चालु घडामोडी मराठी – 16 मे 2022 Current affairs in Marathi

चालु आणि ताज्या घडामोडी – Current affair in Marathi

1) मनोज पांडे यांना परम विशिष्ट सेवा पदक  प्रदान-

मनोज पांडे यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

● मनोज पांडे यांनी केलेल्या असामान्य सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

● मनोज पांडे यांना 30 एप्रिलला लष्कराचे एकोणतिसावे प्रमुख बनवण्यात आले होते.

● परम विशिष्ट सेवा पदक ह्या पुरस्काराची स्थापणा 26 जानेवारी 1960 रोजी भारताच्या राष्टपतींच्या हस्ते करण्यात आली होती.

● हा पुरस्कार देण्यामागचा हेतु हा सशस्त्र दलामधल्या कर्मचारींकडुन प्रदान केल्या गेलेल्या विशिष्ट सेवेची आपणास ओळख पटवून देणे हा आहे.

2) महाराष्ट राज्यातील मानघर हे गाव बनणार पहिले मधाचे नाव-

महाराष्ट राज्यातील मानघर हे गाव आता पहिले मधाचे नाव बनणार आहे.

● खादी आणि ग्रामोदयोग आयोगाकडुन ही मधगाव योजना राबविण्यात येणार आहे.

● ह्या योजनेचा असा फायदा होईल की ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिकाधिक रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण होतील.

● मानघर या गावातील 100 कुटुंबांपैकी 80 कुटुंबांकडून मधमाश्या पालन हा व्यवसाय केला जातो.

● ही योजना राबविण्याचे प्रमुख उददिष्ट हे दर्जेदार आणि उच्चतम दर्जाच्या मधाचे उत्पादन करणे,मधमाशांसाठी हाँस्पिटल्स आणि प्रयोगशाळा उभारणे हे आहे.

● ह्या उपक्रमादवारे सरकारकडुन या भागामध्ये मधमाशांच्या संख्येत वाढ व्हावी याकरीता महत्वाची पाऊले देखील उचलली जाणार आहेत.

3) 90 मेगावँट क्षमता असलेला आसाम मधील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अझुरेर पाँवर दवारे कार्यान्वित-

नुकताच 90 मेगावँट इतकी क्षमता असलेला आसाम मधील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अझुरेर पाँवर यादवारे कार्यान्वित करण्यात आला आहे.

● आसाम मधला 90 मेगावँट सौर उर्जा असलेला हा प्रकल्प असणार आहे.

● आणि हया 90 मेगावँट क्षमतेचा प्रसार आसाममधील एकुण चार जिल्हयात झालेला आहे.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नोंदणी केलेला तारा कसा बघायचा? How to view Babasaheb ambedkar star on mobile phone in Marathi

● या प्लांटदवारे जी वीज निर्माण होत आहे ती आसाम पाँवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लि.टेडच्या दिर्घकालीन 25 वर्षाच्या वीज खरेदी करारा अंतर्गत 3.33 प्रति किलोवँट तास दरानुसार पुरवण्यात येत आहे.

4)श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानपदी रनिल विक्रमसिंघे यांची नियुक्ती-

नुकतीच श्रीलंकेच्या जुने पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानपदी रनिल विक्रमसिंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

● श्रीलंका ह्या देशाच्या सध्याच्या राष्टपतीपदावर गोटाबाया राजपक्षे हे कार्यरत आहेत.

● श्रीलंका ह्या देशाच्या एकुण दोन राजधान्या आहेत एक कोलंबो आणि दुसरी जयवर्धनेपुरा कोटटे.

5) कँटालिन नोव्हाक यांची हंगरीची पहिली महिला अध्यक्ष म्हणुन निवड-

कँटालिन नोव्हाक यांची हंगरी ह्या देशाची पहिली महिला अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली आहे.

6) डिकोडिंग द योगसुत्र बाय पतंजली पुस्तक प्रकाशित-

डिकोडिंग द योगसुत्र बाय पतंजली हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

● ह्या पुस्तकाचे एकुण दोन लेखक आहेत एक जय सिंघानिया आणि दुसरे आचार्य कौशल्यकुमार या दोघांनी मिळुन ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे.

7) आज 16 मे रोजी साजरा करण्यात येणार बुदधजयंती –

आज 16 मे रोजी गौतम बुदध यांची जयंती ही साजरी केली जाणार आहे.

