बोलावण्याचे काम आपणास यात करावे लागते.
  • याचसोबत आपणास कस्टमरला फोन करून आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विसेस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करावे लागते.यात देखील टेलिकाॅलरला काही टार्गेट दिलेले असते जे त्याला पुर्ण करावे लागते.
  • काही टेलिकाॅलर जाॅबमध्ये जर आपण कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची जास्तीत जास्त सेलिंग केली तर त्यावर आपल्याला कंपनीकडून बोनस इनसेंटिव्ह देखील दिला जातो.
  • पण हा जाॅब करण्यासाठी आपल्या अंगी चांगले संवाद संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.यात आपणास कंपनीच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट सर्विसेसची मार्केटिंग सेलिंग करावी लागते कस्टमरला ते विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करावे लागते
  • म्हणून आपणास कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसचे उत्तम नाॅलेज असणे आवश्यक असते.आपली कस्टमर कन्व्हेयन्सिंग पावर चांगली असावी.
  • मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेवर आपली उत्तम पकड असायला हवी.अणि कंप्युटरचे बेसिक नाॅलेज असणे देखील आवश्यक आहे.याचसोबत आपल्यामध्ये कस्टमरच्या समस्या अडीअडचणी सोडविण्याचे कौशल्य असायला हवे.
  • आपल्याला कंपनीच्या प्रोडक्ट सर्विस विषयी माहिती प्राप्त व्हावी, कस्टमरला कसे कन्व्हेयन्स करावे त्यांच्याशी कसे बोलायचे हे माहीत असावे याकरीता हे सर्व शिकवण्यासाठी काही कंपनींमध्ये ट्रेनिंग देखील दिले जाते.
See also  गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना २०२३ विषयी माहिती - Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra