४५ मराठी उखाणे -Marathi UKHANE

४५ मराठी उखाणे- Marathi UKHANE

१) दाम नको दागिना नको,
नको चंद्रहार
….रावांचे नाव हाच माझा अलंकार

२) सत्यवानासाठी सावित्रीने केला यमदेवाचा पिच्छा
…राव सुखी राहावे हीच माझी ईच्छा

३) वर्षात्रतुच्या आगमनाने धरती होते हसरी
….नावांचे नाव घेते मी नवपरिणिता लाजरी

४) संसाररूपी करंडा मनोरूपी झाकण
….रावांचे नाव घेते आशिर्वाद द्यावा आपण

५) नाही मोठेपणाची अपेक्षा
नाही दौलतीची ईच्छा
…. रावांच्या संसारी आपण सर्वांच्या शुभेच्छा

६) एकदानी केली बिंदी केली
करायची राहीली सरी
…. रावांच्या नावासाठी काळी पोत बरी

७) असंख्य तारे नभात पाहावे निरखुन
…रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखुन

८) ह्या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी
…रावांचे नाव घेते चंद्र सुर्य साक्षी

९) छोटेसे घरकुल माझे
सामावून घेत सारयांना
….रावांची प्रेमळ साथ तृप्त करते मनाला

१०) काचेच्या ग्लासात चक चक दही
…रावांच्या अंगठीवर इंग्लिश माझी सही

११) साडी घालते फॅशनची
पदर घेते साधा
…राव माझे कृष्ण मी त्यांची राधा

१२) उखाणा घेते आशिर्वाद द्यावा
…रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा

१३) खाण तशी माती
…राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती

१४) अंगनात वृंदावन वृंदावनात तुळस
…रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस

१५) हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी
…रावांमुळे आली आयुष्याला गोडी

१६) गोकुळच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी
…रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी

१७) सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला
…रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला

१८) महादेवाच्या मंदिरात सोन्याचा कळस
…रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस

१९) अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी
… रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती

२०) हिरवीगार झाडे नदीच्या काठी
…रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी

२१) कपाळी लावते टिकली चंद्रकोर
…रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर

See also  एप्रिल फूल डे २०२३ । एप्रिल फूल डेचा इतिहास । उद्देश ।विशेष काय आहे । April Fools Day 2023 In Marathi

२२) गणपतीला आवडतात मोदक
कृष्णाला आवडते लोणी
…रावांसोबत करते
नवीन घरात प्रवेश अडवू नका कोणी

२३) कुबेराच्या भंडारात हिरे मालिकाच्या राशी
…रावांचे नाव हीच माझी अयोध्या काशी

२४) चटक चांदणी शुभ्रतेची कला
… रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला

२५) राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य
त्यात आहे आमच गाव सर्वांनी ऐका
… आहे माझ्या रावांचे नाव

२६) भारत देशात सोने चांदी हिरे मोती महागले
…रावांसारखे रत्न हाती लागले

२७) गहु तांदळाने भरले सुप
… रावांचा स्वभाव भारी आहे खुप

२८) निळ्या नभात चंद्राचा प्रकाश
…रावांवर आहे माझा विश्वास

२९) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
…रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल

३०) अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी
…राव माझे शिव मी त्यांची पार्वती

३१) संसाररूपी पुस्तकाचे उघडते पहिले पान
…रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान

३२) हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी
…रावांमुळे आली आयुष्याला गोडी

३३) माहेरी साठवले मायेचे मोती
…रावांचे नाव घेऊन जोडली नवीन नाती

३४) दागिना नको नको चंद्रहार
…राव हेच माझे खरा अलंकार

नववधु वराकरीता सत्यनारायणासाठी उखाणे –

Marathi UKHANE
Marathi UKHANE

१)महादेवाच्या पिंडीवर खडीसाखरेचे खडे
… रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे

२) आषाढात आकाशात गडगडतात ढग
अणि चमकतात विजा
…रावांचे बरोबर करते
सत्यनारायणाची पूजा

३) अंबाबाईच्या देवळात नैवेद्याच्या राशी
…रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

४) वाल्मिकी त्रषींनी रचले रामायण
…रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण

५) पुण्य कर्म केले असतील तर
टिकतात जन्मोजन्मीच्या गाठी
…रावांचे नाव घेऊन जाते सत्यनारायण पूजेसाठी

६) सासु माझी प्रेमळ
नणंद माझी हौशी
…रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

७)कोमेजु नये प्रेम दरवळो सदा प्रीतीचा सुवास
…रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

८) सत्यनारायणाच्या पुढे लावली
समईची जोडी
…रावांमुळे आली माझ्या संसाराला गोडी

See also  Bank holiday list in March 2022 - बँकेच्या सुट्ट्या मार्च 2022

८) मोत्यांची माळ घालून केला सोन्याचा साज
…रावांचे नाव घेते सत्यनारायण पुजा आहे आज

९) महाराष्ट्राची परंपरा आहे मंगळागौरीचे खेळ
…रावांचे नाव घेते झाली सत्यनारायण पूजेची वेळ

१०) सत्यनारायणाच्या समोर प्रसादाला ठेवले पेढे
…रावांचे नाव घ्यायला कशाला घेऊ आढेवेढे