● दर वर्षी १६ मे रोजी गौतम बुदध यांची जयंती साजरी केली जात असते.जिला बुदध पौर्णिमा तसेच बुदध जयंती म्हणुन संबोधिले जाते.

8)नासाने चंद्रावरून गोळा केलेल्या मातीत केली वनस्पतींची वाढ-

नुकतेच नासा ह्या अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावरून गोळा केलेल्या मातीत वनस्पतींची वाढ केली आहे.

● नासा हे अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था आहे.

● हा मानवी इतिहासामधला अंतराळ संशोधनातील पहिला आणि ऐतिहासिक टप्पा मानला गेला आहे.

● संशोधकांकडुन अपोलो 11,12,13 या मोहीमेदवारे चंद्रावरून माती गोळा करण्यात आली आहे.

● संशोधकांकडुन प्रत्येक वनस्पतीची वाढ होण्याकरीता सुमारे एक ग्रँम इतक्या चंद्रावरील मातीचा उपयोग केला गेला आहे.

See also  कौन थे नितेश पांडे? अभिनेता का ५१ वर्ष की आयु में निधन हो गया

9) भारताने केले कोविड बुस्टर डोसचे अंतर 3 महिने कमी-

नुकतेच भारत देशाने आंतरराष्टीय प्रवाशींकरता कोविड बुस्टर डोसचे अंतर 3 महिने इतके कमी केले आहे.

10) उत्तर कोरियाने 12 मे रोजी नोदविले कोविड 19 चे पहिले प्रकरण-

नुकतेच 12 मे 2022 रोजी उत्तर कोरिया ह्या देशाकडुन कोविड 19 चे पहिले प्रकरण नोंदविण्यात आले आहे.

11) कँम्पबेल विल्सन यांचे नाव देण्यात आले एअर इंडियाच्या सीईओ,एम डी ह्या पदासाठी-

नुकतेच कँम्पबेल विल्सन यांचे नाव एअर इंडियाच्या सीईओ,एम डी ह्या पदासाठी दिले गेले आहे.

12) मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते देशातील पहिल्या अमृत सरोवराचे उदघाटन-

नुकतेच देशातील पहिल्या अमृत सरोवराचे उदघाटन करण्यात आले आहे आणि हे उदघाटन मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

● हे उदघाटन रामपुर उत्तर प्रदेश येथे करण्यात आले आहे.

● राज्यातील प्रत्येक जिल्हयात असे एकुण 75 तलाव बांधले जातील असे उत्तर प्रदेश सरकारकडुन सांगण्यात आले आहे

13) युनियन बँकेकडून सीमा पार व्यापार वित्त सेवेचा आरंभ-

नुकतीच युनियन बँक आँफ इंडियाने सीमा पार व्यापार वित्त सेवा ही सेवा सुरू केली आहे.

● युनियन बँक आँफ इंडिया ह्या बँकेची स्थापणा 1919 मध्ये करण्यात आली आहे.

● युनियन बँक आँफ इंडियाचे सध्याचे सीईओ राजकीरण राँय हे आहेत.

14) थिसुर पुरम उत्सव केरळ मध्ये केला गेला साजरा-

नुकताच थिसुर पुरम उत्सव हा केरळ ह्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे.

● दरवर्षी केरळमध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो.

● केरळ ह्या राज्याची राजधानी तिरूवनंतपुरम ही आहे.केरळचे सध्याचे पिनर ई विजयन हे आहेत आणि येथील राज्यपाल आरीफ मोहम्मद खान हे आहेत.

● केरळमध्ये साजरा केले जाणारे इतर महत्वाचे उत्सव-थय्यम उत्सव,मकर विललकु,पुनम उत्सव,शबरीमाला मंदीर उत्सव इत्यादी.

See also  चालू घडामोडी – 26 आणि 27 जानेवारी 2022 – Current Affairs Marathi January 2022

15) जंगल तोडीच्या विरोधात युएन सीसीडी सीओपी 15 शिखर संमेलनाचे आयोजन-

नुकतेच जंगल तोडीच्या विरोधात युएन सीसीडी सीओपी(united nation covention compact desertification,conference of party) 15 ह्या शिखर संमेलनाचे आबिदजान येथे आयोजन करण्यात आले आहे.

● पर्यावरणासंबंधी कुठलीही सुधारणा करण्यासाठी काही देशांच्या चर्चात्मक बैठक घेतल्या जात असतात.त्यालाच सीओपी असे म्हटले जाते.

Leave a Comment