ब्रॅण्ड प्रमोटरचे काम काय असते त्यांची भुमिका तसेच जबाबदारी काय असते?Brand promoter job description Duties roles and responsibilities

ब्रॅण्ड प्रमोटरचे काम काय असते -?Brand promoter job description Duties roles and responsibilities

ब्रॅण्ड प्रमोटर हे प्रोफेशनल व्यक्ती असतात जे एका विशिष्ट कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसचे मार्केटमध्ये प्रमोशन करण्याचे काम करीत असतात.

जेव्हा एखाद्या लहान तसेच मध्यम स्वरूपी कंपनीला मार्केट मध्ये नवीनच लाॅच झालेल्या आपल्या एखादया विशिष्ट प्रोडक्ट सर्विस विषयी आपल्या टार्गेट कस्टमर्सला माहीती द्यायची असते.

तेव्हा ती कंपनी आपल्या प्रोडक्ट सर्विसेसचे प्रमोशन करण्यासाठी ब्रँड प्रमोटरला हायर करीत असतात.

ब्रँड प्रमोटर हे त्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसचे वैशिष्ट्य काय आहे?त्यात मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या इतर प्रोडक्ट सर्विस पेक्षा असे काय वेगळे आहे

Brand promoter job description
Brand promoter job description

सदर कंपनीचे प्रोडक्ट सर्विस लोकांनी का विकत घ्यायला हवे ह्या प्रोडक्टची खरेदी केल्याने कस्टमर्सला काय फायदा होईल हे ब्रँड प्रमोटर कस्टमर्सला समजावून सांगत असतात.

ब्रँड प्रमोटर हे त्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्याला मार्केट मध्ये प्रमोट करण्याचे काम करतात.

त्या कंपनीच्या इतर प्रोडक्ट सर्विस विषयी लोकांना माहिती देणे, कंपनीच्या कुठल्या प्रोडक्ट सर्विस वर कोणती उत्तम आॅफर सध्या सुरू आहे याची देखील लोकांना माहीती देत असतात.

लोकांच्या मनात कंपनीच्या प्रोडक्ट सर्विस खरेदी करण्यासाठी रूची आवड इच्छा निर्माण व्हावी म्हणून त्यांना कंपनीचे सॅपल प्रोडक्ट दाखवणे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या प्रोडक्टची ख्याती पोहोचेल अणि जास्तीत जास्त लोक ते प्रोडक्ट खरेदी करतील.

कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची जाहीरात वेगवेगळ्या वर्तमानपत्रात प्रसारमाध्यमांवर प्रदर्शित करणे हे काम देखील ब्रँड प्रमोटरचे असते.

याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या कंपनीचे प्रोडक्ट ब्रँड पोहोचता अणि कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सेलिंग देखील होते.

पण यासाठी ब्रँड प्रमोटरला तो ज्या कंपनीची ब्रॅडिंग करत आहे त्या कंपनीची अणि त्या कंपनीच्या सर्व प्रोडक्ट सर्विसेसची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.नाहीतर तो टार्गेट कस्टमर्सला त्या प्रोडक्ट सर्विस विषयी सविस्तर अणि सखोलपणे माहिती देऊ शकणार नाही.

  1. ब्रँड प्रमोटर हा आपल्या वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाऊंट दवारे लोकांपर्यंत पोहोचुन त्या विशिष्ट कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची ब्रॅडिंग मार्केटिंग करीत असतो.त्या कंपनी विषयी लोकांना माहिती देत असतो.
  2. यासाठी ब्रँड प्रमोटरचे आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वर लाखोंच्या करोडोंच्या संख्येत फाॅलोअर्स असणे आवश्यक आहे जेणेकरून तो त्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकेल.
  3. याचसोबत तो प्रसारमाध्यमांवर वेगवेगळ्या जाहिरातीद्वारे देखील कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची ब्रॅडिंग मार्केटिंग करत असतो.
  4. ब्रँड प्रमोटरला मार्केटचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे कुठले प्रोडक्ट सर्विस कुठे अधिक विकले जातील कुठल्या कस्टमरची काय आवश्यकता आहे हे माहीत असायला हवे.जेणेकरून तो त्या प्रोडक्ट ची आवश्यकता असलेल्या टार्गेट कस्टमर्स पर्यंत त्या प्रोडक्ट सर्विसेसला पोहोचवू शकेल.
  5. ब्रँड प्रमोटर हे मोठमोठ्या माॅल मार्केट मध्ये जिथे भरपुर लोकांची गर्दी असेल तिथे जाऊन तिथे स्वता त्या प्रोडक्टची माहीती देऊन किंवा लाईव्ह डेमोंस्ट्रेंशन देऊन त्या कंपनीच्या प्रोडक्टचे प्रमोशन करीत असतात.
  6. अशा सार्वजनिक स्थळांवर कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसच्या जाहीरातीचे मोठमोठे पोस्टर्स देखील लावत असतात.
  7. लोकांकडुन कस्टमर्सकडुन प्रोडक्ट सर्विस विषयी जो काही सकारात्मक तसेच नकारात्मक प्रतिसाद प्राप्त होत असेल त्याची नोंद ठेवण्याचे काम देखील ब्रँड प्रमोटरचे असते.
  8. कारण कस्टमर कडुन प्राप्त होत असलेल्या प्रतिसादानुसार कंपनीला आपल्या प्रोडक्ट सर्विस मध्ये आवश्यक ते बदल घडवून आणावे लागत असतात.त्यात सुधारणा घडवून आणाव्या लागत असतात.जेणेकरून त्या टारगेट कस्टमर्सच्या आवश्यकता त्या प्रोडक्ट सर्विस मधून पुर्ण होतील.
See also  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल आरटीई प्रवेशाची लाॅटरी - RTE Lottery result date in Marathi